सूर्यनारायण माणिकराव रणसूभे (Suryanarayan Manikrao Ransubhe)

रणसूभे, सूर्यनारायण माणिकराव : (७ ऑगस्ट १९४२). हिंदी आणि मराठी साहित्याचे अभ्यासक, समीक्षक आणि दोन्ही भाषांतील दलित आणि वैचारिक साहित्याचे परस्पर अनुवादक. गुलबर्गा येथे एका सामान्य कुटुंबात यांचा जन्म झाला.…

 भिमा शिवय्या स्वामी (Bhima Shivayya Swami)

भिमा शिवय्या स्वामी : (१५ ऑक्टोंबर १९४३). मराठी कादंबरीकार. जन्म सोनसांगवी ता. केज, जि. बीड येथे झाला. प्राथमिक शिक्षण जन्मगावी तर हायस्कुलचे शिक्षण बार्शी येथे सिल्व्हर ज्युबिली हायस्कुल मध्ये झाले. पी.…

देवीसिंग व्यंकटसिंग चौहान (Devising Vyankatsing Chouhan)

चौहान, देवीसिंग व्यंकटसिंग :  (२ मार्च १९११ - १० डिसेंबर २००४). ऋग्वेदाचे भाष्यकार, भाषाशास्त्राचे जाणकार, मराठी व दक्खिनी हिंदीचे भाषिक अभ्यासक आणि इराणी सांस्कृतिक संबंधाचे संशोधक, स्वातंत्र्यसेनानी. देवीसिंग चौहान यांचा…

चंद्रकांत दत्तोपंत देऊळगावकर (Chandrakant Dattopant Deulgaonkar)

देऊळगावकर, चंद्रकांत दत्तोपंत : (१७ मे १९३२- २ जानेवारी २०१६). संत साहित्याचे अभ्यासक . यू. म. पठाण यांच्या मार्गदर्शनाने मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे मन्मथ स्वामी : व्यक्ती आणि वाङ्मय या…

शेषराव माधवराव मोहिते (Shesharao Madhavrao Mohite)

मोहिते, शेषराव माधवराव : ग्रामीण कादंबरीकार आणि शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते. १९८० नंतरच्या पिढीतील महत्त्वाचे ग्रामीण कादंबरीकार म्हणून त्यांची ओळख आहे. व्हंताळ (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) येथे एका शेतकरी कुटुंबात त्यांचा…

शैला लोहिया (Shaila Lohiya)

लोहिया , शैला द्वारकादास  : (६ एप्रिल १९४० - २४ जूलै २०१३). मराठी साहित्यातील कथाकार, कादंबरीकार आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक. जन्म धुळे येथे झाला. त्यांचे माहेरचे नाव शैला शंकरराव परांजपे. १९६२…

लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी (Lakshmikant Sakharam Tamboli)

तांबोळी, लक्ष्मीकांत सखाराम : (२१ सप्टेंबर १९३९). मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी, कथाकार, कादंबरीकार. जन्म जिंतूर, जिल्हा परभणी येथे झाला. शालेय शिक्षण जिंतूर येथे. महाविद्यालयीन शिक्षण हैद्राबाद येथे. एम. ए. (मराठी)…

विचारशलाका (Vicharshalaka)

विचारशलाका :  सामाजिक शास्त्र संशोधन व समाज विकास प्रतिष्ठान, लातूरचे मुखपत्र म्हणून विचारशलाका  या नियतकालिकाची सुरुवात जुलै १९८७ मध्ये झाली. हे नियतकालिक लातूर येथून प्रकाशित होणारे त्रैमासिक असून याचे संस्थापक…

शहाजिंदे फकीरपाशा महेबूब (Shahajinde Fakirpasha Maheboob)

शहाजिंदे फकीरपाशा महेबूब : (३ जुलै १९४६). मराठीतील कवी. मराठी साहित्यातून मुस्लिम समाजमन मांडणारा लेखक. जन्म सास्तूर, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद येथे झाला. शिक्षण पहिली ते दहावी शांतेश्वर विद्यालय, सास्तूर…

श्रीराम रावसाहेब गुंदेकर (Shriram Raosaheb Gundekar)

गुंदेकर, श्रीराम रावसाहेब  : (१२ ऑक्टोंबर १९५५ - १२ जानेवारी २०१८). मराठीतील  ग्रामीण साहित्यिक, समीक्षक, सत्यशोधकी साहित्याचे अभ्यासक, संशोधक, भाष्यकार. बीड जवळील आंबेसावळी येथे एका शेतकरी कुटुंबात जन्म. महात्मा फुले…

तु. शं. कुळकर्णी (T. S. Kulkarni)

कुळकर्णी, तु. शं. : (३ सप्टेंबर १९३२). मराठी साहित्यातील प्रसिद्ध कथाकार आणि कवी. जन्म डोंगरकडा, ता. कळमनुरी जि. हिंगोली येथे. मराठी साहित्य या विषयात बी. ए. ह्या पदवीपरीक्षेत तत्कालीन मराठवाडा…

मल्लनाथ महाराज (Mallanath Maharaj)

मल्लनाथ महाराज. (१८४५-१९१४). औसा या संस्थानाचे मठाधीपती. पिता वीरनाथ महाराज व माता रुक्मिणी यांच्या उदारी औसा येथे त्यांचा जन्म झाला.मल्लनाथ गाथा (१९१५) हा ग्रंथ त्यांच्या पश्चात गुरुनाथ महाराजांची प्रकाशित केलेला…

प्रतिष्ठान (Pratishthan)

प्रतिष्ठान : मराठी साहित्यातील वाङ्मयीन मासिक. मराठवाडा साहित्य परिषदेचे मुखपत्र. मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थापनेनंतर परिषदेच्या कार्यासंबंधी काही ठराव मंजूर करतेवेळी परिषदेचे एक मुखपत्र असावे असे सप्टेंबर १९४३ मध्ये ठरले; परंतु…