(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी सहायक : संतोष गेडाम
मानवी जीवनाच्या विविध अंगांचा व्यवस्थित रित्या अभ्यास करता यावा म्हणून वेगवेगळी सामाजिक शास्त्रे युरोपमध्ये सर्वप्रथम उदयाला आली. युरोपमध्ये ज्या क्रांत्या (प्रबोधन, विज्ञान, औधोगिक) झाल्या त्यानंतर सामाजिकशास्त्रे वेगाने विकसित झाली. ज्या प्रकारचे भौतिक वास्तव त्या त्या काळात असतात, त्या वास्तवानुसारच त्या त्या काळातील ज्ञानशाखा विकसित होत जातात. म्हणजे युरोपातील भांडवलशाही समाजाच्या गरजेनुसार सामाजिक शास्त्रे विकसित होत गेली. सुरुवातीच्या टप्प्यात ही सामाजिक शास्त्रे मूल्यात्मक, आदर्शवादी होती; तर दुसऱ्या टप्प्यात ती अनुभववादी तसेच वास्तववादी बनत गेली. या दोन्हीची समिक्षा पुढे चिकित्सकपणे केली गेली. भारतामध्ये समाजशास्त्राचा उदय हा वासाहतिक काळात झाल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यावर भारतातील समाजशास्त्रावर वसाहतवादी दृष्टीकोणाचा मोठा प्रभाव राहिला होता; परंतु नंतरच्या काळात मात्र एत्तदेशीय समाजशास्त्राच्या विकासाचे जे प्रयत्न झाले त्यात एकीकडे पौर्वात्यवादी, तर दुसरीकडे राष्ट्रवादी तत्त्व प्रणालींचा प्रभाव होता.

भारतीय समाजशास्त्राच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा १९६० च्या उतारार्धात पाहायला मिळतो. दलित चळवळ, स्त्री चळवळ, पर्यावरण चळवळ, शेतकरी आंदोलने, कामगार, भटक्या-विमुक्तांच्या व आदिवासींच्या चळवळीतून समाजशास्त्राच्या रूढ चौकटीला हादरे बसण्यास सुरुवात झाली. त्यातूनच सामाजशास्त्रापुढे समकालीन चिकित्सक, समग्र आकलनासाठी नव्या संकल्पना, नवे सिद्धांत, नवे पद्धतीशास्त्र व नवी तंत्र निर्माण करण्याचे आव्हान उभे राहिले.

आज जागतिकीकरणाच्या या टप्प्यावर आपला समाज ज्या गुंतागुंतीच्या, क्लिष्ट अशा प्रक्रियांनी वेढला आहे त्या संदर्भात समाजशास्त्राचे महत्त्व, उपयुक्तता समजून घेण्यासाठी व समाजातील गुंतागुतीच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र या ज्ञानशाखेतील नवनवीन संशोधनात्मक ज्ञान संकलित करणे अत्यावश्यक आहे.

या समाजशास्त्र ज्ञानमंडळाचा प्रमुख उद्देश हा समाजशास्त्रीय मुलभूत संकल्पना, सिद्धांत, पद्धती, जागतिक, भारतीय तसेच महाराष्ट्रातील सामाजशास्त्रज्ञ यांचा योगदानात्मक परिचय, समाजातील सामाजिक-सांस्कृतिक प्रश्न, समाजशास्त्रातील विविध दृष्टीकोन, महत्त्वपूर्ण ग्रंथ, संघटना-संस्था इत्यादी संदर्भातील विविध नोंदींच्या आधारावर समाजशास्त्राचा एक चिकित्सक व विमर्षात्मक ज्ञानशाखा म्हणून विकास घडवून आणणे हा आहे. त्याचबरोबर समाजातील विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, धोरणकर्ते, पत्रकार, संशोधक व अभ्यासक, तसेच सर्व सामान्य वाचक यांना एक महत्त्वपूर्ण असा समाजशास्त्रीय ज्ञानाचा स्रोत निर्माण करून देऊन चिकित्सक व ज्ञानसंपन्न समाजनिर्मितीस हातभार लावणे हासुद्धा उद्देश आहे.

डेव्हिड हार्डिमन (Devid Hardiman)

डेव्हिड हार्डिमन

हार्डिमन, डेव्हिड (Hardiman, Devid) : (ऑक्टोबर १९४७). अंकित जनसमुदाय किंवा निम्नस्तरीय जनसमुदाय अभ्यासाची सुरुवात करणाऱ्या संस्थापक सदस्यांपैकी एक आणि इतिहासकार. त्यांनी अंकित ...
देशीवाद (Nativism)

देशीवाद

परकीय प्रभावांच्या विरोधात देशी परंपरा, विचार, मूल्ये यांची पाठराखण करणे म्हणजे देशीवाद होय. मुळात देशीवाद ही एक सामाजिक, राजकीय, मानसिक ...
नमुना निवड (Sample Selection)

नमुना निवड

संशोधक संशोधन करताना माहितीच्या स्रोताचा जो एक लहान संच निश्चित करतो, त्यास नमुना निवड असे म्हणतात. नमुना निवड हे व्यक्ती ...
नर्मदा बचाओ आंदोलन (Narmada Bachao Andolan)

नर्मदा बचाओ आंदोलन

नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या मोठ्या धरणाविरोधातील शक्तीशाली जनआंदोलन. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९७० व १९८० च्या दशकांत अन्याय, अत्याचार, शोषण, पर्यावरण ...
नागरी समाज (Civil Society)

नागरी समाज

नागरी समाज ही संकल्पना उत्तर-पश्चिम यूरोपमध्ये पंधरा-सोळाव्या शतकापासून राज्यसंस्था व समाज यांमध्ये होऊ घातलेल्या दीर्घकालीन स्थित्यंतराचा परिपाक आहे. एकीकडे, तत्कालीन ...
निरीक्षण पद्धत (Observation Method)

निरीक्षण पद्धत

निरीक्षण या तंत्राला वैज्ञानिक अथवा शास्त्रीय पद्धती म्हटले जाते. निरीक्षण केवळ वैज्ञानिक संशोधनाचा महत्त्वाचा मूलाधार नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनाला ...
नीरा देसाई (Neera Desai)

नीरा देसाई

देसाई, नीरा (Desai, Neera) : ( १९२५ – २५ जून २००९ ). प्रसिद्ध भारतीय समाजशास्त्रज्ञ. स्वतंत्र भारतामध्ये ज्या अनेक विदुषींनी ...
पंडिता रमाबाई (Pandita Ramabai)

पंडिता रमाबाई

रमाबाई, पंडिता (Pandita, Ramabai) : (२३ एप्रिल १८५८ – ५ एप्रिल १९२२). स्त्रियांच्या-विशेषतः परित्यक्त्या, पतिता व विधवांच्या-सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने कार्यरत ...
पर्यावरणीय स्त्रीवाद (Ecofeminism)

पर्यावरणीय स्त्रीवाद

पाश्चिमात्य देशातील औद्योगिकीकरणाच्या अपरिहार्य परिणामातून पृथ्वीचा नैसर्गिक, जैविक व भौगोलिक समतोल बिघडून त्याचे गंभीर परिणाम मानवी जीवनावर झाल्यामुळे पर्यावरणीय स्त्रीवाद ...
पितृसत्ता (Patriarchy)

पितृसत्ता

पितृसत्ता ही एक सामाजिक रचना असून ती पुरुषांचे वर्चस्व आणि श्रेष्ठत्व या कल्पनेवर आधारित आहे. ‘पित्याची सत्ता’ असा पितृसत्तेचा अर्थ ...
पुनर्वसन आणि पुनर्स्थापना (Rehabilitation and Resettlement)

पुनर्वसन आणि पुनर्स्थापना

शासन अथवा शासनपुरस्कृत खाजगी संस्थेद्वारा एखाद्या ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पामुळे अथवा त्या ठिकाणी वारंवार येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे तेथील लोकांचे दुसऱ्या ...
पुरुषत्व (Masculinity)

पुरुषत्व

एखाद्या सामाजिक, आर्थिक, राजकीय संदर्भात घडली गेलेली पुरुष म्हणून ओळख म्हणजे पुरुषत्व. पुरुषत्व हे एक समाजरचित आहे. यातून केवळ स्त्री-पुरुष ...
पॅट्रिक गेडिस (Patrik Geddes)

पॅट्रिक गेडिस

गेडिस, पॅट्रिक (Geddes, Patrik) : (२ ऑक्टोबर १८५४—१७ एप्रिल १९३२). आधुनिक स्कॉटिश जीववैज्ञानिक, समाजशास्त्रज्ञ, पर्यावरणवादी, भूगोलज्ञ व नगररचनाकार. त्यांचा जन्म बॅलटर ...
पॅट्रीशिया हिल कॉलिन्स (Patricia Hill Collins)

पॅट्रीशिया हिल कॉलिन्स

कॉलिन्स, पॅट्रीशिया हिल (Collins, Patricia Hill) : (१ मे १९४८). प्रसिद्ध अमेरिकन समाजशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म फिलाडेल्फिया येथे झाला. त्या अमेरिकेतील ख्यातनाम अभ्यासिका ...
प्रतिकात्मक भांडवल (Symbolic Capital)

प्रतिकात्मक भांडवल

व्यक्तीला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक या तीन प्रकारच्या भांडवलांपासून जो लौकिक, प्रतिष्ठा, सन्मान प्राप्त होतो, त्याला प्रतिकात्मक भांडवल म्हणतात. प्रतिकात्मक ...
प्रतिकात्मक हिंसा (Symbolic Violence)

प्रतिकात्मक हिंसा

हिंसा ही एक कृती आहे. बहुतांश वेळा ती ताकतवर पक्षाकडून बळाचा वापर करून दुबळ्या पक्षावर त्याची सत्ता, नियंत्रण, असमानता टिकवून ...
प्रभुत्वशाली जात (Dominant Caste)

प्रभुत्वशाली जात

ग्रामीण भारतातील सामाजिक जीवनाची संरचना आणि गतिशीलता समजून घेण्यासाठीची एक महत्त्वाची संकल्पना. भारताच्या ग्रामीण सामाजिक जीवनातील एक महत्त्वाचा घटक म्हणून ...
फ्रँकफर्ट स्कूल (Frankfurt School)

फ्रँकफर्ट स्कूल

चिकित्सक सिद्धांतांची मांडणी करणारा एक प्रमुख संप्रदाय. सामाजिक घटनांचे विश्लेषण विविध सिद्धांताद्वारा केले जाते. मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांताना तत्कालीन समाजाच्या ...
बलात्कार (Rape)

बलात्कार

एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला तिच्या इच्छेविरुद्ध अथवा जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडते, तेव्हा त्यास बलात्कार समजले जाते. बलात्कार हा ...
बाल हक्क (Child Rights)

बाल हक्क

साधारणतः एकविसाव्या शतकाच्या आरंभी अमेरिकेसह जगभरात बालकल्याण या विषयाला अधिक गांभीर्याने पाहीले गेले आणि त्याचे महत्त्व जगाच्या पटलावरती नोंदविले गेले. ...