(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : आनंद ग्या. गेडाम
रने देकार्तला आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक मानले जाते. सतराव्या शतकापासून यूरोपमध्ये देकार्त, स्पिनोझा, लायप्निट्स यांनी बुध्दिप्रामाण्यवाद मांडला; तर लॉक, बर्क्ली, डेव्हिड ह्यूम यांनी अनुभववादाची मांडणी केली. कांटच्या ज्ञानमीमांसेत दोहोंचा समन्वय आढळतो. कांटला म्हणूनच युगप्रवर्तक मानले जाते. त्याच्या प्रभावामुळे आधुनिक तत्त्वज्ञान विविध दिशांनी विस्तारलेले दिसते. हेगेल, ह्यूसेर्ल, मार्क्स, हायडेगर यांनी घेतलेला जाणिवेचा वेध कांटहून निराळा व लक्षणीय आहे. तो येथे दिला आहे. तसेच हायडेगरसह किर्केगॉर, सार्त्र, सीमॉन द बोव्हार आदिंच्या अस्तित्ववादी तत्त्वज्ञानाची रूपरेषा येथे दिली आहे. मूर, रसेल, व्हिट्गेन्श्टाइन यांचे विश्लेषक तत्त्वज्ञान; श्लिक, कारनॅप, एयर यांचा तार्किक प्रत्यक्षार्थवाद; पर्स, जेम्स, ड्यूई यांचा फल:प्रामाण्यवाद येथे संक्षेपाने येतो व उपयोजित तसेच तौलनिक तत्त्वज्ञानाचाही समावेश आढळतो. एकोणिसाव्या शतकापासून भारतीय जीवनात स्थित्यंतरे होऊ लागली, ती वैज्ञानिक प्रगतीमुळे व त्यानुसार उपलब्ध असलेल्या प्रगत तंत्रज्ञानामुळे. रेल्वे, टपाल आदी दळणवळणाची तसेच संपर्काची साधने उपलब्ध झाली. शिक्षणासाठी वृत्तपत्रे, शाळा, महाविद्यालये व विश्वविद्यालये आदी संस्थांची स्थापना झाली. पाश्चात्त्य उदारमतवादाचा प्रभाव सुशिक्षितांमध्ये दिसू लागला. परिणामी विज्ञान-तंत्रज्ञान, धर्म-अध्यात्म, ऐहिक-पारलौकिक, नवता-परंपरा, विवेक-श्रध्दा अशा अनेक द्वंद्वांची सांगड आधुनिक भारतीय तत्त्वज्ञानात आढळते. किंबहुना, ‘समन्वय’ हे आधुनिक भारतीय तत्त्वज्ञानाचे व्यवच्छेदक लक्षण होय.

एकविसाव्या शतकात प्रसारमाध्यमांनी क्रांती घडवून आणली. कृषी, उद्योग, कायदा, संगीत, चित्रपट अशा विविध क्षेत्रांत आमूलाग्र बदल झाले. त्यामुळे काही विशिष्ट प्रश्न निर्माण झाले. अशा मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांचा मागोवा आधुनिक तत्त्वज्ञानात घेतला जातो. एकंदरीत, आधुनिक तत्त्वज्ञानाच्या शाखोपशाखांचा व विविध तत्त्वविचारांचा परिचय करून देणे, हे या ज्ञानमंडळाचे उद्दिष्ट आहे. तत्त्वज्ञान हा विषय क्लिष्ट मानला जातो. तो शक्य तितक्या सोप्या शब्दांत सर्वसामान्य वाचकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, अभ्यासकांपर्यंत व संशोधकांपर्यंत पोहोचावा, असे वाटते. पूर्वसूरींचे मार्गदर्शन आहेच. त्याच आधारे हे संचित तात्त्विक प्रसारार्थ खुले करत आहे.

मेघश्याम पुंडलीक रेगे (Meghshyam Pundalik Rege)

मेघश्याम पुंडलीक रेगे

मेघश्याम पुंडलीक रेगे रेगे, मेघश्याम पुंडलीक : (२४ जानेवारी १९२४—२८ डिसेंबर २०००). महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ तत्त्वज्ञ, विचारवंत व महाराष्ट्र राज्य ...
मेरी वॉरनॉक (Mary Warnock)

मेरी वॉरनॉक

वॉरनॉक, हेलेन मेरी : (१४ एप्रिल १९२४—२० मार्च २०१९). ब्रिटिश तत्त्ववेत्त्या. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात नीतिशास्त्र, शिक्षणाचे तत्त्वज्ञान, मनाचे तत्त्वज्ञान तसेच विसाव्या ...
योहान गोटलीप फिक्टे (Johann Gottlieb Fichte)

योहान गोटलीप फिक्टे

फिक्टे, योहान गोटलीप : (१९ मे १७६२—२९ जानेवारी १८१४). प्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्ता आणि देशभक्त. जन्म ल्यूसेशीआतील (पू. जर्मनी) रामेनाऊ ह्या ...
रमण महर्षि (Raman Maharshi)

रमण महर्षि

रमण महर्षि : (३० डिसेंबर १८७९‒१४ एप्रिल १९५०). आधुनिक भारतीय संत व तत्त्वज्ञ. या दक्षिण भारतीय तत्त्वज्ञाने कोणताही नवीन संप्रदाय किंवा पंथ ...
रामचंद्र दत्तात्रेय रानडे (Ramchandra Dattatraya Ranade)

रामचंद्र दत्तात्रेय रानडे

रानडे, रामचंद्र  दत्तात्रेय : (३ जुलै १८८६—६ जून १९५७). भारतीय तत्त्वज्ञ व संत. काही तत्त्वज्ञांचा दृष्टीकोन विश्वकेंद्रित असतो, तर काहींचा ...
राल्फ वॉल्डो इमर्सन (Ralph Waldo Emerson)

राल्फ वॉल्डो इमर्सन

एमर्सन, राल्फ वॉल्डो : ( २५ मे १८०३ – २७ एप्रिल १८८२ ). अमेरिकन प्रभावी वक्ता, कवी व निबंधकार. ही ...
रूडोल्फ क्रिस्टॉफ ऑइकेन (Rudolf Christoph Eucken)

रूडोल्फ क्रिस्टॉफ ऑइकेन

ऑइकेन, रूडोल्फ क्रिस्टॉफ : (५ जानेवारी १८४६ ‒ १५ सप्टेंबर १९२६). जर्मन तत्त्ववेत्ता. जन्म ऑरिश येथे. त्याचे शिक्षण गटिंगेन व ...
रॉबिन जार्ज कॉलिंगवुड (Robin George Collingwood)

रॉबिन जार्ज कॉलिंगवुड

कॉलिंगवुड, रॉबिन जार्ज : (२२ फेब्रुवारी १८८९—९ जानेवारी १९४३). ब्रिटिश तत्त्ववेत्ता आणि इतिहासकार. जन्म कॉनिस्टन (उत्तर लॅंकाशर) येथे. त्याचे शिक्षण ...
लघु सत्यता कोष्टक पद्धती (Shorter Truth Table Method)

लघु सत्यता कोष्टक पद्धती

लघु सत्यता कोष्टक पद्धती ही एक निर्णय पद्धती (Decision Procedure) आहे. एखादा विधानाकार (Statement-form) सर्वतः सत्य, सर्वतः असत्य वा यादृच्छिक ...
लूटव्हिख आंड्रेआस फॉइरबाख (Ludwig Andreas Feuerbach)

लूटव्हिख आंड्रेआस फॉइरबाख

फॉइरबाख, लूटव्हिख आंड्रेआस : ( २८ जुलै १८०४—१३ सप्टेंबर १८७२ ). जर्मन तत्ववेत्ता व धर्मशास्त्रवेत्ता. जन्म लांट्‌शूट, बव्हेरिया येथे. विद्यार्थिदशेत ...
लेव्हायथन (Leviathan)

लेव्हायथन

प्रसिद्ध ब्रिटिश तत्त्वज्ञ थॉमस हॉब्स यांच्या महत्त्वाच्या ग्रंथांपैकी लेव्हायथन  हा एक ग्रंथ. १६४२ ते १६५१ दरम्यान यादवी युद्ध अनुभवलेल्या हॉब्स ...

वरकरणी कर्तव्ये

प्लेटो व ॲरिस्टॉटल यांचे तत्त्वविचार प्रसृत करण्याचे विल्यम डेव्हिड रॉस (१८७७–१९७१) यांचे कार्य प्रसिद्ध आहे. तसेच त्यांनी मांडलेली ‘प्राइमा-फेसी ड्यूटिज’ ...
वाङ्मयचौर्य (Plagiarism)

वाङ्मयचौर्य

“एखाद्या लेखकाची मूळ साहित्यकृती पूर्णतः वा अंशतः दुसऱ्या लेखकाने स्वतःच्या नावे प्रसिद्ध करून ती स्वतःची असल्याचे भासविणे, ह्यास ‘वाङ्‌मयचौर्य’ म्हणतात ...
विधेय तर्कशास्त्र (Predicate Logic)

विधेय तर्कशास्त्र

तर्कशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना. हिला ‘विधेय कलन’ असेही म्हटले जाते. तर्कशास्त्र हे मुख्यत्वेकरून युक्तिवादाशी संबंधित आहे. युक्तिवाद म्हणजे विधानांचा असा ...
विनोबा भावे (Vinoba Bhave)

विनोबा भावे

भावे, विनोबा : (११ सप्टेंबर १८९५–१५ नोव्हेंबर १९८२). थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक. कोकणातील रायगड जिल्ह्याच्या पेण तहसिलातील गागोदे ...
विलर्ड व्हॅन ओर्‌मन क्वाइन (Willard Van Orman Quine)

विलर्ड व्हॅन ओर्‌मन क्वाइन

क्वाइन, विलर्ड व्हॅन ओर्‌मन : (२५ जून १९०८—२५ डिसेंबर २०००). प्रसिद्ध अमेरिकन तर्कशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ. अमेरिकेच्या ओहायओ संस्थानात ॲक्रन येथे जन्म ...
विल्यम अर्नेस्ट जॉन्सन (W. E. Johnson)

विल्यम अर्नेस्ट जॉन्सन

जॉन्सन, विल्यम अर्नेस्ट : (२३ जून १८५८—१४ जानेवारी १९३१). प्रसिद्ध ब्रिटिश तर्कवेत्ता. जन्म केंब्रिज येथे. १९०२ पासून तो केंब्रिजमधील किंग्ज ...
विल्यम जेम्स (William James)

विल्यम जेम्स

जेम्स, विल्यम : (११ जानेवारी १८४२ –१९ ऑगस्ट १९१०). प्रसिद्ध अमेरिकन मानसशास्त्रज्ञ व फलप्रामाण्यवादाचा एक संस्थापक. जन्म न्यूयॉर्क येथे. पित्याचे ...
विल्यम ह्यूएल (William Whewell)

विल्यम ह्यूएल

ह्यूएल, विल्यम : (२४ मे १७९४—६ मार्च १८६६). इंग्रज तत्त्वज्ञ, गणितज्ञ आणि इतिहासकार. त्याचा जन्म जॉन ह्यूएल आणि एलिझाबेथ बेनिसन ...
वेल्टनशाउंग (Weltanschauung)

वेल्टनशाउंग

जर्मन भाषेतील ‘वेल्टनशाउंग’ ही संज्ञा इंग्रजीतील ‘वर्ल्ड-व्ह्यू’ या संकल्पनेशी नाते सांगणारी आहे. तिचे भाषांतर ‘जगत्-दर्शन’ असे करता येते. ‘वेल्ट’ म्हणजे ...