(प्रस्तावना) पालकसंस्था : मुंबई विद्यापीठ, मुंबई | समन्वयक : शर्मिला वीरकर | विद्याव्यासंगी : आनंद ग्या. गेडाम
रने देकार्तला आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक मानले जाते. सतराव्या शतकापासून यूरोपमध्ये देकार्त, स्पिनोझा, लायप्निट्स यांनी बुध्दिप्रामाण्यवाद मांडला; तर लॉक, बर्क्ली, डेव्हिड ह्यूम यांनी अनुभववादाची मांडणी केली. कांटच्या ज्ञानमीमांसेत दोहोंचा समन्वय आढळतो. कांटला म्हणूनच युगप्रवर्तक मानले जाते. त्याच्या प्रभावामुळे आधुनिक तत्त्वज्ञान विविध दिशांनी विस्तारलेले दिसते. हेगेल, ह्यूसेर्ल, मार्क्स, हायडेगर यांनी घेतलेला जाणिवेचा वेध कांटहून निराळा व लक्षणीय आहे. तो येथे दिला आहे. तसेच हायडेगरसह किर्केगॉर, सार्त्र, सीमॉन द बोव्हार आदिंच्या अस्तित्ववादी तत्त्वज्ञानाची रूपरेषा येथे दिली आहे. मूर, रसेल, व्हिट्गेन्श्टाइन यांचे विश्लेषक तत्त्वज्ञान; श्लिक, कारनॅप, एयर यांचा तार्किक प्रत्यक्षार्थवाद; पर्स, जेम्स, ड्यूई यांचा फल:प्रामाण्यवाद येथे संक्षेपाने येतो व उपयोजित तसेच तौलनिक तत्त्वज्ञानाचाही समावेश आढळतो. एकोणिसाव्या शतकापासून भारतीय जीवनात स्थित्यंतरे होऊ लागली, ती वैज्ञानिक प्रगतीमुळे व त्यानुसार उपलब्ध असलेल्या प्रगत तंत्रज्ञानामुळे. रेल्वे, टपाल आदी दळणवळणाची तसेच संपर्काची साधने उपलब्ध झाली. शिक्षणासाठी वृत्तपत्रे, शाळा, महाविद्यालये व विश्वविद्यालये आदी संस्थांची स्थापना झाली. पाश्चात्त्य उदारमतवादाचा प्रभाव सुशिक्षितांमध्ये दिसू लागला. परिणामी विज्ञान-तंत्रज्ञान, धर्म-अध्यात्म, ऐहिक-पारलौकिक, नवता-परंपरा, विवेक-श्रध्दा अशा अनेक द्वंद्वांची सांगड आधुनिक भारतीय तत्त्वज्ञानात आढळते. किंबहुना, ‘समन्वय’ हे आधुनिक भारतीय तत्त्वज्ञानाचे व्यवच्छेदक लक्षण होय.

एकविसाव्या शतकात प्रसारमाध्यमांनी क्रांती घडवून आणली. कृषी, उद्योग, कायदा, संगीत, चित्रपट अशा विविध क्षेत्रांत आमूलाग्र बदल झाले. त्यामुळे काही विशिष्ट प्रश्न निर्माण झाले. अशा मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांचा मागोवा आधुनिक तत्त्वज्ञानात घेतला जातो. एकंदरीत, आधुनिक तत्त्वज्ञानाच्या शाखोपशाखांचा व विविध तत्त्वविचारांचा परिचय करून देणे, हे या ज्ञानमंडळाचे उद्दिष्ट आहे. तत्त्वज्ञान हा विषय क्लिष्ट मानला जातो. तो शक्य तितक्या सोप्या शब्दांत सर्वसामान्य वाचकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, अभ्यासकांपर्यंत व संशोधकांपर्यंत पोहोचावा, असे वाटते. पूर्वसूरींचे मार्गदर्शन आहेच. त्याच आधारे हे संचित तात्त्विक प्रसारार्थ खुले करत आहे.

हेन्री बेर्गसन (Henri Bergson)

हेन्री बेर्गसन

बेर्गसाँ, आंरी : (१८ ऑक्टोबर १८५९—४ जानेवारी १९४१). सुप्रसिद्ध फ्रेंच तत्त्ववेत्ते. त्यांचा जन्म पॅरिसमध्ये झाला आणि पॅरिस येथेच तत्त्वज्ञानाचे अध्ययन-अध्यापन करण्यात ...
ॲनी बेझंट (Annie Besant)

ॲनी बेझंट

बेझंट, ॲनी : (१ ऑक्टोबर १८४७—२० सप्टेंबर १९३३). विख्यात थिऑसॉफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण, समाजसुधारणा इ. क्षेत्रांत महान कार्य केलेली ...
ॲल्फ्रेड जूल्झ एअर (A. J. Ayer)

ॲल्फ्रेड जूल्झ एअर

एअर, ॲल्फ्रेड जूल्झ : (२९ ऑक्टोबर १९१०—२७ जून १९८९). प्रभावी ब्रिटिश तत्त्ववेत्ता. जन्म लंडन येथे. शिक्षण ईटन तसेच ख्राइस्टचर्च कॉलेज, ऑक्सफर्ड ...