(प्रस्तावना) पालकसंस्था : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, उपकेंद्र लातूर | समन्वयक : अनिलकुमार जायभाये | विद्याव्यासंगी सहायक : संतोष गेडाम
मानवी जीवनाच्या विविध अंगांचा व्यवस्थित रित्या अभ्यास करता यावा म्हणून वेगवेगळी सामाजिक शास्त्रे युरोपमध्ये सर्वप्रथम उदयाला आली. युरोपमध्ये ज्या क्रांत्या (प्रबोधन, विज्ञान, औधोगिक) झाल्या त्यानंतर सामाजिकशास्त्रे वेगाने विकसित झाली. ज्या प्रकारचे भौतिक वास्तव त्या त्या काळात असतात, त्या वास्तवानुसारच त्या त्या काळातील ज्ञानशाखा विकसित होत जातात. म्हणजे युरोपातील भांडवलशाही समाजाच्या गरजेनुसार सामाजिक शास्त्रे विकसित होत गेली. सुरुवातीच्या टप्प्यात ही सामाजिक शास्त्रे मूल्यात्मक, आदर्शवादी होती; तर दुसऱ्या टप्प्यात ती अनुभववादी तसेच वास्तववादी बनत गेली. या दोन्हीची समिक्षा पुढे चिकित्सकपणे केली गेली. भारतामध्ये समाजशास्त्राचा उदय हा वासाहतिक काळात झाल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यावर भारतातील समाजशास्त्रावर वसाहतवादी दृष्टीकोणाचा मोठा प्रभाव राहिला होता; परंतु नंतरच्या काळात मात्र एत्तदेशीय समाजशास्त्राच्या विकासाचे जे प्रयत्न झाले त्यात एकीकडे पौर्वात्यवादी, तर दुसरीकडे राष्ट्रवादी तत्त्व प्रणालींचा प्रभाव होता.
भारतीय समाजशास्त्राच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा १९६० च्या उतारार्धात पाहायला मिळतो. दलित चळवळ, स्त्री चळवळ, पर्यावरण चळवळ, शेतकरी आंदोलने, कामगार, भटक्या-विमुक्तांच्या व आदिवासींच्या चळवळीतून समाजशास्त्राच्या रूढ चौकटीला हादरे बसण्यास सुरुवात झाली. त्यातूनच सामाजशास्त्रापुढे समकालीन चिकित्सक, समग्र आकलनासाठी नव्या संकल्पना, नवे सिद्धांत, नवे पद्धतीशास्त्र व नवी तंत्र निर्माण करण्याचे आव्हान उभे राहिले.
आज जागतिकीकरणाच्या या टप्प्यावर आपला समाज ज्या गुंतागुंतीच्या, क्लिष्ट अशा प्रक्रियांनी वेढला आहे त्या संदर्भात समाजशास्त्राचे महत्त्व, उपयुक्तता समजून घेण्यासाठी व समाजातील गुंतागुतीच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र या ज्ञानशाखेतील नवनवीन संशोधनात्मक ज्ञान संकलित करणे अत्यावश्यक आहे.
या समाजशास्त्र ज्ञानमंडळाचा प्रमुख उद्देश हा समाजशास्त्रीय मुलभूत संकल्पना, सिद्धांत, पद्धती, जागतिक, भारतीय तसेच महाराष्ट्रातील सामाजशास्त्रज्ञ यांचा योगदानात्मक परिचय, समाजातील सामाजिक-सांस्कृतिक प्रश्न, समाजशास्त्रातील विविध दृष्टीकोन, महत्त्वपूर्ण ग्रंथ, संघटना-संस्था इत्यादी संदर्भातील विविध नोंदींच्या आधारावर समाजशास्त्राचा एक चिकित्सक व विमर्षात्मक ज्ञानशाखा म्हणून विकास घडवून आणणे हा आहे. त्याचबरोबर समाजातील विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, धोरणकर्ते, पत्रकार, संशोधक व अभ्यासक, तसेच सर्व सामान्य वाचक यांना एक महत्त्वपूर्ण असा समाजशास्त्रीय ज्ञानाचा स्रोत निर्माण करून देऊन चिकित्सक व ज्ञानसंपन्न समाजनिर्मितीस हातभार लावणे हासुद्धा उद्देश आहे.
व्यक्तीच्या आयुष्यात कामाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यक्ती आपली उपजीविका किंवा उदरनिर्वाह करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारचे काम करीत असतो.
सर्वसामान्यपणे, ...
एखाद्या देवतेच्या उत्सवासाठी अथवा एखाद्या सत्पुरुषाच्या जयंती वा पुण्यतिथी उत्सवासाठी अथवा एखाद्या तीर्थक्षेत्री वर्षातून ठराविक दिवशी वा ठराविक कालानंतर गावोगावच्या ...
भूधारणा. जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क असणे व तिच्याबाबतीत सर्व निर्णय घेण्याची सत्ता असणे म्हणजे जमीनधारणा होय. ती एक व्यवस्था किंवा ...
हार्डिमन, डेव्हिड (Hardiman, Devid) : (ऑक्टोबर १९४७). अंकित जनसमुदाय किंवा निम्नस्तरीय जनसमुदाय अभ्यासाची सुरुवात करणाऱ्या संस्थापक सदस्यांपैकी एक
आणि इतिहासकार. त्यांनी अंकित ...
रमाबाई, पंडिता (Pandita, Ramabai) : (२३ एप्रिल १८५८ – ५ एप्रिल १९२२). स्त्रियांच्या-विशेषतः परित्यक्त्या, पतिता व विधवांच्या-सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने कार्यरत ...
पाश्चिमात्य देशातील औद्योगिकीकरणाच्या अपरिहार्य परिणामातून पृथ्वीचा नैसर्गिक, जैविक व भौगोलिक समतोल बिघडून त्याचे गंभीर परिणाम मानवी जीवनावर झाल्यामुळे
पर्यावरणीय स्त्रीवाद ...
ऐतिहासिक घटनांमधील साक्षीदारांकडून त्यांच्या स्मृतींवर आधारित माहिती गोळा करणे व त्यांचे विश्लेषण करणे म्हणजे मौखिक इतिहास होय. ही क्रिया एका ...
दर हजार पुरुषांमागे लोकसंख्येत असलेले स्त्रियांचे प्रमाण म्हणजे लिंगगुणोत्तर. कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप वजा केला, तर नैसर्गिक रित्या दर १०० ...
लैंगिक छळ हा स्त्रीच्या इच्छेविरुद्ध केलेली लैंगिक मागणी, शारीरिक, शाब्दिक अथवा अशाब्दिक कृतींशी संबंधित आहे. लैंगिक छळामध्ये एक अथवा एकापेक्षा ...
समाजातील काही महत्त्वपूर्ण घटक व व्यवस्था यांमध्ये समाजहिताच्या बाजूने बदल घडवून आणण्यासाठी अथवा त्यांमध्ये होणाऱ्या समाजघातक बदलांना संघटितपणे विरोध
करण्यासाठी ...
समाजमान्य मूल्यांवर अधिष्ठित असलेली न्यायाची संकल्पना म्हणजे सामाजिक न्याय होय. सामाजिक न्यायाबद्दल वेगवेगळी मते आहेत आणि ती सर्व वास्तववादी आहेत ...