गजगा (Fever nut)
अशोक, आपटा, गुलमोहर इत्यादींचा समावेश असलेल्या सीसॅल्पिनिऑइडी या फुलझाडांच्या उपकुलातील वनस्पती. ही बहुवर्षायू वनस्पती मोठी आणि काटेरी वेल असून तिचे शास्त्रीय नाव सीसॅल्पिनिया बोंड्यूसेला आहे. बहुधा कुंपणावर किंवा इतर झाडांवर ही चढलेली…