राम बाळकृष्ण शेवाळकर (Ram Balkrushna Shewalkar)

शेवाळकर, राम बाळकृष्ण : (२ मार्च १९३१-३ मे २००९). सुप्रसिद्घ मराठी साहित्यिक, उत्तम कीर्तनकार आणि प्रभावी वक्ते. मूळ गाव परभणी जिल्ह्यातील शेवाळे. मूळ आडनाव धर्माधिकारी. जन्म विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचा.…

शेष रघुनाथ (Shesh Raghunath)

शेष रघुनाथ : (सतरावे शतक). मराठीतील एक पंडित कवी. उपनाव शेष. रघुपति शेष, शेष राघव या नावांनीही त्यांचा उल्लेख आढळतो. कृष्णकौतुक ह्या त्यांच्या काव्यामुळे प्रसिद्घ. ह्या काव्याचे साक्षेपी संपादक वि.…

वसंत सबनीस (Vasant Sabnis)

सबनीस, वसंत : (६ डिसेंबर १९२३-१५ ऑक्टोबर २००२). मराठी विनोदकार आणि नाटककार. मूळ नाव रघुनाथ दामोदर सबनीस.जन्म सोलापूर येथे.पंढरपूरच्या लोकमान्य हायस्कूलमधून वसंत सबनीस मॅट्रिक (१९४२), पुण्याच्या फर्ग्युसन महाविदयालयातून बी.ए. (१९४६).…

गंगाधर बाळकृष्ण सरदार (Gangadhar Balkrushna Sardar)

सरदार, गंगाधर बाळकृष्ण : (२ ऑक्टोबर १९०८-१ डिसेंबर १९८८). मराठी साहित्यिक आणि समाजमनस्क विचारवंत. जन्म ठाणे जिल्ह्यातील जव्हार या गावचा. शिक्षण जव्हार, मुंबई व पुणे येथे एम्. ए. पर्यंत. १९४१ मध्ये पुण्याच्या श्रीमती…

त्र्यंबक विनायक सरदेशमुख (Tryambak Vinayak Sardeshamukh)

सरदेशमुख, त्र्यंबक विनायक : (२२ नोव्हेंबर १९१९-१२ डिसेंबर २००५). श्रेष्ठ मराठी साहित्यिक. त्यांचा जन्म अक्कलकोट (सोलापूर जिल्हा) येथे झाला. त्यांचे वडील त्र्यंबकराव हे संस्थानिकांचे खाजगी सचिव होते. शिक्षण सोलापूर आणि…

पुरूषोत्तम गणेश सहस्रबुद्धे (Purushottam Ganesh Sahasrabuddhe)

सहस्रबुद्धे, पुरूषोत्तम गणेश : (१० जून १९०४-४ मार्च १९८५). मराठी गंथकार आणि विचारवंत. जन्म पुणे येथे. मुंबई विदयापीठाचे एम्.ए. (१९३१) आणि मराठीचे पीएच्.डी. (१९३९). पुण्याच्या नूतन मराठी विदयालयात शिक्षक म्हणून…

सामराज (Samraj)

सामराज : (सु. १६१३–सु. १७००). मराठी आख्यानकवी. श्याम गुसाई, शामभट आर्वीकर, शामराज या नावांनीही याचा उल्लेख आढळतो. ह्याच्या काळाविषयी वेगवेगळी मते आढळतात. महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल. भावे ह्यांच्या मते हा…

शिवाजी सावंत (Shiwaji Sawant)

सावंत, शिवाजी : (३१ ऑगस्ट १९४०–१८ सप्टेंबर २००२). ख्यातनाम मराठी कादंबरीकार. संपूर्ण नाव शिवाजी गोविंदराव सावंत. जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आजऱ्यालाच झाले. प्रथम वर्ष…

सुधांशु (Sudhanshu)

सुधांशु : (६ एप्रिल १९१७– सप्टेंबर २००६). मराठी कवी आणि कथाकार. मूळ नाव हणमंत नरहर जोशी. जन्म औदुंबर (जि. सांगली) येथे. शिक्षण एस्.एस्.सी. पर्यंत. खडकातले झरे (१९५१) हा त्यांचा एकमेव…

हरि केशवजी (Hari Keshavji)

हरि केशवजी : (१८०४–१८५८). अव्वल इंग्रजीच्या कालखंडातील एक लेखक आणि भाषांतरकार. संपूर्ण नाव हरि केशवजी पाठारे. जन्म मुंबईचा. रेव्हरंड केनी ह्याच्या हाताखाली त्यांनी इंग्रजी भाषेचे उत्तम शिक्षण घेतले. तसेच बाबा…

फादर स्टीफन्स (Father Stephens)

स्टीफन्स, फादर : (१५४९—१६१९). जेझुइट पंथीय मराठी कवी. जन्माने इंग्रज. इंग्लंडच्या बुल्टशर परगण्यातील बोस्टन येथे जन्म. शिक्षण विंचेस्टर येथे. टॉमस स्टीव्हन्स तसेच पाद्री एस्तवाँ या नावांनीही परिचित. ग्रीक-लॅटिन भाषांचा अभ्यास…

झां-पॉल सार्त्र (Jean-Paul Sartre)

सार्त्र, झां-पॉल : (२१ जून १९०५—१५ एप्रिल १९८०). फ्रेंच साहित्यिक आणि अस्तित्ववाद ह्या आधुनिक तत्त्वज्ञानातील एका प्रमुख व प्रभावी विचारसरणीचा तत्त्ववेत्ता. जन्म पॅरिसचा. त्याचे वडील तो अगदी लहान असतानाच वारले.…

ग्रॅनव्हिल स्टॅन्ली हॉल (Granville Stanley Hall)

हॉल, ग्रॅनव्हिल स्टॅन्ली : (१ फेब्रुवारी १८४४ – २४ एप्रिल १९२४). अमेरिकन मानसशास्त्रज्ञ. अमेरिकेतील अ‍ॅराफील्ड (Ashfield), मॅसॅचूसेट्स (Massachusetts) येथे जन्म. मुळात धर्मोपदेशक होण्याचे शिक्षण घेण्यासाठी त्याने न्यूयॉर्क शहरातील युनियन थिऑलॉजिकल…

वॉशिंग्टन अर्व्हिंग (Washington Irving)

अर्व्हिंग, वॉशिंग्टन : (३ एप्रिल १७८३–‍२८ नोव्हेंबर १८५९).आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवणारा पहिला अमेरिकन लेखक. जन्म न्यूयॉर्क येथे एका संपन्न व्यापारी कुटुंबात. बालपणापासूनच लेखनवाचनाची त्यास आवड होती. शालेय शिक्षणानंतर तो व्यवसायाच्या दृष्टीने…

डेव्हिड ह्यूम (David Hume)

ह्यूम, डेव्हिड : (७ मे १७११‒२५ ऑगस्ट १७७६). ब्रिटिश अनुभववादी परंपरेतील सर्वश्रेष्ठ विचारवंत; तसेच इतिहासकार, अर्थशास्त्रज्ञ आणि निबंधकार. एडिंबरो (स्कॉटलंड) येथे जन्मला. त्याची आरंभीची वर्षे एडिंबरो आणि ब्रिस्टल येथे गेली. वयाच्या बाराव्या वर्षी…

  • 1
  • 2
Close Menu
Skip to content