नरभेराम : (जन्म इ. स. १८ वे शतक उत्तरार्ध मृत्यू इ. स. १८५२). हे पुष्टिमार्गीय वैष्णवकवी. ज्ञाती चतुर्वेदी मोढ ब्राह्मण. हसता संतकवि अशी ओळख सांगितली जाणाऱ्या या कवीचे सर्जन मुख्यत: पदरचना स्वरुपाचे आहे. कृष्णाने बालपणी गोपींशी केलेल्या खोड्यांचे विनोदी शैलीत आलेखन करणारी ‘कृष्ण-चरित्र-बाललीला’ ही कवीची आकर्षक पदमाला आहे. तसेच ‘कृष्ण-विनोद’, ‘नागदमण’,‘रासमाला’, ‘वामनाख्यान’, ‘सत्यभामानुं रुसणु’, ‘अवरीषनां पदो’ या त्यांच्या अन्य पदमाला आहेत. छप्पा आणि गरबीत रचलेले बोडाणाचरित्र, काफीतील बोडाणानी मूछंना पद ही चरित्रात्मक कृती, ‘लूटाया विशे’ आणि नाणु आपे नरभो रे या आत्मचरित्रात्मक पदरचना, या सर्वांत विनोदाची पखरण केली असून त्या प्रत्येकात कवीची उत्कट कृष्णभक्ती प्रतीत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा