(प्रस्तावना)

पालकसंस्था : अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे | विषयपालक : बाळ फोंडके | समन्वयक : पी. आर. धामणगावकर | विद्याव्यासंगी : पल्लवी नि. गायकवाड

बदल हा सृष्टीचा नियम आहे. प्राचीन व सुस्थापित असून ही मूलभूत अभियांत्रिकी शास्त्र यास अपवाद नाही. तंत्रशास्त्रातील क्रांतीने संपूर्ण जगाचा ताबा घेतला आहे. नवनवीन शोध लागत आहेत. काही दशकांपूर्वी असलेले ज्ञान, माहिती कालबाह्य होत आहे. हा बदल बहुआयामी आहे.विश्वकोशात उपलब्ध असलेल्या माहितीत कालानुरूप बदल करून जिज्ञासूंसाठी ती पुनः उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसा प्रामाणिक प्रयत्न या विश्वकोशात केला आहे. विश्वकोश हा उच्च दर्जाचा संदर्भ ग्रंथ असून ह्यामुळे शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन क्षेत्रात बहुमोल सहकार्य होईल.

यांत्रिक अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) ही एक व्यावसायिक अभियांत्रिकी शाखा आहे, ज्यात भौतिकशास्त्रातील अभिकल्प, उत्पादन आणि यांत्रिक प्रणालींची देखभाल तत्त्वेव उपयोग यांचा समावेश होतो. यासाठी यांत्रिकी, गतिशास्त्र, ऊष्मागतिकी (थर्मोडायनॅमिक्स ) आणि ऊर्जाशास्त्र यांसारख्या मूलभूत संकल्पनांचे सखोल आकलन आवश्यक आहे. या संकल्पनांचा व मूलभूत विज्ञानातील इतर तत्‍त्वांचा यांत्रिक अभियंते स्वयंचल वाहने, विमाने, उष्णता व शितलता निर्माण करणारी प्रणाली, औद्योगिक उपकरणे व यंत्र सामग्री इत्यादींचे अभिकल्प (डिझाईन) बनविण्यासाठी आणि विश्लेषणासाठी वापर करतात. यांत्रिक अभियांत्रिकी ज्यावर आधारित आहे असे अनेक मूलभूत विषय व इतर संलग्न विषयकालानुरूप विकसित होत आहेत. या मूलभूत विषयां व्यतिरिक्त प्रगत तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेले विषय जसे उष्णता आणि वस्तुमानस्थानांतरण, संगणकशास्त्र, यंत्रमानवशास्त्र, इंधनशास्त्र, ज्वलनशास्त्र, स्वयंचलवाहनशास्त्र, कंपन अभियांत्रिकी, रॅपिडप्रोटोटायपिंग, कॅड/कॅम, संगणक साहाय्यभूत अभियांत्रिकी (CAE) इत्यादींचे देखील महत्‍त्व वाढले आहे.

हा विश्वकोश म्हणजे यांत्रिक व स्वयंचल अभियांत्रिकीचा संक्षिप्त परंतु व्यापक माहिती स्रोत आहे. याविश्वकोशातील माहिती जरी समजण्यास सोप्या व सुलभ भाषेत असली तरी शिक्षणतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, संशोधक यांना हवी असलेली सखोल माहिती देण्यास समर्थ आहे. सर्व साधारण विद्यार्थी ही सहज शोधन करू शकेल अशा रीतीने या विश्वकोशातील माहितीची रचना केली आहे. हे करत असताना त्याची नैसर्गिक जिज्ञासा जागृत होऊन त्याने यांत्रिक अभियांत्रिकीतील विविध विषय भागांची रोमहर्षक सफर स्वयंस्फूर्तीने करावी असाही प्रयत्न आहे. ह्यातील सचित्र स्पष्टीकरणे वाचकाचे कुतुहूल शमविण्यास मदत करतील. सुस्पष्टता, अचूकता व परिपूर्णता यांसाठी काळजीपूर्वक पुनर्विलोकन केलेला हा यांत्रिक व स्वयंचल अभियांत्रिकीचा हा विश्वकोश उत्कृष्टतेचा मानदंड ठरावा असा प्रयत्न केला आहे.

ऊष्मागतिक शास्त्र (Thermodynamics)

ऊष्मागतिक शास्त्र हे उष्णता आणि यांत्रिक कार्य यांच्या परस्परसंबंधीचे शास्त्र आहे. उष्णतेचे यांत्रिक ऊर्जेत आणि यांत्रिक ऊर्जेचे उष्णतेत रूपांतर होत ...
तापमापन (Thermometry)

तापमापन (Thermometry)

तापमान हे पदार्थाचा गरमपणा किंवा थंडपणा यांची पातळी मोजण्याचे प्रमाण आहे. तापमान हा पदार्थाचा तुलनात्मक गुणधर्म आहे. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाला ...
Close Menu