(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : पल्लवी नि. गायकवाड
स्थापत्य अभियांत्रिकी’ ही शाखा सर्व अभियांत्रिकी शाखांमधील मूलभूत व प्राचीन मानली जाते. अगदी आदीमानवाच्या काळापासून निवारा ही मानवाची अत्यावश्यक गरज आहे. वर्षानुवर्षे प्रगतीपथावर असलेल्या संशोधनातून स्थापत्य अभियांत्रिकीची विविध क्षेत्रे विकसित होत आहेत. प्राचीन व सुस्थापित असूनही स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात विविध स्तरांवर बदल होत आहेत.
संरचनात्मक अभियांत्रिकी (Structural Engineering), भू-तांत्रिक अभियांत्रिकी (Geotechnical Engineering), रचना/बांधकाम व्यवस्थापन (Construction Management), पर्यावरणीय व पाण्याचे स्रोत(Environmental & water resources) आणि नगररचना (Town planning)या पाच शाखांवर स्थापत्य अभियांत्रिकीचा संपूर्ण डोलारा उभा आहे. या शाखांचेही इतर अनेक संलग्न विषयांमध्ये वर्गीकरण करता येईल.
स्थापत्य अभियांत्रिकी या व्यावसायिक अभियांत्रिकी शाखेअंतर्गत मुख्यत: विविध प्रकारच्या वास्तूंवर (उदा., निरनिराळ्या उंचीच्या इमारती, पूल, पाण्याच्या टाक्या, बंधारे, रस्ते, धरणे, बंदरे इत्यादींवर) परिणाम करणाऱ्या घटकांचा अतिशय सखोल अभ्यास करणे गरजेचे असते. निरनिराळ्या वास्तूंचे विश्लेषण करून त्यानुसार त्यांचे आराखडे बनविणे हा स्थापत्य अभियांत्रिकीचा महत्त्वाचा भाग आहे. या क्रियेमध्ये भौतिक शास्त्रातील व स्थापत्य अभियांत्रिकीतील महत्त्वाची तत्त्वे व प्रणालींचा समावेश होतो. विविध वास्तूंच्या बांधणीसाठी व त्यांचे आयुर्मान वाढविण्यासाठी मूलभूत संकल्पना व तत्त्वांचा अभ्यास करून महत्त्वाच्या बाबींचे सखोल आकलन करून घेणे गरजेचे ठरते. याशिवाय, या शाखेमध्ये सिंचन योजना, पाणी व्यवस्थापन, वात अभियांत्रिकी, भूकंप अभियांत्रिकी, नैसर्गिक आपत्तींचे व्यवस्थापन इत्यादींसारख्या जीवनावश्यक विषयांचा देखील समावेश होतो.
मराठी विश्वकोशात उपलब्ध असलेल्या माहितीत आवश्यक तो सकारात्मक बदल करून जिज्ञासू वाचकांस ही अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्याची नितांत आवश्यकता आहे. या गरजेची पूर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या ज्ञानमंडळात केला आहे. नोंदींचे अधिक चांगल्या प्रकारे आकलन होण्याच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार आकृत्या, चित्रे, दृक-श्राव्य चित्रपटांश यांचा वापर केला आहे. नोंदी जरी संक्षिप्त पद्धतीने सादर केल्या असल्या तरी वाचकांचे कुतुहल जागृत करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.
भूगर्भातील भूकंपीय लहरी (How the ground shakes?)

भूगर्भातील भूकंपीय लहरी

भूकंप मार्गदर्शक सूचना क्र. २ भूकंप लहरी : भूकंपामुळे भूगर्भीय ताणतणावांमुळे उत्सर्जित झालेली ऊर्जा भूगर्भाच्या अंतर्पृष्ठावरून परावर्तित किंवा वक्रीभवन होऊन ...
मरीना शहर (Marina city)

मरीना शहर

कमीतकमी जागेत भरभक्कम पायावर काँक्रीटचा उत्तुंग इमारती मनोरा (Tower)  म्हणजे शिकागोतील मरीना शहर होय. पार्श्वभूमी : १९६० च्या दशकात अमेरिकेतील ...
मिरॅकल पुष्पोद्यान (Miracle Garden)

मिरॅकल पुष्पोद्यान

स्मार्ट सिटीच्या निमित्ताने शहरात अस्तित्वात असणाऱ्या उद्यानांचे नूतनीकरण आणि नवनिर्मिती करण्याची संधी शहर प्रशासनाला आता उपलब्ध झाली आहे. स्थानिक नागरिक ...
मृदा सक्षमीकरण (Soil Stabilization)

मृदा सक्षमीकरण

अनेक वर्षांपूर्वी  बांधकामासाठी जमीन निवडताना जमिनीची ताकद किंवा सक्षमता विचारात घेतली जात असे. म्हणजे जर जमीन पुरेशी टणक किंवा मजबूत ...
यूरोटनेल (Eurotunnel)

यूरोटनेल

यूरोटनेल हा जगप्रसिद्ध प्रकल्प चॅनेल टनेल या नावाने ‍देखील ओळखला जातो. यामुळे इंग्लंड आणि फ्रान्स हे देश रेल्वेमार्गाने जोडले ...
विटबांधकामाच्या घरांची भूकंपादरम्यान वर्तणूक (Brick Masonry behavior during Earthquake)

विटबांधकामाच्या घरांची भूकंपादरम्यान वर्तणूक

भूकंप मार्गदर्शक सूचना क्र. १२ विट बांधकामाच्या भिंतींची वर्तणूक : दगडी / विट बांधकाम असलेल्या इमारती ठिसूळ असून भूकंपाच्या तीव्र हादऱ्यांदरम्यान ...
व्युत्क्रमी स्थानक  (Reversing station)

व्युत्क्रमी स्थानक

नालाकृती वळण (Hair pin bend or Horseshoe curve) एखाद्या मार्गावरून १८०० अंशामध्ये वळणासाठी वाहनाला नालाकृती आकारातील वळणातून जावे लागते. अशा ...
सिमेंट (पोर्टलंड सिमेंट) (Cement)

सिमेंट

सिमेंट म्हणजे कोणत्याही काँक्रीटमधील मूळ आणि महत्त्वपूर्ण घटक. सिमेंट आणि पाण्याची पेस्ट दगड आणि वाळू यांच्या मिश्रणाला एकत्र बांधून ठेवते ...
स्वघनीकरण होणारे काँक्रीट (Self Compacting Concrete; SCC)

स्वघनीकरण होणारे काँक्रीट

जपानने १९८० मध्ये स्वघनीकरण होणाऱ्या काँक्रीटची निर्मिती केली व अक्षरशः प्रगतीचे शिखर गाठले.  त्या काळात जपानमध्ये कुशल कामगारांची कमतरता होती ...
हवा प्रदूषण नियंत्रण साधने (Air Pollution Control Devices)

हवा प्रदूषण नियंत्रण साधने

मार्जक प्रणाली : हवाप्रदूषण नियंत्रण साधनांचा गट असून त्याचा उपयोग उद्योगातील प्रदूषित  प्रवाहांमधून काही घटक आणि / किंवा वायू काढून ...
हवाप्रदूषण व्यवस्थापन (Air Pollution Management)

हवाप्रदूषण व्यवस्थापन

मानवी आरोग्यास तसेच पर्यावरणाचा हिस्सा असलेले प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू इत्यादींना हानिकारक असलेले घटक जेव्हा हवेमध्ये मिसळून जातात तेव्हा हवाप्रदूषण ...