ट्रॉट्‌स्कीवाद (Trotskyism)

रशियन धोरण आणि जागतिक क्रांती यासंबंधी क्रांतिकारक लीअन ट्रॉट्‌स्की याने मांडलेले विचार म्हणजे ट्रॉट्‌स्कीवाद. लेनिनच्या मृत्यूनंतर साम्यवादी क्रांतीच्या ध्येयधोरणासंबंधी ट्रॉट्‌स्की आणि स्टालिन यांच्यातील मतभेद वाढू लागले. आर्थिक कार्यक्रम, पक्षाची संघटना…

उंदीर (Mouse, Rat)

उंदीर हा स्तनी वर्गामधील कृंतक गणातील मोठ्या संख्येने आढळणारा प्राणी आहे. जगभर उंदराच्या १३७ प्रजाती आहेत. खार, बीव्हर, गिनीपिग,  सायाळ व घूस यांसारख्या प्राण्यांचाही समावेश कृंतक गणात होतो. अशा सर्व…

उंट (Camel)

उंट हा आर्टिओडॅक्टिला गणामधील (समखुरी प्राणीगणातील) कॅमेलिडी कुलातील सस्तन प्राणी आहे. त्याच्या दोन जाती आहेत: (१) एक मदारीचा कॅमेलस ड्रोमेडेरियस नावाचा गतिमान अरबी उंट आणि (२) दोन मदारींचा कॅमेलस बॅक्ट्रिअ‍ॅनस नावाचा बॅक्ट्रियन उंट. अरबी…

ऑक्टोपस (Octopus)

मृदुकाय (मॉलस्का) संघातील शीर्षपाद (सेफॅलोपोडा) वर्गातील ऑक्टोपोडा गणाच्या ऑक्टोपोडिडी कुलातील सागरी प्राणी. ऑक्टोपसाचे शास्त्रीय नाव ऑक्टोपस व्हल्गॅरिस आहे. रात्री संचार करणारा हा प्राणी मांसाहारी आहे. गोगलगायीसारख्या प्राण्यापासून याची उत्क्रांती झाल्याचे अभ्यासकांचे मत…

अस्वल (Bear)

अस्वल हा प्राणी अर्सिडी कुलातील असून या कुलात सात प्रजाती आणि नऊ जाती आहेत. बहुतांशी वन्य अस्वले युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेत आढळतात. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशात वन्य…

ॲनाकोंडा (Anaconda)

मध्य अमेरिका आणि उष्णकटिबंधीय दक्षिण अमेरिकेत आढळणारा बोइडी कुलातील मोठ्या आकाराचा साप. पाण्यात आणि दलदलीच्या प्रदेशात याचे वास्तव्य असल्याने याला पाण-अजगर असेही म्हणतात. याचे शास्त्रीय नाव युनेक्टस म्युरिनस आहे. सर्वसाधारणपणे ची लांबी…

लीअन ट्रॉट्‌स्की (Leon Trotsky)

ट्रॉट्‌स्की, लीअन : (७ नोव्हेंबर १८७९–२१ ऑगस्ट १९४०). रशियन क्रांतिकारक नेता. लेनिनने क्रांती केली, स्टालिनने नवा रशिया निर्माण केला आणि ट्रॉट्‌स्कीने क्रांतीबरोबर संघटनाकार्य केले. रशियाचा पहिला विदेशमंत्री, लालसेनेचा रचनाकार व युद्धमंत्री…

अधिहर्षता (Allergy)

एखादा बाह्य पदार्थ शरीरात गेला असता एरव्ही न होणारी विशिष्ट प्रतिक्रिया होणे म्हणजे अधिहर्षता. अशी विपरीत प्रतिक्रिया निर्माण होण्याच्या प्रवृत्तीलाही अधिहर्षता असे म्हणतात. ज्या बाह्य पदार्थामुळे अधिहर्षता होते त्यास ‘अधिहर्षताकारी’…

Read more about the article समतल प्रतिविकृती भंग दृढता (Plane Strain Fracture Toughness)
आ. १: भंग दृढता, प्रतिबल आणि भेगेचा आकार यातील संबंध.

समतल प्रतिविकृती भंग दृढता (Plane Strain Fracture Toughness)

भारामुळे पदार्थाची निष्फलता होऊन निर्माण होणाऱ्या दोन किंवा अधिक तुकड्यांना भंग असे म्हणतात. भंग हा सर्व प्रकारच्या वापरातील परिस्थितीदरम्यान होतो. दोष, भेग आणि वैगुण्य हे सर्व प्रकारच्या अभियांत्रिकी पदार्थांत असतातच.…

कुका आंदोलन (नामधारी चळवळ) (Kuka Movement)

पंजाब प्रांतातील एक प्रसिद्ध चळवळ. या आंदोलनास कुका चळवळ, नामधारी चळवळ, नामधारी शीख आंदोलन या नावांनीही संबोधले जाते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात पंजाब प्रांतामध्ये देशभक्ती व क्रांतिकारी भावना जागविण्याचे कार्य…

राणी गाइदिन्ल्यू (Rani Gaidinliu)

राणी गाइदिन्ल्यू  : (२६ जानेवारी १९१५ – १७ फेब्रुवारी १९९३). प्रसिद्ध भारतीय स्त्री स्वातंत्र्यसेनानी. मणिपूरमधील लोंग्काओ (नुन्ग्काओ) येथे रौंग्मी नागा जमातीतील लोथोनांग पामेई आणि क्चाक्लेनिऊ या दांपत्यापोटी तिचा जन्म झाला.…

अध:पृष्ठीय जल (Sub-surface water)

पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली भूस्तरातील सच्छिद्र जागेत असलेल्या पाण्यास अध:पृष्ठीय जल किंवा भूजल म्हणतात. भूपृष्ठावरील पाण्यास ‘पृष्ठीय जल’ म्हणतात. अध:पृष्ठीय जलाचे वर्गीकरण संतृप्त क्षेत्र आणि वातन क्षेत्र असे केले जाते. संतृप्त क्षेत्रामध्ये…

लाला हरदयाळ (Lala Har Dayal Singh Mathur)

लाला हरदयाळ : (१४ ऑक्टोबर १८८४–४ मार्च १९३९). भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील एक क्रांतिकारक नेता. परदेशांतील भारतीय नागरिकांना भारतदेशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रेरित करण्याचे महान कार्य त्यांनी केले. त्यांचा जन्म दिल्ली येथे एका पंजाबी…

अतिसार (Diarrhoea)

वारंवार पातळ शौचाला होणे म्हणजे अतिसार किंवा हगवण होय. अतिसार हे सामान्यपणे आतड्याच्या विकारांचे एक लक्षण आहे. आमांश, पटकी, विषमज्वर, संग्रहणी व कृमींची बाधा अशा अनेक रोगांत अतिसार होऊ शकतो.…

हेन्री लुई व्हिव्हिअन डेरोझिओ (Henry Louis Vivian Derozio)

डेरोझिओ, हेन्री लुई व्हिव्हिअन : (१८ एप्रिल १८०९–२६ डिसेंबर १८३१). बंगालच्या पुनरुज्जीवनवादी चळवळीचे एक प्रमुख नेते आणि प्रसिद्ध इंडो-अँग्लिअन कवी. त्यांचा जन्म कोलकात्याजवळील (पूर्वीचे कलकत्ता) पद्मापकुर येथे एका यूरोपियन कुटुंबात झाला.…