कहावली (Kahawali)

प्राकृत जैन साहित्यातील कथात्मक स्वरूपाचा महत्त्वाचा ग्रंथ. भद्रेश्वरसूरी यांनी सुमारे ११ व्या शतकात याची रचना केली. ते प्रसिद्ध जैन आचार्य अभयदेवसूरी यांचे गुरु होते.कहावलीची रचना प्राकृत गद्यात असून काही ठिकाणी…

Read more about the article तण (Weed)
तण

तण (Weed)

लागवड केलेल्या पिकात वाढलेल्या इतर वनस्पती म्हणजे तण. तण ही संज्ञा लागवड केलेल्या वनस्पतींच्या वाढीचे ठिकाण आणि हंगाम विचारात घेऊनच वापरावी लागते. जसे, पहिल्या हंगामातील ज्वारीच्या बिया रुजून काही रोपे…

Read more about the article तरस (Hyena)
पट्टेवाला तरस (हायना हायना)

तरस (Hyena)

कुत्र्यासारखा दिसणारा एक प्राणी. तरस हा स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणातील प्राणी असून त्याचा समावेश हायनिडी कुलात होतो. या कुलातील प्राण्यांना सामान्यपणे तरस म्हणतात. स्तनी वर्गातील हे कुल सर्वांत लहान असून…

हायकू (Haiku)

जपानी काव्यप्रकार. तीन ओळींचा, सतरा शब्दावयवांचा (अक्षरावयवांचा), मितभाषी व बंदिस्त घाट असलेलाहा काव्यप्रकार जपानमध्ये विशेष लोकप्रिय आहे. यामध्ये पहिल्या ओळीत पाच, दुसऱ्या ओळीत सात आणि तिसऱ्या ओळीत पुन्हा पाच शब्दावयव,…

तिवर (White mangrove)

खारफुटीची एक जाती. हिला पांढरी खारफुटी म्हणतात. ही वनस्पती अकॅंथेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव एविसेनिया ऑफिसिनॅलीस आहे. (पहा : खारफुटी)    

परागकण आणि अधिहर्षता (Pollen grains and Allergy)

फुलझाडांच्या व प्रकटबीज वनस्पतींच्या अनुक्रमे फुलातील व शंकूतील असलेले परागकोश पक्व झाल्यावर त्यांतून बाहेर पडणार्‍या पांढरट किंवा पिवळट रंगाच्या भुकटीसारख्या सूक्ष्म कणांना पराग म्हणतात.या परागकणामुळे अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या, विशेषतः…

तीळ-२ (Sesame)

तीळ ही वर्षायू वनस्पती पेडॅलिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सिसॅमम इंडिकम आहे. ती मूळची आफ्रिकेतील असून आजही तिळाच्या अनेक जाती तेथे वन्य स्थितीत आढळतात. भारतात तिळाच्या सहा जाती आढळत…

जवस (Linseed Plant)

जवस हे एक गळिताचे धान्य असून रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. मराठीत याला अळशी; हिंदीत अलसी;संस्कृतमध्ये अतसी, अतसिका,हैमवती, नीलपुष्पी, उमा किंवा क्षुमा म्हणतात.भारतामध्ये मध्य प्रदेश राज्यात जास्त क्षेत्र व उत्पन्न…

तीळ-१ (Mole)

त्वचेवरील नैसर्गिक लहान व रंगीत डाग. तिळाला मस असेही म्हणतात. मेलॅनीन हे रंगद्रव्य असलेल्या पेशींपासून तीळ तयार होतात. काहींच्या जन्मापासूनच शरीरावर तीळ असतात आणि त्यामुळे त्यांना ‘जन्मखूण’ मानतात. परंतु बऱ्याचदा…

तुडतुडा (Leaf hopper)

एक पंखधारी कीटक. हेमिप्टेरा गणाच्या क्लायविओऱ्हिंका उपगणातील सिकॅडेलिडी कुलात तुडतुड्याचा समावेश होतो. या कुलातील कोणत्याही जातीच्या कीटकाला सामान्यपणे तुडतुडा म्हणतात. त्यांच्या कुलात २०,००० हून अधिक जातींचा समावेश आहे. जगभरात हे…

तोफगोळा वृक्ष (Cannon-ball tree)

तोफगोळा हा वृक्ष लेसिथिडेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव कौरोपिटा गियानेन्सिस आहे. हा मूळचा त्रिनिदाद, दक्षिण-पूर्व अमेरिका, भारत आणि थायलंड या उष्ण प्रदेशांत आढळतो. भारतात २,०००–३,००० वर्षांपूर्वीपासून या वृक्षाचा आढळ…

त्वचा (Skin)

पृष्ठवंशी प्राण्यांच्या शरीराचे सर्वांत मोठे इंद्रिय. शरीराचे अंतर्रचना आणि पर्यावरण यांतील आंतरपृष्ठ असून तो एक संरक्षक स्तर असतो. शरीराचे तापमान नियमित करणे, संवेदनांची जाणीव करणे आणि रोगांचा प्रतिकार करणे ही…

त्सुनामी (Tsunami)

परिसंस्थांमध्ये आकस्मिक बदल घडवून आणणाऱ्या विशाल सागरी लाटा. जपानी भाषेत या लाटांना त्सुनामी म्हणतात. हाच शब्द आता सर्वत्र वापरला जातो. महासागर अथवा मोठ्या जलाशयाच्या तळभागावर भ्रंश किंवा भेगा पडल्यास त्या…

त्सेत्से माशी (Tsetse fly)

घरमाशीसारखा एक कीटक. त्सेत्से माशीचा समावेश कीटकांच्या डिप्टेरा गणाच्या ग्लॉसिनिडी कुलातील ग्लॉसिना प्रजातीत होतो. तिचे शास्त्रीय नाव ग्लॉसिना टॅबॅनिफॉर्मिस आहे. तिला टिक-टिक माशी असेही म्हणतात. आफ्रिका खंडाच्या सहारा आणि कलहारी…

दात (Teeth)

(अनेक) पृष्ठवंशी (आणि अपृष्ठवंशी) प्राण्यांच्या मुखगुहेत असलेली लहान व कठीण ऊतींची संरचना. अन्नाचे तुकडे करण्यासाठी आणि चर्वण करण्यासाठी दातांचा उपयोग होतो. काही प्राण्यांमध्ये (मांसाहारी) भक्ष्य पकडण्यासाठी किंवा संरक्षणासाठी दातांचा उपयोग…