कसर (Silver fish)

कसर हा लहान कीटक १.२ ते १.८ सेंमी. लांब, चपळ व पंखहीन असतो. त्याच्या पोटाच्या शेवटच्या खंडापासून तीन शेपटासारखे अवयव फुटलेले असतात. थायसान्यूरा गणाच्या लेपिझ्माटिडी कुलात याचा समावेश होत असून…

कस्तुरी मृग (Musk deer)

स्तनी वर्गाच्या समखुरी ( ज्यांच्या पायांवरील खुरांची संख्या सम असते) गणातील हरणांच्या मृगकुलातील प्राणी. याचे शास्त्रीय नाव मॉस्कस मॉस्किफेरस आहे. मध्ये व ईशान्य आशिया, काश्मीर, नेपाळ व भूतान येथे हा…

कोड (Vitiligo)

त्वचेतील रंगकण नष्ट झाल्याने त्वचेवर जे पांढरे डाग दिसतात, त्यांना ‘कोड’ किंवा ‘पांढरे कोड’ म्हणतात. कोड हा संसर्गजन्य रोग नाही. कोडाचे डाग आकाराने वेगवेगळे असतात, तसेच त्यांचे स्थान निश्चित असे…

अल्ब्युमीन (Albumin)

अल्ब्युमीन श्वेतक हा एक चिकट, पाण्यात विरघळणारा व जिलेटीनसारखा पदार्थ आहे. अन्नघटकातील प्रथिनांचा हा एक प्रकार आहे. अंड्यात, दुधात व रक्तात अल्ब्युमीन असते. अंड्यातील पांढरा भाग म्हणजे अल्ब्युमीन होय. दुधातील…

उंदीर (Mouse, Rat)

उंदीर हा स्तनी वर्गामधील कृंतक गणातील मोठ्या संख्येने आढळणारा प्राणी आहे. जगभर उंदराच्या १३७ प्रजाती आहेत. खार, बीव्हर, गिनीपिग,  सायाळ व घूस यांसारख्या प्राण्यांचाही समावेश कृंतक गणात होतो. अशा सर्व…

डॉल्फिन (Dolphin)

एक सागरी सस्तन प्राणी. डॉल्फिनाचा समावेश अपरास्तनी उपवर्गाच्या सीटॅसिया गणात करण्यात येतो. या गणात व्हेल, शिंशुक (पॉरपॉईज) यांचाही समावेश करतात. सीटॅसिया गणात असलेल्या डेल्फिनिडी कुलामध्ये डॉल्फिनाच्या १७ प्रजाती आणि ४०…

डोळा (Eye)

प्राण्यांमधील प्रकाशसंवेदी व प्रतिमाग्राहक इंद्रियाला डोळा म्हणतात. प्रकाशाचे ग्रहण करून त्याद्वारे माहिती मिळविणे हे डोळ्यांचे मुख्य कार्य असल्यामुळे तो मानवी शरीरातील एक महत्त्वाचे इंद्रिय आहे. डोक्याच्या कवटीतील खाचेत डोळा सात…

तिवर (White mangrove)

खारफुटीची एक जाती. हिला पांढरी खारफुटी म्हणतात. ही वनस्पती अकॅंथेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव एविसेनिया ऑफिसिनॅलीस आहे. (पहा : खारफुटी)    

दूध (Milk)

सस्तन प्राण्यांत पिलांच्या जन्मानंतर मातेच्या स्तनातून स्रवणारा द्रव पदार्थ म्हणजे दूध. सस्तन प्राण्यांमध्ये काही घर्मग्रंथींचे रूपांतर दुग्धग्रंथींमध्ये झालेले असते. दूध हे पाणी, मेदाम्ले, प्रथिन (केसीन) आणि शर्करा (लॅक्टोज) यांचे कलिली…

कृत्रिम अवयव (Artificial limbs)

शरीराच्या निकामी झालेल्या अवयवांचे कार्य करून घेण्यासाठी ज्या कृत्रिम साधनांचा वापर केला जातो, त्यांना ‘कृत्रिम अवयव’ असे म्हणतात. सर्वसाधारणपणे 'कृत्रिम अवयव' या संज्ञेचा उल्लेख कृत्रिम हात व पाय यांच्या संदर्भात…

कुष्ठरोग (Leprosy)

एक दीर्घकालीन संसर्गजन्य रोग. या रोगामुळे प्रामुख्याने त्वचा, विशेषकरून नाकातील श्लेष्मल पटल तसेच मेरुरज्जू आणि स्नायूंना जोडणार्‍या चेता बाधित होतात. रोगाची तीव्रता वाढल्यास डोळे, यकृत, प्लीहा, स्नायू आणि अस्थिमज्जा यांवरही…

कावीळ (Jaundice)

रक्तातील पित्तारुण (बिलिरूबीन) या पित्तरंजकद्रव्याचे प्रमाण वाढल्यामुळे त्वचा, डोळ्यांच्या बुबुळाचा पांढरा भाग, नखे वगैरे ठिकाणी पिवळेपणा दिसू लागतो; या स्थितीला कावीळ म्हणतात. रक्तातील तांबड्या (लोहित) पेशींचे आयुष्य ( सु. १२०…

कर्बोदके (Carbohydrates)

शरीराला ऊर्जा पुरविणार्‍या पोषकद्रव्यांच्या तीन मुख्य गटांपैकी एक गट. मेद आणि प्रथिने हे इतर दोन गट आहेत. सर्व कर्बोदके कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांनी बनलेली असतात. वनस्पती व प्राणी…

नागराज (King cobra)

आकाराने सर्वांत मोठा विषारी साप. नागराजाचे शास्त्रीय नाव ऑफिओफॅगस हॅना असून ऑफिओफॅगस प्रजातीत नागराज ही केवळ एकच जाती आहे. त्याच्या नावात जरी नाग हा शब्द असला तरी तो सामान्य नागाहून…

कुचला (Nux-vomica)

लोगॅनिएसी कुलातील या वृक्षाचे शास्त्रीय नाव स्ट्रिक्नॉस नक्स-व्होमिका असून, तो सु. १२-१५ मी. उंच वाढतो. दमट मान्सून वनात वाढणारा हा पानझडी वृक्ष कोकणात, तसेच समुद्रकिना-यावरच्या जांभ्याच्या जमिनीत विपुल आहे. भारतातील…