हेक्ला ज्वालामुखी (Hekla Volcano)
आइसलँड या देशातील एक प्रसिद्ध आणि अतिशय जागृत ज्वालामुखी. रेक्याव्हीक या आइसलँडच्या राजधानीपासून पूर्वेस ११० किमी., दक्षिण किनाऱ्यापासून आत ४८ किमी. वर हा ज्वालामुखी आहे. दक्षिण आइसलँडमधील पूर्वेकडील ज्वालामुखी पट्ट्यात…