पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ७१% पेक्षा अधिक भाग पाण्याने व्यापलेला आहे. पाण्याच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांमुळे प्राणिजीवन, वनस्पतिजीवन, मानवी जीवन आणि संस्कृती यांत पाण्याला महत्त्वाचे स्थान आहे. हिरव्या वनस्पतींकडून सूर्यप्रकाश ऊर्जेच्या सहाय्याने पाण्याचा कार्बन डाय-ऑक्साइडाशी (कर्बवायूशी) संयोग होऊन अनेक प्रकारची कार्बोहायड्रेटे (कर्बोदके) तयार होतात. विविध जीवांना लागणारे इतर प्रकारचे अन्न या कर्बोदकांतूनच तयार होते. पाणी हे अतिकार्यक्षम विद्रावक (विरघळविणारे द्रव) असून त्यात अनेक जीवनदायी किंवा हानिकारक घटक विरघळतात. पाण्यामुळे प्राप्त झालेल्या द्रवरूप अवस्थेमुळे पोषक द्रव्ये मानवी शरीरातून व वनस्पतींच्या विविध भागांतून सर्वत्र परिवहन करतात. पाण्याच्या माध्यमातून अनेक प्रकारचे मारक जीव व विषारी अपशिष्टे (त्याज्य पदार्थ) सर्वत्र पसरली जातात. औद्योगिक प्रकल्पांमधील अनेक प्रक्रियांसाठी आणि घरगुती कामांसाठीही पाणी हे अनिवार्य व अत्यावश्यक नैसर्गिक साधन आहे.

आ. जलस्रोत

 वैश्विक जलसंपदा :

जलस्रोत उपलब्ध पाणी किमी मध्ये गोडे पाणी    (घनफळाच्या टक्केवारीध्ये) (वापरण्याजोगे ताजे पाणी) एकूण पाण्याची टक्केवारी
महासागर, खाड्या इ. १,३३८,०००,००० ९६.५
हिमनग, हिमनद्या, स्थायी हिम (बर्फ) २४,३६४,००० ६८.७ १.७४
भूजल २३,४००,००० १.७
ताजे पाणी १०,५३०,००० ३०.१ ०.७६
खारे पाणी (क्षारयुक्त पाणी) १२,८७०,००० ०.९३
मृदाजलांश (मातीतील आर्द्रता ओलेपणा) १६,५०० ०.०५ ०.००१
भूअंतर्गत हिम (बर्फ), स्थायी हिमस्वरूपात ३००,००० ०.८६ ०.२२२
सरोवरे १७६,४०० ०.०१३
गोडे पाणी ९१,००० ०.२६ ०.००७
खारे पाणी ८५,४०० ०.००६
वातावरण १२,९०० ०.०४ ०.००१
दलदलीमधील पाणी ११,४७० ०.०३ ०.०००८
नद्या २,१२० ०.०००६ ०.०००२
जैविक जल १,१२० ०.०००३ ०.०००१

(टक्केवारी जवळच्या दशांशात; १००% असेलच असे नाही.)

समीक्षक – अशाेक पटवर्धन

प्रतिक्रिया व्यक्त करा