(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : शिल्पा चं. भारस्कर
जीवशास्त्र/जीवविज्ञान या विज्ञानशाखेत सर्व जीवांसंबंधीच्या संपूर्ण माहितीचे संकलन आणि त्या माहितीचा व्यावहारिक उपयोग करण्यासंबंधीचे मार्गदर्शन यांचा अंतर्भाव होतो. मनुष्यासह सर्व जीवांविषयी संपूर्ण ज्ञान मिळविणे हे जीवविज्ञानाचे उद्दिष्ट आहे, त्यामुळे ही विज्ञानशाखा सर्व विज्ञानशाखांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अधिक विशिष्ट, सखोल व चिकित्सापूर्ण अभ्यासाच्या दृष्टीने जीवविज्ञानाची अनेक उपविभाग व शाखा यांमध्ये वर्गवारी केली जाते. या प्रत्येक शाखेत प्राणी वा वनस्पती यांचा भिन्न दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. या स्वतंत्रपणे केलेल्या अभ्यासाची माहिती अनुक्रमे ‘वनस्पतिविज्ञान’ आणि ‘प्राणिविज्ञान’ या दोन प्रमुख मोठ्या शाखांमध्ये दिली जाते. शाखाविस्तार लक्षात घेऊन वनस्पतिविज्ञान व प्राणिविज्ञान या विषयांची स्वतंत्र ज्ञानमंडळे तयार करण्यात आली आहेत. ‘जीवशास्त्र-प्राणिविज्ञान’ या ज्ञानमंडळांतर्गत प्राणिविज्ञान, सूक्ष्मजीवविज्ञान, जीवरसायनशास्त्र व जैवतंत्रज्ञान या विषयांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.

प्राण्यांचा सर्वांगीण अभ्यास केल्या जाणाऱ्या प्राणिविज्ञान या विज्ञानशाखेच्या शारीर, शरीरक्रियाविज्ञान, आकारविज्ञान, कोशिकाविज्ञान, प्राणिभूगोल इत्यादी विविध उपशाखा आहेत. या उपशाखांच्या अनुषंगाने विविध अभ्यासपद्धतींचा अवलंब केला जातो. मानवी वैद्यक, पशुवैद्यक, सार्वजनिक आरोग्य, कृषिविज्ञान, प्राणिजातींचे संरक्षण व संवर्धन ह्या सर्वांसाठी प्राणिविज्ञानाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. सूक्ष्मजीवांची ओळख, त्यांचे वर्गीकरण, संरचना व कार्य तसेच सूक्ष्मजीवांचा इतर सृष्टीवर होणारा परिणाम इत्यादींचा अभ्यास सूक्ष्मजीवविज्ञान या शाखेत केला जातो. सूक्ष्मजंतुविज्ञान, आदिजीवविज्ञान, विषाणुविज्ञान या सूक्ष्मजीवविज्ञानाच्या प्रमुख उपशाखा आहेत. चयापचय, प्रकाशसंश्लेषण, जनुकक्रिया इत्यादींसारख्या मूलभूत जैव प्रक्रियांचा अभ्यास करताना वैज्ञानिकांना मूलभूत प्रायोगिक साधन म्हणून मुख्यत सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो.

जीवरसायनशास्त्र हे जीवविज्ञान, भौतिकी, रसायनशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान या विषयांशी निगडित असलेले शास्त्र असून त्यामध्ये सजीव घटकांच्या रासायनिक विश्लेषण व रासायनिक स्थित्यंतर यांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे सजीव सृष्टीचा अभ्यास करताना या शास्त्रातील नवनवीन संशोधन अत्यंत महत्त्वाचे ठरते. जैवतंत्रज्ञान ही वेगाने विकसित होत असलेली आधुनिक विज्ञानातील एक महत्त्वाची शाखा आहे. यात सजीवांमधील जैविक तत्त्वे आणि प्रक्रिया यांचा वापर करून नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले जाते. रेणू पातळीवर आधारित असलेले हे शास्त्र मुख्यत्वेकरून कृषि, आरोग्य व पर्यावरण या विज्ञानशाखांशी संबंधित आहे. या शाखांशी निगडित विविध क्षेत्रांमध्ये जैवतंत्रज्ञानामुळे क्रांतिकारक बदल घडून येत आहेत. एकूणच मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी या सर्व विषयांचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. यासाठी जीवशास्त्र-प्राणिविज्ञान या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून या ज्ञानशाखांची माहिती सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

सहजात संस्करण, पक्ष्यांचे  (Imprinting mechanism in Birds )

सहजात संस्करण, पक्ष्यांचे 

प्राणी किंवा पक्षी जन्मल्यानंतर त्यास स्वत:ची ओळख होणे, आपल्या जन्मदात्याशी किंवा पालकाशी स्नेहबंध निर्माण होणे याला सहजात संस्करण असे म्हणतात ...
सागरी कोळंबी  (Indian Prawn)

सागरी कोळंबी 

सागरी कोळंबी (फेन्नेरोपिनियस इंडिकस) संधिपाद संघातील कवचधारी क्रस्टेशिया (Crustacea) वर्गातील मॅलॅकोस्ट्रॅका (Malacostraca) उपवर्गातील (मऊ कवच असणारे कवचधारी प्राणी) डेकॅपोडा गणातील ...
साळुंकी (common myna; Indian myna)

साळुंकी

साळुंकी (ॲक्रिडोथिरिस ट्रायस्टिस) पक्षिवर्गाच्या स्टर्निडी (Sturnidae) कुलातील पॅसेरिफॉर्मीस (Passeriformes) गणामध्ये या पक्ष्याचा समावेश होतो. हा पक्षी सामान्य मैना वा भारतीय ...
स्वादुपिंड (Pancreas)

स्वादुपिंड

स्वादुपिंड : स्थान व रचना. मानवी पचन संस्थेतील अन्नमार्गालगत असणारी विकरे व संप्रेरके स्रवणारी ही एक महत्त्वाची ग्रंथी आहे. या ...
हिमदंश (Frostbite)

हिमदंश

मानवामध्ये त्वचा किंवा शरीराच्या इतर भागाचे तापमान हिमवर्षाव, हिमवादळ, अतिशीत पाण्याचा संपर्क यांमुळे अत्यंत कमी झाले तर हिमदंशाची लक्षणे आढळतात ...
हीमोग्लोबिन : रसायनशास्त्र (The Chemistry of Hemoglobin)

हीमोग्लोबिन : रसायनशास्त्र

हीमोग्लोबिन हे एक संयुक्त प्रथिन (Conjugate protein) आहे. त्याच्या रंगावरून त्याला क्रोमोप्रोटीन (Chromoprotein) असेही म्हणतात. हीमोग्लोबिनच्या संयुक्त रेणूमध्ये ‘हीम’ या ...
हीमोफिलिया/रक्तस्रावी रोग (Hemophilia)

हीमोफिलिया/रक्तस्रावी रोग

हीमोफिलिया सामान्य व्यक्तीच्या रक्तामध्ये रक्त गोठण्यासाठी आवश्यक बारा घटक असतात. या बारा घटकांपैकी घटक-VIII (आठ) हीमोफिलिया घटक X या लिंग ...