हिमालयाच्या समांतर पर्वतरांगा (Parallel Ranges of Himalayas)

हिमालय पर्वताच्या बऱ्याचशा भागाची अचूक भूशास्त्रीय माहिती अद्याप उपलब्ध नाही. हिमालयाची संरचना सामान्यपणे आल्प्ससदृश आहे. सांरचनिक दृष्ट्या हिमालय श्रेणी ही पश्चिमेकडील हिंदुकुश व बलुचिस्तान श्रेण्यांशी आणि पूर्वेकडील चीनमधील सिंक्यांग व…

रोहतांग खिंड (Rohtang Pass)

भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील एक खिंड. पीर पंजाल पर्वतश्रेणीच्या पूर्व टोकाशी सस. पासून ३,९७८ मी. उंचीवर ही खिंड स्थित आहे. रोहतांग खिंड मनाली (हिमाचल प्रेदेश) – लेह (लडाख) महामार्गावर, मनालीपासून…

स्व्हेन आँडर्स हेडीन (Sven Anders Hedin) 

हेडीन, स्व्हेन आँडर्स (Hedin, Sven Anders) : (१९ फेब्रुवारी १८६५ – २६ नोव्हेंबर १९५२). स्वीडिश समन्वेषक आणि भूगोलज्ञ. तसेच प्रदेश नकाशाकार, छायाचित्रकार, प्रवासवर्णनलेखक व प्रकाशक म्हणूनही त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. त्यांचा…

इजीअन समुद्र (Aegean Sea)

भूमध्य समुद्राचा एक फाटा. इजीअन समुद्राच्या पश्चिमेस व उत्तरेस ग्रीस आणि पूर्वेस तुर्की हे देश असून समुद्राची दक्षिणेकडील मर्यादा क्रीट या बेटाने सीमित केली आहे. या समुद्राची लांबी ६१२ किमी.,…

आँटॅरिओ सरोवर (Ontario Lake)

उत्तर अमेरिका खंडातील पंचमहा सरोवरांपैकी सर्वांत लहान आणि पूर्वेकडील सरोवर. सुमारे ३१० किमी. लांबीच्या आणि ८५ किमी. रुंदीच्या या अंडाकृती सरोवराचे पृष्ठक्षेत्रफळ सुमारे १९,०१० चौ. किमी. असून एकूण जलवाहनक्षेत्र ६४,०२५…

सागरी परिसंस्था (Marine Ecosystem)

जलपरिसंस्थेच्या विविध प्रकारांपैकी सर्वांत विशाल परिसंस्था. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे ७०.८% क्षेत्र पाण्याखाली असून त्यातील सुमारे २.५% क्षेत्र गोड्या पाण्याखाली आणि उर्वरित ९७.५% क्षेत्र खाऱ्या पाण्याने व्यापलेले आहे. त्यामुळे सागरी…

सेंदाई शहर (Sendai City)

जपानच्या होन्शू बेटावरील मीयागी प्रांताची राजधानी व एक प्रमुख शहर. यास सेंडाई शहर असेही म्हणतात. लोकसंख्या १०,९१,४०७ (२०२०). होन्शू बेटाच्या ईशान्य भागात हीरोसे या नदीकाठावर हे शहर वसले असून ते…

डोनेट्स्क शहर (Donetsk City)

युक्रेनमधील डोनेट्स्क प्रांताची राजधानी आणि एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र. यास स्टालिनो शहर असेही म्हणतात. लोकसंख्या सुमारे ९,६,००० (२०१९). युक्रेनच्या आग्नेय भागात कॅल्मीअस नदीकाठावर हे शहर वसले आहे. रशियन सम्राज्ञी कॅथरिन…

आराकान पर्वत (Arakan Mountains)

म्यानमारच्या (ब्रह्मदेशाच्या) पश्चिम भागातील एक पर्वतरांग. तिला आराकान योमा किंवा राकीन योमा किंवा राकीन पर्वत या नावांनीही संबोधले जाते. पश्चिमेकडील राकीन (आराकान) किनारा आणि पूर्वेकडील इरावती नदीचे खोरे यांदरम्यान ही…

आखात (Gulf)

समुद्राचा किंवा महासागराचा जमिनीकडे आत घुसलेला जलभाग सामान्यपणे आखात या संज्ञेने ओळखला जातो. काही ठिकाणी मात्र अशा जलभागास उपसागर, समुद्र, बाइट, फर्थ, साउन्ड किंवा फ्योर्ड या संज्ञांनीही संबोधित केले आहे.…

पर्शियन आखात (Persian Gulf)

पश्चिम आशियातील इराण आणि अरबस्तान द्वीपकल्प यांदरम्यानचा अरबी समुद्राचा एक फाटा. याला इराणचे आखात असेही म्हणतात. या आखाताची लांबी ९९० किमी., कमाल रुंदी ३४० किमी. व किमान रुंदी ५५ किमी.…

शेटलंड बेटे (Shetland Islands)

ईशान्य अटलांटिक महासागरातील ग्रेट ब्रिटनची बेटे. यांस झेटलंड बेटे असेही म्हणतात. ग्रेट ब्रिटनच्या अगदी उत्तर भागात असलेल्या स्कॉटलंडच्या मुख्य भूमीपासून ईशान्येस २१० किमी.वर, तसेच ग्रेट ब्रिटनच्या ऑर्कनी बेटांच्या ईशान्येस ८०…

शेफील्ड शहर (Sheffield City)

इंग्लंडच्या उत्तरमध्य भागतील साउथ यॉर्कशर या परगण्यातील एक महानगरीय बरो आणि प्रगत औद्योगिक शहर. लोकसंख्या – शहर ५,८४,८५३; महानगर १५,६९,००० (२०१९ अंदाज). लंडनच्या वायव्येस २६० किमी., तर मँचेस्टरपासून पूर्वेस ६४…

अरल समुद्र (Aral Sea)

मध्य आशियातील कझाकस्तान आणि उझबेकिस्तान या दोन देशांत विस्तारलेला समुद्र. याला अरल सरोवर म्हणूनही ओळखले जाते. कझाकस्तान आणि उझबेकिस्तान या दोन देशांची सरहद्द या समुद्रातून गेली असून समुद्राचा उत्तर भाग…

शोण नदी (Son River)

गंगा नदीची एक प्रमुख उपनदी. लांबी ७८४ किमी. गुगल नकाशानुसार या नदीची लांबी ९३२ किमी. आहे. जलवाहन क्षेत्र सुमारे ७१,९०० चौ. किमी. छ्त्तीसगढ राज्यातील बिलासपूर जिल्ह्यात, मैकल डोंगररांगांमधील अमरकंटक या…