(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : पल्लवी नि. गायकवाड
स्थापत्य अभियांत्रिकी’ ही शाखा सर्व अभियांत्रिकी शाखांमधील मूलभूत व प्राचीन मानली जाते. अगदी आदीमानवाच्या काळापासून निवारा ही मानवाची अत्यावश्यक गरज आहे. वर्षानुवर्षे प्रगतीपथावर असलेल्या संशोधनातून स्थापत्य अभियांत्रिकीची विविध क्षेत्रे विकसित होत आहेत. प्राचीन व सुस्थापित असूनही स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात विविध स्तरांवर बदल होत आहेत.
संरचनात्मक अभियांत्रिकी (Structural Engineering), भू-तांत्रिक अभियांत्रिकी (Geotechnical Engineering), रचना/बांधकाम व्यवस्थापन (Construction Management), पर्यावरणीय व पाण्याचे स्रोत(Environmental & water resources) आणि नगररचना (Town planning)या पाच शाखांवर स्थापत्य अभियांत्रिकीचा संपूर्ण डोलारा उभा आहे. या शाखांचेही इतर अनेक संलग्न विषयांमध्ये वर्गीकरण करता येईल.
स्थापत्य अभियांत्रिकी या व्यावसायिक अभियांत्रिकी शाखेअंतर्गत मुख्यत: विविध प्रकारच्या वास्तूंवर (उदा., निरनिराळ्या उंचीच्या इमारती, पूल, पाण्याच्या टाक्या, बंधारे, रस्ते, धरणे, बंदरे इत्यादींवर) परिणाम करणाऱ्या घटकांचा अतिशय सखोल अभ्यास करणे गरजेचे असते. निरनिराळ्या वास्तूंचे विश्लेषण करून त्यानुसार त्यांचे आराखडे बनविणे हा स्थापत्य अभियांत्रिकीचा महत्त्वाचा भाग आहे. या क्रियेमध्ये भौतिक शास्त्रातील व स्थापत्य अभियांत्रिकीतील महत्त्वाची तत्त्वे व प्रणालींचा समावेश होतो. विविध वास्तूंच्या बांधणीसाठी व त्यांचे आयुर्मान वाढविण्यासाठी मूलभूत संकल्पना व तत्त्वांचा अभ्यास करून महत्त्वाच्या बाबींचे सखोल आकलन करून घेणे गरजेचे ठरते. याशिवाय, या शाखेमध्ये सिंचन योजना, पाणी व्यवस्थापन, वात अभियांत्रिकी, भूकंप अभियांत्रिकी, नैसर्गिक आपत्तींचे व्यवस्थापन इत्यादींसारख्या जीवनावश्यक विषयांचा देखील समावेश होतो.
मराठी विश्वकोशात उपलब्ध असलेल्या माहितीत आवश्यक तो सकारात्मक बदल करून जिज्ञासू वाचकांस ही अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्याची नितांत आवश्यकता आहे. या गरजेची पूर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या ज्ञानमंडळात केला आहे. नोंदींचे अधिक चांगल्या प्रकारे आकलन होण्याच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार आकृत्या, चित्रे, दृक-श्राव्य चित्रपटांश यांचा वापर केला आहे. नोंदी जरी संक्षिप्त पद्धतीने सादर केल्या असल्या तरी वाचकांचे कुतुहल जागृत करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.
तंतू प्रबलित काँक्रीट (Fiber Reinforced Concrete)

तंतू प्रबलित काँक्रीट

बांधकाम क्षेत्रामध्ये काँक्रीट विविध प्रकारे तयार केले जाते. यामध्ये समतल सिमेंट काँक्रीट (Plain Cement Concrete), स्वघनीकरण होणारे काँक्रीट (self compacting concrete), ...
त्रिमितीय मुद्रणाचा बांधकामात वापर (Use of 3D Printing in Construction)

त्रिमितीय मुद्रणाचा बांधकामात वापर

त्रिमितीय मुद्रणाचे संकल्पचित्र संगणकीय प्रणालीद्वारे सामग्रीचे स्तर नियंत्रित करून त्रिमितीय आकार तयार करणे म्हणजे त्रिमितीय मुद्रण पद्धती होय. हे उपयोजन ...
दगडी इमारतींच्या बांधकामात क्षितिज समांतर पट्ट्यांची आवश्यकता  (Necessity of horizontal bands in masonry buildings)

दगडी इमारतींच्या बांधकामात क्षितिज समांतर पट्ट्यांची आवश्यकता

भूकंपमार्गदर्शक सूचना १४ क्षितीज पट्ट्यांचे कार्य : दगडी इमारतींमध्ये क्षितिज पट्टे अतिशय महत्त्वपूर्ण भूकंपरोधक वैशिष्ट्य म्हणून कामगिरी करतात. ज्याप्रमाणे पुठ्ठ्याच्या ...
दगडी इमारतींमधील क्षितिजलंब प्रबलकाची आवश्यकता (Requirement of vertical reinforcement in masonry buildings)

दगडी इमारतींमधील क्षितिजलंब प्रबलकाची आवश्यकता

भूकंप मार्गदर्शक सूचना १५ भूकंपादरम्यान दगडी भिंतींचा प्रतिसाद : दगडी इमारतींमध्ये त्यांची भूकंपीय वर्तणूक सुधारण्यासाठी क्षितीज पट्ट्यांचा समावेश केला जातो. या ...
निवळण (Sedimentation)

निवळण

पाण्यामधील गढूळपणा आणि रसायनांच्या साहाय्याने, तसेच कणसंकलनामुळे उत्पन्न झालेले कण पाण्यापासूल अलग करणे हे निवळणाचे काम आहे. पाण्यापेक्षा जड असणारे ...
निस्यंदकाचे कार्य (Working of Filter)

निस्यंदकाचे कार्य

किलाटन, कणसंकलन आणि निवळण करून पाण्याची गढूळता कमी करून घेतल्यावर ते निस्यंदकामधल्या वाळूवर/माध्यमावर सोडले जाते. गुरुत्वाकर्षणामुळे पाणी माध्यमाच्या थरांमधून झिरपते.  ...
निस्यंदन (Filtration)

निस्यंदन

निवळण केलेले पाणी अधिक स्वच्छ करण्यासाठी वाळू किंवा तत्सम पदार्थांच्या थरांवर पसरले असता पाण्यातील उरलेले आलंबित आणि कलिल पदार्थ ह्या ...
परिरुद्धित इमारतींच्या बांधकामाची वैशिष्ट्ये (Essential Features of Confined Masonry Houses)

परिरुद्धित इमारतींच्या बांधकामाची वैशिष्ट्ये

भूकंप मार्गदर्शक सूचना २९ परिरुद्धित इमारतींच्या बांधकामाचा आवाका : परिरुद्धीत बांधकाम प्रणाली कमी किंवा मध्यम उंचीच्या इमारतींसाठी अतिशय उपयुक्त ठरते ...
परिरुद्धित बांधकाम इमारती (Confined Masonry Buildings)

परिरुद्धित बांधकाम इमारती

भूकंप मार्गदर्शक सूचना २८ आकृती १ : परिरुद्धित बांधकाम : (अ) परिरुद्धित बांधकामाच्या इमारतींचे भाग, (आ) चिले देशातील परिरुद्धित बांधकामाची ...
पाण्याची क्लोरीनची मागणी काढणे (Removal of water chlorine demand)

पाण्याची क्लोरीनची मागणी काढणे

पाण्याची क्लोरीनची मागणी काढण्याकरिता पुढील कार्यपद्धती अवलंबिली जाते.  (१) पाण्याच्या नमुन्याचे सारखे भाग घेऊन प्रत्येकामध्ये वाढत्या प्रमाणात क्लोरीनचा द्रव मिसळतात ...
Cl_2 + H_2O \rightleftarrows HOCl + H^+ + Cl^-

पाण्याचे निर्जंतुकीकरण

घरगुती वापरासाठीचे पाणी नुसते स्वच्छ, गंधहीन व रंगहीन असून चालत नाही तर ते सर्व प्रकारच्या रोग उत्पन्न करणाऱ्या जीवजंतुंपासूनही मुक्त असले ...
Ca(HCO_3)_2 + Ca(OH)_2 \rightleftarrows  2CaCO_3 \downarrow + 2H_2O

पाण्याचे निष्फेनीकरण

घरगुती पाण्याच्या वापरामध्ये आंघोळ करणे, अन्न शिजवणे आणि कपडे धुणे ह्या तीन महत्त्वाच्या क्रिया असून त्या व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी पाण्याची ...
पाण्याचे प्रतिआयनीभवन (Deionisation of Water)

पाण्याचे प्रतिआयनीभवन

जेव्हा पाण्यामधील आयन (धन आणि ऋण) काढावयाचे असतात तेव्हा ही प्रक्रिया वापरतात.  अशा प्रकारचे पाणी विविध उत्पादनांमध्ये (उदा., औषधे, शीतपेये, ...
पूल बांधकाम सामग्रीतील प्रगती (Progress in bridge construction materials)

पूल बांधकाम सामग्रीतील प्रगती

प्राचीन काळात पूल बांधकामासाठी निसर्गात उपलब्ध असलेली सामग्री म्हणजे लाकूड व दगड यांचा उपयोग केला जात असे. वीट भट्ट्यांच्या शोधानंतर ...
पूल व पुलांचे प्रकार (Bridge and their types)

पूल व पुलांचे प्रकार

रस्तामार्ग तसेच रूळमार्ग यांवर येणारे विविध अडथळे पार करण्यासाठी बांधलेली संरचना (Structure) म्हणजे पूल होय. नाले, ओढे, नद्या, दऱ्या, तलाव, ...
प्रबलित काँक्रीट इमारतीमधील भूकंप प्रतिरोधक तुळया (Beams in RC Buildings Resist Earthquakes)

प्रबलित काँक्रीट इमारतीमधील भूकंप प्रतिरोधक तुळया

भूकंपमार्गदर्शक सूचना १८ प्रबलन आणि भूकंपीय नुकसान यांचा परस्परसंबंध : प्रबलित काँक्रीटच्या इमारतींमध्ये ऊर्ध्व आणि क्षितिज घटक (म्हणजेच तुळया आणि ...
प्रबलित काँक्रीट इमारतींमधील भूकंप प्रतिरोधक स्तंभ (Columns in RC Buildings Resist Earthquakes)

प्रबलित काँक्रीट इमारतींमधील भूकंप प्रतिरोधक स्तंभ

भूकंप मार्गदर्शक सूचना  १९ भूकंपामुळे स्तंभांचे होणारे संभाव्य नुकसान : प्रबलित काँक्रीटच्या (Reinforced Concrete) इमारतीमधील ऊर्ध्व घटकांत म्हणजेच स्तंभांमध्ये दोन ...
फेरोसिमेंट : इतिहास व विकास (Ferrocement : History & Development)

फेरोसिमेंट : इतिहास व विकास

फेरोसिमेंट हे एक बहुरूपी आणि बहुगुणी असे अगदी वेगळ्या प्रकारचे बांधकाम साहित्य आहे. ते वापरण्याचे तंत्रज्ञानही पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळे आहे ...
फेरोसिमेंट : एक बहुगुणी बांधकाम साहित्य (Ferrocement : A Versatile Construction Material)

फेरोसिमेंट : एक बहुगुणी बांधकाम साहित्य

पारंपरिक मोठमोठ्या पद्धतीचे बांधकाम हे प्रबलित सिमेंट काँक्रीटच्या (Reinforced cement Concrete; RCC) ढाच्यात भरलेल्या विटांच्या किंवा प्रखंड भिंतींच्या (Block walls) ...
फेरोसिमेंट : व्याख्या व वैशिष्ट्ये (Ferrocement : Definitions & Characteristics)

फेरोसिमेंट : व्याख्या व वैशिष्ट्ये

फेरोसिमेंटसंदर्भात काम करणाऱ्या विविध संस्थांनी त्याची व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने केली आहे. व्याख्या : १) अमेरिकन बुरिओ ऑफ शिपिंग : फेरोसिमेंट ...
Loading...