Read more about the article टाकळा (Foetid cassia)
टाकळ्याची पाने व फुले

टाकळा (Foetid cassia)

एक लहान, शेंगा येणारे झुडूप. टाकळा ही वर्षायू वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सेना तोरा किंवा कॅसिया तोरा आहे. ती मूळची आशियातील असून उष्ण प्रदेशातील सर्व देशांमध्ये आढळते.…

डास (Mosquito)

संधिपाद संघातील कीटक वर्गाच्या व्दिपंखी गणातील एक उपद्रवी कीटक. जगभर डासांच्या सु. ३,२०० जाती आहेत. उष्ण प्रदेशात डास अधिक असून ध्रुवीय बर्फाळ प्रदेश, अतिशुष्क वाळवंटी प्रदेश आणि समुद्रसपाटीपासून ४,२०० मी.…

डॉल्फिन (Dolphin)

एक सागरी सस्तन प्राणी. डॉल्फिनाचा समावेश अपरास्तनी उपवर्गाच्या सीटॅसिया गणात करण्यात येतो. या गणात व्हेल, शिंशुक (पॉरपॉईज) यांचाही समावेश करतात. सीटॅसिया गणात असलेल्या डेल्फिनिडी कुलामध्ये डॉल्फिनाच्या १७ प्रजाती आणि ४०…

डेझी (Daisy)

अ‍ॅस्टरेसी कुलातील फुलांच्या एका जातिसमूहाला डेझी म्हणतात. बेलिस पेरेनिस असे शास्त्रीय नाव असलेली ही जाती यूरोपीय डेझीची सामान्य जाती आहे. ही जाती डेझीची मूळ जाती आहे, असे मानतात. हिची फुले…

डेलिया (Dahlia)

अ‍ॅस्टरेसी कुलातील (सूर्यफूल कुल) एका प्रजातीच्या वनस्पतींना डेलिया म्हणतात. डेलिया प्रजातीत सु. ३६ जाती आहेत. सूर्यफूल, डेझी, शेवंती या वनस्पतीही अ‍ॅस्टरेसी कुलातील आहेत. डेलिया वनस्पतीला वेगवेगळ्या रंगांची आकर्षक फुले येतात.…

Read more about the article डोडो (Dodo)
डोडो (प्रतिकृती)

डोडो (Dodo)

हवेत उडण्यास असमर्थ व बोजड शरीराचा विलुप्त झालेला एक पक्षी. कोलंबिफॉर्मिस गणातील रॅफिडी कुलात या पक्ष्यांचा समावेश होत असे. रॅफस क्युक्युलेटस, रॅफस सॉलिटेरस आणि पेझोफॅप्स सॉलिटेरिया अशा त्यांच्या तीन जाती…

डोळा (Eye)

प्राण्यांमधील प्रकाशसंवेदी व प्रतिमाग्राहक इंद्रियाला डोळा म्हणतात. प्रकाशाचे ग्रहण करून त्याद्वारे माहिती मिळविणे हे डोळ्यांचे मुख्य कार्य असल्यामुळे तो मानवी शरीरातील एक महत्त्वाचे इंद्रिय आहे. डोक्याच्या कवटीतील खाचेत डोळा सात…

Read more about the article ढेकूण (Bedbug)
ढेकूण (सायमेक्स लेक्ट्युलॅरियस)

ढेकूण (Bedbug)

माणसाच्या सान्निध्यात राहून त्याच्या रक्तावर पोसणारा एक परजीवी कीटक. ढेकणाचा समावेश संधिपाद संघातील कीटकांच्या हेमिप्टेरा गणातील सायमिसिडी कुलात करतात. त्याचे शास्त्रीय नाव सायमेक्स लेक्ट्युलॅरियस आहे. तो जगभरातील उष्ण प्रदेशांत आढळतो.…

ढेमसा (Indian round gourd)

एक फळभाजी. ढेमसा ही वनस्पती कुकर्बिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव प्रीसिट्रुलस फिस्टुलॉसस असे आहे. या वर्षायू, पसरत वाढणाऱ्या वेलीचे मूलस्थान उत्तर भारत असून भारतात सर्वत्र आणि आशिया व आफ्रिकेतील…

अल्कलॉइडे (Alkaloides)

सजीवांनी (वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव इत्यादी) आपल्या विविध शारीरिक भागात निर्मिलेल्या नायट्रोजनयुक्त (Nitrogen containing) पदार्थांना अल्कलॉइडे असे संबोधिले जाते. याची सर्वसमावेशक व्याख्या केलेली  नाही. ह्या पदार्थातील नायट्रोजन हा अतिसौम्य अल्कधर्मी असावा आणि…

जे. एल. ऑस्टिन (J. L. Austin)

ऑस्टिन, जॉन लँगशॉ : (२६ मार्च १९११‒८ फेब्रुवारी १९६०). इंग्रज तत्त्ववेत्ते. जन्म लँकेस्टर येथे. शिक्षण बेलियल कॉलेज, ऑक्सफर्ड येथे. १९५२ पासून अखेरपर्यंत ऑक्सफर्ड विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक. दुसऱ्या महायुद्धात ‘ब्रिटिश इंटेलिजन्स…

तोफखाना (Artillery)

प्रगतीचा इतिहास : पूर्वी समोरासमोरील लढ्यात सैनिक हातघाईची शस्त्रे वापरीत असत. कालांतराने शत्रूवर दुरून मारा करण्याच्या कलेचा आणि अस्त्रांचा उदय झाला आणि लांब पल्ल्याची प्रक्षेपक अस्त्रे अस्तित्वात आली. सुरुवातीला ही…

भाषिक मानवशास्त्र (Linguistic Anthropology)

भाषा हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे. भाषेमुळेच संस्कृतीची निर्मिती आणि जतन शक्य होते. संस्कृती, चालीरीती, रूढी, परंपरा जतन करण्याचे आणि हा ठेवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करण्याचे काम भाषा…

दूतवाक्य (Dutvaky)

भासाचे एकांकी नाटक. व्यायोग ह्या रूपकप्रकारात याचा समावेश होतो. महाभारत हा ह्या नाटकाचा उपजीव्य ग्रंथ होय. श्रीकृष्ण दूत म्हणून कौरवांकडे येतो, येथून या नाटकाला सुरुवात होते. उत्तरा आणि अभिमन्यू यांच्या…

देवी-भागवत (Devi-Bhagwat)

पुराणवाङ्मयामधील एक प्रसिद्ध पुराणग्रंथ. देवी-भागवत पुराणामध्ये देवी म्हणजे आदिशक्ती ही प्रधान देवता आहे. इतर पुराणांप्रमाणेच देवी-भागवताची रचनाही वेदव्यासांनी केली, असे मानले जाते. काही अभ्यासक या पुराणाची रचना भागवत-पुराणानंतर झाली असावी,…