ॲनॅक्झिमीनीझ (Anaximenes)

ॲनॅक्झिमीनीझ : (इ.स.पू. सु. ५८८—५२४). प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता. आयोनियन किंवा मायलीशियन विचारपंथातील तिसरा तत्त्वज्ञ. थेलीझ हा पहिला, त्याचा शिष्य ॲनॅक्झिमँडर हा दुसरा आणि त्याचा शिष्य ॲनॅक्झिमीनीझ (ॲनॅक्झिमीनस) हा तिसरा. प्राचीन…

सेंट जॉन्स शहर (Saint John’s City)

वेस्ट इंडीज द्वीपसमूहातील लीवर्ड बेटांपैकी अँटिग्वा व बारबूडा देशाची राजधानी आणि कॅरिबियन समुद्रावरील महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या २१,४७५ (२०११). हे अँटिग्वा बेटाच्या वायव्य किनाऱ्यावर वसलेले आहे. ब्रिटिशांनी १६३२ मध्ये येथे वसाहत…

अमृत कौर (Amrit Kaur)

राजकुमारी अमृत कौर : (२ फेब्रुवारी १८८९ – ६ फेब्रुवारी १९६४). प्रसिद्ध गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या व भारताच्या पहिल्या कॅबिनेट मंत्री. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे राजघराण्यात झाला. वडील…

अभाव (Non-Being / Nothingness)

तत्त्वज्ञानातील एक संकल्पना. 'अभाव' याचा अर्थ 'नसणे', 'अस्तित्वात नसणे' (न+भाव=अभाव) असा होतो. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात अभावाची कल्पना ‘निगेशन’, ‘नॉन्-बीइंग’, किंवा ‘नॉन्-एक्झिस्टन्स’ ह्या संज्ञांनी व्यक्त केली जाते. ‘भाव’ आणि ‘अभाव’ ह्या संज्ञांना…

राब्बी (Rabbi)

राब्बी या हिब्रू भाषेतील शब्दाचा अर्थ ‘माझा गुरू’ असा आहे. रब्बी, रॅबाई असाही उच्चार याचा केला जातो. सामान्यतः ज्यू (यहुदी) विद्वानांना तसेच धार्मिक ग्रंथ व तत्त्वे शिकविणाऱ्यांना ही उपाधी लावली…

Read more about the article ड्रायफस प्रकरण  (Dreyfus Affair)
कॅप्टन आल्फ्रेड ड्रायफस

ड्रायफस प्रकरण  (Dreyfus Affair)

आल्फ्रेड ड्रायफस ह्या फ्रेंच लष्करातील अधिकारी व्यक्तीवर लादलेल्या आरोपातून उद्‌भवलेले एक प्रकरण. फ्रान्समध्ये ज्यूविरोधी वातावरण तापले असताना तसेच रोमन कॅथलिक चर्च व राज्यसंस्था यांमध्ये भांडण चालू असताना उद्‌भवलेल्या या प्रकरणामुळे…

Read more about the article ताइपिंग बंड (Taiping Rebellion)
ताइपिंग बंडाचे एक चित्र.

ताइपिंग बंड (Taiping Rebellion)

ताइपिंग बंड : (थायफींग बंड). राजकीय, सामाजिक व आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी चीनमध्ये झालेले एक प्रसिद्ध बंड. १८४८–६५ अशी सतरा वर्षे ते चालले होते. मांचू राजवट नष्ट करून शांततेचे साम्राज्य…

तात्या टोपे (Tatya Tope)

तात्या टोपे : (? १८१४–१८ एप्रिल १८५९). इंग्रजांविरुद्ध मुकाबला करणारा १८५७ च्या उठावातील एक प्रसिद्ध सेनानी. संपूर्ण नाव रामचंद्र पांडुरंग भट (येवलेकर). टोपे या त्याच्या उपनावाबद्दल तज्ज्ञांत एकमत नाही. तथापि तत्संबधी…

निकोटीन (Nicotine)

निकोटीन हे तंबाखूवर्गीय वनस्पतींद्वारे तयार केले जाणारे एक महत्त्वाचे रसायन असून निसर्गातील पहिले कीटकनाशक म्हणून ओळखले जाते. त्याशिवाय चित्रक आणि सूर्यफुलाच्या कुलातील काही वनस्पतीदेखील अल्प प्रमाणात याची निर्मिती करतात. तंबाखू…

नादबिंदूपनिषद् (Nadabindu Upanishad)

एक योगउपनिषद्. ऋग्वेदाशी संबंधित असलेल्या या उपनिषदात नादाचे वेगवेगळे प्रकार सांगून नादानुसंधान साधनेचे स्वरूप स्पष्ट केले गेले आहे. ॐकारावर हंसाचे रूपक करून त्याच्या विविध अंगोपांगांचे वर्णन यात केले आहे. ‘अकार’…

सरोवर (Lake)

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खोलगट भागातील जमिनीने वेढलेला किंवा बंदिस्त जलाशय म्हणजे सरोवर. यातील पाणी स्थिर असते किंवा संथगतीने प्रवाहित होत असते. लॅकॉस या ग्रीक शब्दाचा अर्थ खळगा किंवा तलाव, यावरून लेक…

अब्जांश स्फटिक संरचना (Structure of Nanocrystals)

आधुनिक तंत्रज्ञान हे विज्ञानाच्या मूलभूत संकल्पनांच्या आधारे विकसित होते. त्यामुळेच अब्जांश तंत्रज्ञानाच्या प्रगतीकरिता ‘अब्जांश-पदार्थ’ विज्ञानाचा सखोल अभ्यास सातत्त्याने होणे आवश्यक आहे. बृहद् पदार्थ : सामान्यत: जे पदार्थ आपल्याला उघड्या डोळ्यांनी…

गोवा, दीव, दमण मुक्ती (Operation Vijay – 1961)

योजना : गोवा काबीज करण्यासाठी एक इन्फन्ट्री डिव्हिजन, चिलखती दलाची एक रेजिमेंट, तोफखाना दलाचे दस्ते आणि भारतीय वायुदलाची लढाऊ विमाने यांचा वापर करण्याचे ठरविण्यात आले. भारतीय नौदलाला गोव्याची नाकेबंदी करून…

Read more about the article मेघालयन काळ (Meghalayan Age)
मेघालय राज्यातील मौमलूह गुहेचे प्रकाशचित्र

मेघालयन काळ (Meghalayan Age)

पृथ्वीवरील सु. ४.६ अब्ज वर्षांच्या भूवैज्ञानिक घडामोडींच्या इतिहासाची विभागणी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी भूवैज्ञानिक कालमापी (Geological Timescale) तयार केली. त्याप्रमाणे  सध्या आपण नवजीव महाकल्पातील (Cenozoic Era) चतुर्थ कल्पामधील (Quaternary Period) आता चालू…

ड्युरँड रेषा (Durand Line)

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमारेषा म्हणजे ड्युरँड रेषा. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार ही आंतरराष्ट्रीय सीमा समजली जाते. पार्श्वभूमी : रशिया १८८० पासून मध्य आशियाच्या बाजूने हिंदुस्थानपर्यंत सत्ताविस्तार करीत आहे, असा संशय त्या…