(सिस्टम सॅाफ्टवेअर). ही प्रणाली हार्डवेअरचे व्यवस्थापन आणि नियंत्रण करण्यास मदत करते. यामुळे अनुप्रयोग संगणक प्रणाली (ॲप्लिकेशन सॅाफ्टवेअर) कार्य पूर्ण करू शकते. संगणक प्रणालीचा हा एक अनिवार्य भाग आहे. परिचालन प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टम) हे याचे एक उदाहरण आहे. तंत्र संगणक प्रणाली संगणकास मूलभूत सुविधा पुरवते आणि मदत करते. संगणकाचा वापर करतेवेळी संगणकाच्या वापरकर्त्याला तंत्र संगणक प्रणालीच्या कार्याबद्दल माहिती असणे आवश्यक नसली तरीही चालते.

संगणकाला मूलभूत कार्यक्षमता प्रदान करण्यासाठी, तसेच संगणक हार्डवेअर नियंत्रित करण्यासाठी आणि वापरकर्ता, अनुप्रयोग संगणक प्रणाली आणि संगणक हार्डवेअर या दरम्यान इंटरफेस म्हणून कार्य करणे हे त्याचे मुख्य उद्देश आहेत.

तंत्र संगणक प्रणाली कार्यक्षमतेच्या आधारावर दोन भागांत विभागले जाऊ शकतात :

(१) संगणकाची व्यवस्थापन आणि कार्यक्षमतेशी संबंधित तंत्र संगणक प्रणाली : संगणकाच्या विविध घटकांचे कार्य, जसे की, प्रक्रियक, आदान-प्रदान उपकरणे इत्यादी यांचे व्यवस्थापन करणे. तंत्र संगणक प्रणाली संगणकाचे घटक आणि संगणकास जोडलेले उपकरण यांच्या कार्याचे व्यवस्थापन करणे.

(२)अनुप्रयोग संगणक प्रणालीद्वारे विनंती केल्याप्रमाणे विविध सेवा पुरविणे : परिचालन प्रणाली, उपकरणे चालू ठेवणारी प्रणाली आणि सार्वजनिक सेवा यांचे व्यवस्थापन करणे. अनुप्रयोग संगणक प्रणालीचा विकास करण्यासाठी तंत्र संगणक प्रणाली. अनुप्रयोग संगणक प्रणालीचा विकास करण्यासाठी आवश्यक असलेले साधने आणि सुविधा प्रदान करणे. प्रोग्रामिंग भाषा संगणक प्रणाली, भाषा भाषांतर संगणक प्रणाली, लोडर आणि लिंकर देखील तंत्र संगणक प्रणाली म्हणून वर्गीकृत आहेत. जे अनुप्रयोग संगणक प्रणालीच्या विकासासाठी आवश्यक आहेत.

कळीचे शब्द : #परिचालनप्रणाली,#संगणक

संदर्भ :

  • ओ’लियरी, जे. टिमोथी, ओ’लियरी, लिंडा आय., ओळख माहिती तंत्रझानाची – एमएस-सीआयटी, मॅक-ग्रॉ हिल एज्युकेशन, प्रा.लि. इंडिया, चेन्नई. 2016-17.
  • गोयल, अनिता, कॅाम्प्युटर फंडामेंटल्स,  पिअरसन, दोर्लिंग किंडरस्ले, इंडिया, प्रा.लि., 2010.

समीक्षक : रत्नदीप देशमुख