चहा (Tea)

केवळ पानांच्या उत्पादनासाठी ज्यांची लागवड केली जाते अशा काही वनस्पतींमध्ये चहाच्या वनस्पतीला विशेष स्थान आहे. ही वनस्पती थीएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कॅमेलिया सायनेन्सिस आहे. या वनस्पतीच्या पानांपासून जे…

धातु (आयुर्वेद) (Dhatu-Ayurveda)

आयुर्वेदानुसार ‘धातु’ या शब्दाचा अर्थ शरीराला धारण करणारे घटक असा होतो. ‘धातु’ शब्दातील ‘धृ-धारयति’ या क्रियापदाचा अर्थ धारण करणे, पोषण करणे असा होतो. शरीरातील असे घटक जे शरीराला आधारभूत आहेत,…

चातक (Pied crested cuckoo)

कोकिळा, पावशा वगैरे पक्ष्यांबरोबरच चातक या पक्ष्याचाही क्युक्युलिडी कुलात समावेश होत असून तो आफ्रिका व आशिया खंडांत आढळतो. त्याच्या प्रमुख तीन उपजाती पायका, सीरेटस व याकोबिनस मानल्या जातात. पायका ही…

चाकवत (White goosefoot)

एक प्रकारची पालेभाजी. ही वर्षायू वनस्पती ॲमरँटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव चिनोपोडियम आल्बम आहे. जगभर सर्वत्र या ओषधीची लागवड केली जाते. भारतात ती सस.पासून ४,२०० मी. उंचीपर्यंत सर्वत्र लागवडीखाली…

ऑस्ट्रॅलोपिथेकस अनामेन्सिस (Australopithecus anamensis)

ऑस्ट्रॅलोपिथेकस अनामेन्सिस ही ऑस्ट्रॅलोपिथेकस पराजातींमधील सर्वांत अगोदर उत्क्रांत झालेली प्रजात. या प्रजातीचे जीवाश्म ४२ ते ३९ लक्षवर्षपूर्व या काळातील असून ती सर्वसाधारपणे आर्डीपिथेकस रमिडस या प्रजातीची समकालीन (४४ ते ४२…

चाफा (Champaka)

‘चाफा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सदाहरित वनस्पती वेगवेगळ्या कुलांतील असून त्यांपैकी काही एकदलिकित तर काही व्दिदलिकित आहेत. या वनस्पतींना विविध रंगांची फुले येतात आणि या फुलांना स्वत:चा खास सुगंध असतो.…

हौसा (Hausa)

पश्चिम आफ्रिकेतील एक कृष्णवर्णीय मोठा वांशिक समूह. त्यांची वस्ती प्रामुख्याने उत्तर नायजेरिया आणि दक्षिण नायजर या प्रदेशांत आढळते. यांशिवाय सूदान भागात तसेच आजूबाजूच्या देशांत (विशेषतः लिबिया, लागोस) ते अल्पसंख्याक आहेत.…

हडसन सामुद्रधुनी (Hudson Strait)

कॅनडास्थित लॅब्रॅडॉर समुद्र आणि हडसन उपसागर यांना जोडणारी सामुद्रधुनी. या सामुद्रधुनीच्या पश्चिमेस हडसन उपसागर, पूर्वेस लॅब्रॅडॉर समुद्र, दक्षिणेस कॅनडाचा क्वीबेक प्रांत, तर उत्तरेस बॅफिन बेट आहे. लॅब्रॅडॉर समुद्र हा उत्तर अटलांटिक…

कॅनडिअन नदी (Canadian River)

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील आर्कॅन्सॉ नदी (Arkansas River) ची सर्वांत लांब उपनदी. कॅनडिअन नदीचा उगम कोलोरॅडो राज्यातील लास ॲनमस परगण्यात स. स.पासून सु. २,९०० मी.  उंचीवर होतो. हे स्थान रॉकी पर्वतरांगांमधील…

चामखीळ (Wart)

त्वचेच्या पृष्ठभागावर वाढलेले लहान व खडबडीत अर्बुद. त्वचेच्या वेगवेगळ्या भागांवर प्रामुख्याने हात व बोटांची मागील बाजू, चेहरा, टाळू, पायाचा तळवा इत्यादींवर विविध आकारांच्या आणि आकारमानांच्या चामखिळी वाढू शकतात. काही वेळा…

चारोळी (Chironji tree)

चारोळी हा वृक्ष ॲनाकार्डिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव बूखनॅनिया लँझान आहे. आंबा व काजू या वनस्पतीदेखील या कुलातील आहेत. भारत, म्यानमार, कंबोडिया, चीन व थायलंड या देशांमध्ये चारोळी वृक्षाचा…

चास (Indian roller)

उड्डाण करताना कौशल्यपूर्ण कसरती करणारा कोरॅसिइडी कुलातील एक पक्षी. इराण, इराकपासून पाकिस्तान, भारत, श्रीलंका, म्यानमार, चीनचा काही भाग तसेच आग्नेय आशियातील देश अशा विस्तृत भागांत हे पक्षी आढळतात. यांच्या अन्य…

चिंकारा (Indian gazelle)

चिंकारा या समखुरी प्राण्याचा समावेश स्तनी वर्गाच्या बोव्हिडी कुलाच्या अँटिलोपिनी उपकुलात केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव गॅझेला गॅझेला आहे. भारत, बांगला देश, इराण व पाकिस्तान या देशांच्या गवताळ आणि वाळवंटी…

आम

आम ही आयुर्वेदातील वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे. आम याचा शब्दश: अर्थ अर्धवट पचलेले किंवा कच्चे असा आहे. शरीराचे पोषण होण्यासाठी घेतलेल्या आहाराचे प्रथम रस धातूत रूपांतर होते. शरीराला मुर्त रूप देणाऱ्या…

बसून (Bassoon)

पाश्चात्त्य संगीतपरंपरेतील ओबो वाद्यकुलातील, कंपित-वायुस्तंभ-वर्गातील एक वाद्य. त्यास जर्मन ‘फॅगॉट’ व इटालियन ‘फागोत्तो’ अशा संज्ञा आहेत. याशिवाय याचे स्टँडर्ड, डबल बसून, डिस्कॅट वगैरे अन्य प्रकारही आढळतात. वाद्यवृंद व सैनिकी वाद्यघोष…