अन्न आणि औषध प्रशासन (Food and drug administration)

अन्न आणि औषधे यांचे प्रमाणीकरण करून, त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणारी शासकीय यंत्रणा. १९३५ नंतर अन्नाची गरज खूप वाढली होती, परंतु उत्पादन मात्र कमी होत होते. अशा परिस्थितीत अन्नामध्ये…

अनुकूलन (Adaptation)

वनस्पती वा प्राणी यांच्यामध्ये पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी होणार्‍या बदलाच्या प्रक्रियेला अनुकूलन म्हणतात. अनुकूलन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे सजीव त्यांच्या नैसर्गिक परिस्थितीत यशस्वी रीत्या जगण्यासाठी सक्षम होत असतात.…

विनोबा भावे (Vinoba Bhave)

भावे, विनोबा : (११ सप्टेंबर १८९५–१५ नोव्हेंबर १९८२). थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक. कोकणातील रायगड जिल्ह्याच्या पेण तहसिलातील गागोदे या गावी विनोबा तथा विनायक नरहरी भावे यांचा जन्‍म झाला.…

निर्बाध वीजपुरवठा (UPS, Uninterruptible Power Supply)

विविध ठिकाणी (उदा., दवाखान्यात वेगवेगळ्या उपचारासाठी, रासायनिक उद्योगधंदे)  अशा ठिकाणी आपल्याला सतत ऊर्जेची गरज भासत असते. अशा ठिकाणी ऊर्जा स्रोताचा अभाव जाणवला तर खूप नुकसान होऊ शकते. अखंडित (निर्बाध) वीज…

ध्रुव भट्ट (Dhruv Bhatt)

भट्ट,ध्रुव : (८ मे १९४७). ध्रुव प्रबोधराय भट्ट. ख्यातनाम गुजराती कादंबरीकार व कवी. जन्म नींगाला, जि. भावनगर (गुजरात) येथे. प्राथमिक शिक्षण जाफ्राबाद,केशोद येथे झाले. माध्यमिक आणि उच्च शिक्षण वाणिज्य शाखेतून…

मुहासिबी संप्रदाय (Muhasibi School)

एक इस्लामी संप्रदाय. इस्लामच्या तत्त्वज्ञानानुसार 'मुहासिबी' हा संप्रदाय नसून इस्लामचे शुद्ध अंतःकरणाने आचरण करण्याचा उपाय आहे. 'हिसाब' म्हणजे हिशोब. मोजदाद करणे. स्वतःच्या आचरणाला तटस्थवृत्तीने तपासणे. एखादे काम करताना आपला खरा…

खंडकारी (Chopper/ DC-DC Converter)

एकदिशादर्शकाचे चल एकदिशादर्शकामध्ये (DC to DC converter) रूपांतर करणे खूप गरजेचे आहे. कारण आजकाल अनेक उपकरणे एकदिशादर्शक विद्युत दाबावर (DC voltage) अवलंबून आहेत. जर आपण एकदिशादर्शक (Variable DC) चल स्रोतांचा…

काजू (Cashew)

काजू हा सदाहरित वृक्ष अ‍ॅनाकार्डिएसी म्हणजेच आम्र कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव अ‍ॅनाकार्डियम ऑक्सिडेंटेल आहे. या वृक्षाचे मूलस्थान मध्य अमेरिका आणि इतर उष्ण प्रदेशातील देश आहेत. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज…

जलचक्रातील कालसंबंधित बदल (Chronological changes in the water cycle)

जलचक्र हे जलावरणामध्ये पाण्याची – पाण्याच्या संयुगांची – हालचाल कोणत्या प्रक्रियांद्वारे होते याचे वर्णन करते. परंतु जलचक्रामध्ये फिरत राहणाऱ्या पाण्यापेक्षा खूप जास्त पाणी हे प्रदीर्घ काळापर्यंत साठा म्हणून आहे. पृथ्वीवरील…

दिनारिक आल्प्स (Dinaric Alps)

यूरोपातील आल्प्स पर्वतांपैकी पूर्व आल्प्स विभागातील एक पर्वतश्रेणी. या पर्वतरांगेची लांबी सुमारे ६५० ते ७०० किमी. आणि रुंदी ५० किमी. ते २०० किमी. असून तिने सुमारे २,००,००० चौ. किमी. क्षेत्र…

जागतिक व्यापार संघटना (World Trade Organisation)

पार्श्वभूमी : जागतिक व्यापार संघटना ही आंतरशासकीय संस्था जागतिक व्यापाराचे नियमन करते. दिनांक १५ एप्रिल १९९४ रोजी १२३ राष्ट्रांनी स्वाक्षऱ्या केलेल्या ‘मॅराकेश करारां’तर्गत दिनांक १ जानेवारी १९९५ रोजी ही संघटना…

बैत (Bait)

सूफी गुरू आपल्या शिष्यांना जी दीक्षा देतात तिला ‘बैत’ (बयत) असे म्हणतात. बैत एक मान्यता आहे. खलीफा निवडीच्या काळी मतपत्रिका नसायची, तर सूज्ञ आणि समजदार पाच-सहा समाजमान्यताप्राप्त लोक एखाद्या योग्य…

प्रेषित, इस्लाम धर्मातील (The Prophet of Islam)

प्रेषितांवर विश्वास ठेवणे हे इस्लाम धर्माच्या सहा कलमांमधील एक महत्त्वाचे कलम आहे. इस्लाम धर्मात प्रेषितांचे नबी आणि रसूल असे दोन प्रकार पडतात. रसूल म्हणजे अल्लाहचा संदेश किंवा साक्षात्कार घेऊन येणारे.…

अंकात्मक बहुमापक (Digital multimeter)

विद्युत उपकरणांची निर्मिती, वापर आणि दुरुस्ती करत असताना अनेक विद्युत राशींचे (विद्युत धारा, विद्युत दाब, रोधक, ऊर्जा, धारिता इत्यादी) मापन करावे लागते. पूर्वी प्रत्येक विद्युत राशी मोजण्यासाठी स्वतंत्र उपकरण वापरले…

जलविद्युत केंद्र (Hydroelectric power station)

जलविद्युत केंद्रामध्ये उंचीवर साठविलेल्या पाण्याच्या स्थितिज ऊर्जेचा वापर वीजनिर्मिती करण्यासाठी केला जातो. जल वीजनिर्मिती केंद्र हे सामान्यपणे जेथे धरण बांधले जाऊ शकते आणि भरपूर जलाशये मिळू शकतात, अशा डोंगराळ भागात…