(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी सहायक : संतोष गेडाम
मानवी जीवनाच्या विविध अंगांचा व्यवस्थित रित्या अभ्यास करता यावा म्हणून वेगवेगळी सामाजिक शास्त्रे युरोपमध्ये सर्वप्रथम उदयाला आली. युरोपमध्ये ज्या क्रांत्या (प्रबोधन, विज्ञान, औधोगिक) झाल्या त्यानंतर सामाजिकशास्त्रे वेगाने विकसित झाली. ज्या प्रकारचे भौतिक वास्तव त्या त्या काळात असतात, त्या वास्तवानुसारच त्या त्या काळातील ज्ञानशाखा विकसित होत जातात. म्हणजे युरोपातील भांडवलशाही समाजाच्या गरजेनुसार सामाजिक शास्त्रे विकसित होत गेली. सुरुवातीच्या टप्प्यात ही सामाजिक शास्त्रे मूल्यात्मक, आदर्शवादी होती; तर दुसऱ्या टप्प्यात ती अनुभववादी तसेच वास्तववादी बनत गेली. या दोन्हीची समिक्षा पुढे चिकित्सकपणे केली गेली. भारतामध्ये समाजशास्त्राचा उदय हा वासाहतिक काळात झाल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यावर भारतातील समाजशास्त्रावर वसाहतवादी दृष्टीकोणाचा मोठा प्रभाव राहिला होता; परंतु नंतरच्या काळात मात्र एत्तदेशीय समाजशास्त्राच्या विकासाचे जे प्रयत्न झाले त्यात एकीकडे पौर्वात्यवादी, तर दुसरीकडे राष्ट्रवादी तत्त्व प्रणालींचा प्रभाव होता.

भारतीय समाजशास्त्राच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा १९६० च्या उतारार्धात पाहायला मिळतो. दलित चळवळ, स्त्री चळवळ, पर्यावरण चळवळ, शेतकरी आंदोलने, कामगार, भटक्या-विमुक्तांच्या व आदिवासींच्या चळवळीतून समाजशास्त्राच्या रूढ चौकटीला हादरे बसण्यास सुरुवात झाली. त्यातूनच सामाजशास्त्रापुढे समकालीन चिकित्सक, समग्र आकलनासाठी नव्या संकल्पना, नवे सिद्धांत, नवे पद्धतीशास्त्र व नवी तंत्र निर्माण करण्याचे आव्हान उभे राहिले.

आज जागतिकीकरणाच्या या टप्प्यावर आपला समाज ज्या गुंतागुंतीच्या, क्लिष्ट अशा प्रक्रियांनी वेढला आहे त्या संदर्भात समाजशास्त्राचे महत्त्व, उपयुक्तता समजून घेण्यासाठी व समाजातील गुंतागुतीच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र या ज्ञानशाखेतील नवनवीन संशोधनात्मक ज्ञान संकलित करणे अत्यावश्यक आहे.

या समाजशास्त्र ज्ञानमंडळाचा प्रमुख उद्देश हा समाजशास्त्रीय मुलभूत संकल्पना, सिद्धांत, पद्धती, जागतिक, भारतीय तसेच महाराष्ट्रातील सामाजशास्त्रज्ञ यांचा योगदानात्मक परिचय, समाजातील सामाजिक-सांस्कृतिक प्रश्न, समाजशास्त्रातील विविध दृष्टीकोन, महत्त्वपूर्ण ग्रंथ, संघटना-संस्था इत्यादी संदर्भातील विविध नोंदींच्या आधारावर समाजशास्त्राचा एक चिकित्सक व विमर्षात्मक ज्ञानशाखा म्हणून विकास घडवून आणणे हा आहे. त्याचबरोबर समाजातील विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, धोरणकर्ते, पत्रकार, संशोधक व अभ्यासक, तसेच सर्व सामान्य वाचक यांना एक महत्त्वपूर्ण असा समाजशास्त्रीय ज्ञानाचा स्रोत निर्माण करून देऊन चिकित्सक व ज्ञानसंपन्न समाजनिर्मितीस हातभार लावणे हासुद्धा उद्देश आहे.

बाल हक्क (Child Rights)

बाल हक्क

साधारणतः एकविसाव्या शतकाच्या आरंभी अमेरिकेसह जगभरात बालकल्याण या विषयाला अधिक गांभीर्याने पाहीले गेले आणि त्याचे महत्त्व जगाच्या पटलावरती नोंदविले गेले. ...
बेल हुक्स (bell hooks)

बेल हुक्स

हुक्स, बेल (hooks, bell) : (२५ सप्टेंबर १९५२ – १५ डिसेंबर २०२१). प्रसिद्ध स्त्रीवादी कार्यकर्त्या, अभ्यासक आणि संशोधक. काळ्या स्त्रीवादाच्या ...
भावनिक श्रम (Emotional Labour)

भावनिक श्रम

कामाच्या ठिकाणी व्यावसायिक भूमिकेचा भाग म्हणून कामगार जे आपल्या भावनांचे नियोजन आणि व्यवस्थापन करतात, त्याला भावनिक श्रम असे म्हणतात. श्रम ...
भ्रष्टाचार (Corruption)

भ्रष्टाचार

एखाद्या व्यक्तिने आर्थिक लाभाकरिता अथवा स्वत:च्या मानसिक समाधानाकरिता अथवा स्वहिताकरिता आपल्या कर्तव्याची जाण न ठेवता दुसऱ्या व्यक्तिला अनैतिकपणे दिलेला त्रास ...
मनोहर भिकाजी चिटणीस (M. B. Chitnis)

मनोहर भिकाजी चिटणीस

चिटणीस, म. भि. : (११ नोव्हेंबर १९०७ – १४ नोव्हेंबर १९८३). महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि डॉ ...
मैत्रेयी चौधरी (Maitrayee Chaudhuri)

मैत्रेयी चौधरी

चौधरी, मैत्रेयी : ( २९ सप्टेंबर १९५६ ). प्रसिद्ध भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि स्त्री अभ्यासक. मैत्रेयी यांचा जन्म मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात ...
मौखिक इतिहास (Oral History)

मौखिक इतिहास

ऐतिहासिक घटनांमधील साक्षीदारांकडून त्यांच्या स्मृतींवर आधारित माहिती गोळा करणे व त्यांचे विश्लेषण करणे म्हणजे मौखिक इतिहास होय. ही क्रिया एका ...
योगेश अटल (Yogesh Atal)

योगेश अटल

अटल, योगेश (Atal, Yogesh) : (१ ऑक्टोबर १९३७ – १३ एप्रिल २०१८). प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ. अटल यांचा जन्म राजस्थानमधील उदयपूर या शहरात ...
राजकीय अर्थकारण (Political Economy)

राजकीय अर्थकारण

व्यापार, विनिमय, पैसा आणि कर यांचे नियमन करण्यासाठी सरकारनी केलेले उपाययोजना म्हणजे राजकीय अर्थकारण. यास आज आर्थिक धोरण असे म्हटले ...
राज्य (State)

राज्य

पुरातन काळापासून चालत आलेली एक संस्था. माणसाला जेव्हापासून समाज करून राहण्याची गरज भासू लागली, तेव्हापासून त्यांना राज्याची गरज निर्माण झाली ...
लक्षकेंद्री गट चर्चा (Focus Group Discussion)

लक्षकेंद्री गट चर्चा

लक्षकेंद्री गट चर्चा ही गुणात्मक संशोधनामध्ये वापरण्यात येणाऱ्या पद्धतींपैकी एक पद्धत आहे. विल्किन्सन यांच्या मते, एका विशिष्ट विषयाबद्दल निवडलेल्या व्यक्तींच्या ...
लिंग गुणोत्तर (Sex Ratio)

लिंग गुणोत्तर

दर हजार पुरुषांमागे लोकसंख्येत असलेले स्त्रियांचे प्रमाण म्हणजे लिंगगुणोत्तर. कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप वजा केला, तर नैसर्गिक रित्या दर १०० ...
लिंगभाव (Gender)

लिंगभाव

स्त्रिया आणि पुरुष यांच्या शरीररचनांमध्ये फरक आहे; पण समाजामध्ये स्त्रिया आणि पुरुषांबाबत जे भेदभाव केले जातात, त्या सर्वांचे कारण आपल्याला ...
लिंगभाव आणि विकास (Gender and Development)

लिंगभाव आणि विकास

लिंगभाव आणि विकास हा एक आर्थिक व सामाजिक दृष्टिकोण आहे. लिंगभाव आणि विकास हा दृष्टिकोण लिंगभाव संबंधाच्या परिप्रेक्ष्यातून सर्व सामाजिक, ...
लुई पियरे अल्थ्यूजर (Louis Pierre Althusser)

लुई पियरे अल्थ्यूजर

अल्थ्यूजर, लुई पियरे (Althusser, Louis Pierre) : (१६ ऑक्टोबर १९१८ – २२ ऑक्टोबर १९९०). विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध फ्रेंच संरचनात्मक ...
लैंगिक छळ (Sexual Harassment)

लैंगिक छळ

लैंगिक छळ हा स्त्रीच्या इच्छेविरुद्ध केलेली लैंगिक मागणी, शारीरिक, शाब्दिक अथवा अशाब्दिक कृतींशी संबंधित आहे. लैंगिक छळामध्ये एक अथवा एकापेक्षा ...
लैंगिकता (Sexuality)

लैंगिकता

लैंगिकता ही केवळ लैंगिकसंबंधापुरती मर्यादित नसून ती लैंगिक इच्छा, आकांक्षा, विचार, अस्मिता, ओळख सत्तासंबंध इत्यादी बाबींशी संबंधित आहे. लैंगिकता विविध ...
लोकालेख (Ethnography)

लोकालेख

एखादा लोक समुदाय किंवा त्यांच्या संस्कृतीबद्दलचे लेखण म्हणजे लोकालेख. याला लोकजीवनशास्त्र असेही म्हणतात. लोकालेखामध्ये निरीक्षण आणि सहभाग या दोन महत्त्वाच्या ...
विस्थापन आणि विकासप्रकल्प (Displacement and Development Project)

विस्थापन आणि विकासप्रकल्प

व्यक्तिच्या उपलब्ध असलेल्या क्षेत्रीय स्रोतांच्या वापराचे हक्क आणि वास्तव्याच्या ठिकाणास सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्याच्या प्रक्रियेला विस्थापन म्हणतात. ज्यामुळे व्यक्तिला ...
शिवाजीराव पटवर्धन (Shiwajirao Patwardhan)

शिवाजीराव पटवर्धन

पटवर्धन, शिवाजीराव : (२२ डिसेंबर, १८९२ – ७ मे, १९८६). दाजीसाहेब पटवर्धन. थोर स्वातंत्र्यसेनानी, नामवंत धन्वंतरी आणि कुष्ठरोग निवारणासाठी उभ्या ...