जॉन ड्यूई (John Dewey)

ड्यूई, जॉन : (२० ऑक्टोबर १८५९—१ जून १९५२). प्रसिद्ध अमेरिकन तत्त्वज्ञ व शिक्षणशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म बर्लिंग्टन येथे झाला. शिक्षण पुरे होताच १८८८ साली मिनेसोटा विद्यापीठात ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक झाले. १८८९…

ब्लेझ पास्काल (Blaise Pascal)

पास्काल, ब्लेझ : (१९ जून १६२३—१९ ऑगस्ट १६६२). फ्रेंच गणितज्ञ, भौतिकीविज्ञ व धार्मिक तत्त्ववेत्ते. त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळे आधुनिक विचारवंतांमधील त्यांचे स्थान अनन्यसाधारण गणले जाते. त्यांचा जन्म क्लेरमाँ-फेरँ येथे झाला. १६२६…

काल (Time)

आपल्याला घटनांचा अनुभव येतो, तेव्हा कित्येक घटना इतर काही घटनांच्या पूर्वी किंवा नंतर घडलेल्या असतात, असाही अनुभव येतो. उदा., एखादी संबंध तान आपण ऐकतो, तेव्हा तिच्यातील काही सूर आपण अगोदर…

चारित्र्य (Character)

चारित्र्याचे किंवा शीलाचे स्वरूप दुहेरी आहे. ज्याच्या ठिकाणी चारित्र्य आहे, अशा माणसाच्या मानसिक जीवनात व वर्तनात सुसंगती असते, त्याच्या आचरणात स्थैर्य असते, कित्येक उद्दिष्ट्ये–उदा., आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे कल्याण, व्यावसायिक यश…

अस्तित्ववाद (Existentialism)

आधुनिक तत्त्वज्ञानातील एक प्रमुख व प्रभावी विचारसरणी किंवा दृष्टिकोन. ज्याला अस्तित्ववाद म्हणून ओळखण्यात येते, त्या तात्त्विक मताची किंवा दृष्टिकोनाची सुरुवात सरेन किर्केगॉर ह्या डॅनिश तत्त्ववेत्त्याच्या विचारापासून झाली, असे जरी सर्वसाधारणपणे…

जोसेफ बटलर (Bishop Joseph Butler)

बटलर, जोसेफ : (१८ मे १६९२—१६ जून १७५२). अठराव्या शतकातील प्रसिद्ध आणि प्रभावी ब्रिटिश नीतिमीमांसक व ख्रिस्ती धर्मविद्यावेत्ते. जन्म वाँटिज, बार्कशर येथे. बटलर हे प्रथम प्रेसबिटेरियन पंथाचे होते; पण तरुणपणी त्यांनी…

पदार्थप्रकार (Categories)

पदार्थप्रकाराविषयीच्या उपपत्तीचा स्पष्ट प्रारंभ ॲरिस्टॉटल (इ.स.पू. ३८४‒३२२) याच्या तत्त्वज्ञानात आढळतो. आपण वेगवेगळे शब्द किंवा शब्दप्रयोग एकत्र जोडून विधाने बनवितो. अशा शब्दप्रयोगांतून ‘काही’, ‘सर्व’, ‘नाही’ इ. तार्किक शब्दप्रयोग वगळले आणि उरलेले…

लूटव्हिख आंड्रेआस फॉइरबाख (Ludwig Andreas Feuerbach)

फॉइरबाख, लूटव्हिख आंड्रेआस : ( २८ जुलै १८०४—१३ सप्टेंबर १८७२ ). जर्मन तत्ववेत्ता व धर्मशास्त्रवेत्ता. जन्म लांट्‌शूट, बव्हेरिया येथे. विद्यार्थिदशेत तो प्रथम ख्रिस्ती धर्मशास्त्राचा अभ्यासक होता; पण १८२५ मध्ये जी.…

पारिक्रमिकी (Peripatetics)

थोर ग्रीक तत्त्वज्ञ ॲरिस्टॉटल याची शिष्यपरंपरा. ॲरिस्टॉटलने प्रस्थापित केलेल्या लायसिअम पीठाच्या प्रांगणात एक छायाच्छादित मार्ग−पेरिपॅटॉस−होता आणि त्यावरून फिरत फिरत ॲरिस्टॉटल आपल्या शिष्यांना शिकवीत असे. ह्यामुळे लायसिअममध्ये विकसित झालेल्या विचारपंथाला ‘पेरिपॅटेटिक’…

इब्न रुश्द (Ibn Rushd)

इब्‍न रुश्द : (?११२६—१० डिसेंबर ११९८). एक अरबी तत्त्ववेत्ते. संपूर्ण नाव अबुल-वलीद मुहंमद बिन अहमद बिन रुश्द. मध्ययुगीन यूरोपात ‘आव्हेरोईझ’ (Averroes) ह्या नावाने ते ओळखले जाई. ‘स्पेनमधील सर्वश्रेष्ठ अरबी तत्त्ववेत्ते’,…

डीमॉक्रिटस (Democritus)

डीमॉक्रिटस : (इ.स.पू. ४६०—इ.स.पू. ३७०). प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ आणि ग्रीक अणुवादाचा संस्थापक व प्रवर्तक. त्याने आपल्या काळात मांडलेले सिद्धांत हे आपल्या आधुनिक काळातील भौतिकशास्त्रीय सिद्धांतांच्या जवळपास जाणारे आहेत. जरी डीमॉक्रिटसचा…

बर्ट्रंड रसेल (Bertrand Russell)

रसेल, बर्ट्रंड : (१८ मे १८७२—२ फेब्रुवारी १९७०). विसाव्या शतकातील श्रेष्ठ, कदाचित सर्वश्रेष्ठ, पाश्चात्त्य तत्त्ववेत्ते. तत्त्वज्ञानातील विश्लेषणवादी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या वैचारिक पंथाचा पाया रसेल यांनी जी. ई. मुर (१८७३−१९५८) यांच्या सहकार्याने…

हेन्री बेर्गसन (Henri Bergson)

बेर्गसाँ, आंरी : (१८ ऑक्टोबर १८५९—४ जानेवारी १९४१). सुप्रसिद्ध फ्रेंच तत्त्ववेत्ते. त्यांचा जन्म पॅरिसमध्ये झाला आणि पॅरिस येथेच तत्त्वज्ञानाचे अध्ययन-अध्यापन करण्यात आणि तत्त्वज्ञानावर लिखाण करण्यात त्यांनी आपले सर्व आयुष्य घालविले. तत्त्वज्ञानात…

फ्रीड्रिख नीत्शे (Friedrich Nietzsche)

नीत्शे, फ्रीड्रिख व्हिल्हेल्म : (१५ ऑक्टोबर १८४४—२५ ऑगस्ट १९००). एक अत्यंत प्रभावी जर्मन तत्त्ववेत्ता. देकार्त, लायप्निट्स, कांट यांच्याप्रमाणे नीत्शेने तर्कबद्ध, तात्त्विक दर्शन रचलेले नाही. नव्या मूल्यांची प्रस्थापना आणि उद्‌घोष करणारा…

निकोलस ब्यरद्यायेव्ह (Nicolas Berdyaev)

ब्यरद्यायेव्ह, निकोलाई : ( १९ मार्च १८७४—२३ मार्च १९४८ ). प्रसिद्ध रशियन धार्मिक तत्त्ववेत्ता. जन्म युक्रेनमधील कीव्ह या शहरी. फ्रेंच-पोलिश आई अलेक्झांड्रा धार्मिक वृत्तीची; तर वडील अलेक्झांडर अगदी विरुद्ध. त्यांचे…