(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी सहायक : संतोष गेडाम
मानवी जीवनाच्या विविध अंगांचा व्यवस्थित रित्या अभ्यास करता यावा म्हणून वेगवेगळी सामाजिक शास्त्रे युरोपमध्ये सर्वप्रथम उदयाला आली. युरोपमध्ये ज्या क्रांत्या (प्रबोधन, विज्ञान, औधोगिक) झाल्या त्यानंतर सामाजिकशास्त्रे वेगाने विकसित झाली. ज्या प्रकारचे भौतिक वास्तव त्या त्या काळात असतात, त्या वास्तवानुसारच त्या त्या काळातील ज्ञानशाखा विकसित होत जातात. म्हणजे युरोपातील भांडवलशाही समाजाच्या गरजेनुसार सामाजिक शास्त्रे विकसित होत गेली. सुरुवातीच्या टप्प्यात ही सामाजिक शास्त्रे मूल्यात्मक, आदर्शवादी होती; तर दुसऱ्या टप्प्यात ती अनुभववादी तसेच वास्तववादी बनत गेली. या दोन्हीची समिक्षा पुढे चिकित्सकपणे केली गेली. भारतामध्ये समाजशास्त्राचा उदय हा वासाहतिक काळात झाल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यावर भारतातील समाजशास्त्रावर वसाहतवादी दृष्टीकोणाचा मोठा प्रभाव राहिला होता; परंतु नंतरच्या काळात मात्र एत्तदेशीय समाजशास्त्राच्या विकासाचे जे प्रयत्न झाले त्यात एकीकडे पौर्वात्यवादी, तर दुसरीकडे राष्ट्रवादी तत्त्व प्रणालींचा प्रभाव होता.

भारतीय समाजशास्त्राच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा १९६० च्या उतारार्धात पाहायला मिळतो. दलित चळवळ, स्त्री चळवळ, पर्यावरण चळवळ, शेतकरी आंदोलने, कामगार, भटक्या-विमुक्तांच्या व आदिवासींच्या चळवळीतून समाजशास्त्राच्या रूढ चौकटीला हादरे बसण्यास सुरुवात झाली. त्यातूनच सामाजशास्त्रापुढे समकालीन चिकित्सक, समग्र आकलनासाठी नव्या संकल्पना, नवे सिद्धांत, नवे पद्धतीशास्त्र व नवी तंत्र निर्माण करण्याचे आव्हान उभे राहिले.

आज जागतिकीकरणाच्या या टप्प्यावर आपला समाज ज्या गुंतागुंतीच्या, क्लिष्ट अशा प्रक्रियांनी वेढला आहे त्या संदर्भात समाजशास्त्राचे महत्त्व, उपयुक्तता समजून घेण्यासाठी व समाजातील गुंतागुतीच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र या ज्ञानशाखेतील नवनवीन संशोधनात्मक ज्ञान संकलित करणे अत्यावश्यक आहे.

या समाजशास्त्र ज्ञानमंडळाचा प्रमुख उद्देश हा समाजशास्त्रीय मुलभूत संकल्पना, सिद्धांत, पद्धती, जागतिक, भारतीय तसेच महाराष्ट्रातील सामाजशास्त्रज्ञ यांचा योगदानात्मक परिचय, समाजातील सामाजिक-सांस्कृतिक प्रश्न, समाजशास्त्रातील विविध दृष्टीकोन, महत्त्वपूर्ण ग्रंथ, संघटना-संस्था इत्यादी संदर्भातील विविध नोंदींच्या आधारावर समाजशास्त्राचा एक चिकित्सक व विमर्षात्मक ज्ञानशाखा म्हणून विकास घडवून आणणे हा आहे. त्याचबरोबर समाजातील विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, धोरणकर्ते, पत्रकार, संशोधक व अभ्यासक, तसेच सर्व सामान्य वाचक यांना एक महत्त्वपूर्ण असा समाजशास्त्रीय ज्ञानाचा स्रोत निर्माण करून देऊन चिकित्सक व ज्ञानसंपन्न समाजनिर्मितीस हातभार लावणे हासुद्धा उद्देश आहे.

संशोधन साहित्याचा आढावा (Review of Research Literature)

संशोधन साहित्याचा आढावा

दुय्यम स्रोतांचे अवलोकन करणे ही संशोधन कार्याची पूर्वतयारी असून यास शोधकार्याच्या प्रारंभीचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. दुय्यम साहित्याला मुख्यतः प्रकाशित ...
संस्कृतीकरण (Sanskritization)

संस्कृतीकरण

संस्कृतीकरण या शब्दाचे मूळ संस्कृत भाषेमध्ये आहे. या शब्दाचा वापर एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील यूरोपीयन प्राच्यविद्या परंपरेत उच्चभ्रूंच्या संस्कृतीचे वर्णन ...
सामाजिक चळवळ (Social Movement)

सामाजिक चळवळ

समाजातील काही महत्त्वपूर्ण घटक व व्यवस्था यांमध्ये समाजहिताच्या बाजूने बदल घडवून आणण्यासाठी अथवा त्यांमध्ये होणाऱ्या समाजघातक बदलांना संघटितपणे विरोध करण्यासाठी ...
सामाजिक न्याय (Social Justice)

सामाजिक न्याय

समाजमान्य मूल्यांवर अधिष्ठित असलेली न्यायाची संकल्पना म्हणजे सामाजिक न्याय होय. सामाजिक न्यायाबद्दल वेगवेगळी मते आहेत आणि ती सर्व वास्तववादी आहेत ...
सावित्रीबाई फुले (Savitribai Phule)

सावित्रीबाई फुले

फुले, सावित्रीबाई : (३ जानेवारी १८३१—१० मार्च १८९७). भारतातील पहिल्या शिक्षिका, भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या आणि आद्य आधुनिक विद्रोही ...
सी. राईट मिल्स (C. Wright Mills)

सी. राईट मिल्स

मिल्स, सी. राईट (Mills, C. Wright) : (२८ ऑगस्ट १९१६ – २० मार्च १९६२). प्रसिद्ध अमेरिकी समाजशास्त्रज्ञ आणि जहाल राजकीय ...
सुरजीतचंद्र सिन्हा (Surajit Chandra Sinha)

सुरजीतचंद्र सिन्हा

सिन्हा, सुरजीतचंद्र (Sinha, Surajit Chandra) : (१ ऑगस्ट १९२६ – २७ फेब्रुवारी २००२). प्रसिद्ध भारतीय मानवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म बंगालमधील नेत्रोकोना ...
स्टुअर्ट हॉल (Stuart Hall)

स्टुअर्ट हॉल

हॉल, स्टुअर्ट (Hall, Stuart) : (३ फेब्रुवारी १९३२ – १० फेब्रुवारी २०१४). प्रसिद्ध मार्क्सवादी समाजशास्त्रज्ञ, संस्कृती सिद्धान्तकार आणि राजकीय विश्लेशक ...
स्त्रीत्व (Femininity)

स्त्रीत्व

सामान्यत: स्त्रिया आणि मुलींशी संबंधित असलेले गुणधर्म, आचरण, विविध भूमिकांचा समूह म्हणजे स्त्रीत्व. यामध्ये स्त्रियांनी काय करावे?  कसे वागावे?  कसे ...
हुंडा पद्धती (Dowry System)

हुंडा पद्धती

विवाहाच्या वेळेस मौल्यवान वस्तू किंवा ठरलेली नगद रोख रक्कम प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात वधुपक्षाकडून वरपक्षास दिली जाते, त्याला रूढ अर्थाने हुंडा असे ...
Loading...