अन्नविषबाधा (Food poisoning)

अन्नातून विषारी द्रव्ये शरीरात गेली असता जी विकृती उत्पन्न होते तिला अन्नविषबाधा म्हणतात. विषाणू जीवाणू, आदिजीव असे सूक्ष्मजीव व परजीवी यांचा संसर्ग तसेच रासायनिक पदार्थांचे सेवन यांमुळे जठर आणि आतड्याचा…

अक्रोड (Walnut)

अक्रोड या वृक्षाचे शास्त्रीय नाव जुग्लांस रेजिया आहे. हा वृक्ष जुग्लँडेसी कुलातील असून मूळचा इराणमधील आहे. भारतात जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब  व उत्तर प्रदेश या राज्यांत याची मोठ्या प्रमाणावर लागवड…

अक्कलकारा (Pellitary)

अक्कलकारा ही कंपॉझिटी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव स्पायलँथिस ऍक्मेला आहे. ही औषधी वनस्पती भारत, श्रीलंका व फिलिपीन्स या देशांत आढळते. बागेतही ही वनस्पती लावतात ही वनस्पती साधारणपणे 20 - 50…

कोको (Cocao)

काकाओ (Cocao) या वृक्षाच्या बियांपासून तयार केलेल्या पदार्थाला कोको म्हणतात. त्यापासून कोको पेय, चॉकलेट, कोको बटर इ. खाद्यपदार्थ तयार करतात. काकाओ हा वृक्ष स्टर्क्युलिएसी कुलातील असून याचे शास्त्रीय नाव थिओब्रोमा काकाओ आहे.…

अंबाडी (Deccan hemp)

माल्व्हेसी कुलातील ही वनस्पती मूळची आफ्रिकेतील असून तिचे शास्त्रीय नाव हिबिस्कस कॅनाबिनस आहे. भारत, बांगला देश, थायलंड,  पाकिस्तान इ. देशांत मोठ्या प्रमाणावर या वनस्पतीची लागवड करतात. भारतात आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार…

अंडे (Egg)

सर्व पक्षी, काही उभयचर प्राणी, काही सरपटणारे प्राणी आणि मासे यांच्या माद्या अंडी घालतात.  अंडी घालणार्‍या प्राण्यांना ‘अंडज’ म्हणतात. येथे फक्त पक्ष्यांच्या अंड्यांची माहिती दिलेली आहे.वेगवेगळ्या पक्ष्यांच्या अंड्यांत विविधता आढळते.…

श्लेष्मल कवके (Slime molds)

श्लेष्मल कवके हा सूक्ष्मजीवांचा एक वैशिष्ट्यपूर्ण गट आहे. त्यांच्या जीवनचक्रातील काही अवस्था कवकांशी, तर काही आदिजीवांशी साधर्म्य दाखवितात. त्यामुळेच त्यांची गणना कधी आदिजीव गटात, तर कधी कवकांमध्ये केली गेली आहे. आधुनिक…

अंडाशय २ (Ovary)

सपुष्प वनस्पतीच्या लैंगिक प्रजननासाठी दोन भिन्नलिंगी पेशींची गरज असते. त्यांपैकी स्त्रीलिंगी पेशी ज्या ग्रंथीमध्ये तयार होते त्या ग्रंथीला ‘अंडाशय’ अथवा ‘किंजपुट’ म्हणतात. फुलाच्या जायांगाच्या तळाचा भाग म्हणजे अंडाशय. अंडाशयाच्या आत…

अंडाशय १ (Ovary)

ज्या ग्रंथीमध्ये स्त्रीबीजे (अंड) उत्पन्न होतात तिला अंडाशय म्हणतात. ते अंडकोश, बीजांडकोश व बीजांडाशय या नावांनीही ओळखले जाते. स्त्रीच्या उदरगुहेत (ओटीपोटात) उजव्या व डाव्या बाजूला प्रत्येकी एक अशी दोन अंडाशये…

अंत:स्रावी ग्रंथी (Endocrine glands)

शरीरातील अंतःस्रावी ग्रंथींना नलिकाविरहित ग्रंथी म्हणतात. या ग्रंथींमध्ये विशिष्ट रासायनिक पदार्थ म्हणजेच संप्रेरके तयार होतात. ही संप्रेरके ग्रंथीद्वारे थेट रक्तात स्रवली जातात. यामुळे सजीवांना त्यांच्या शरीराच्या आतील व बाहेरील बदलत्या…

अंतर्गळ (Hernia)

शरीरातील एखादी ऊती, इंद्रिय किंवा इंद्रियाचा भाग शरीरपोकळीतून बाहेर येण्याच्या विकृतीला ‘अंतर्गळ’ म्हणतात. शरीरातील फुप्फुसे, हृदय किंवा आतडी अशी इंद्रिये पोकळ जागांमध्ये असतात. काही वेळा अशा एखाद्या शरीरपोकळीची भित्तिका फाटली…

अंतर्गेही प्रदूषण (Indoor Pollution)

घर, कारखाना, दुकान, शाळा, कार्यालय इत्यादी वास्तूंमधील प्रदूषणास अंतर्गेही प्रदूषण म्हणतात. धूर, धूळ, मातीचे सूक्ष्मकण, सूक्ष्मजीव, बुरशी, पाळीव प्राण्यांचे केस, पिसवा, केरकचरा, सांडपाणी इ. प्रमुख प्रदूषके वास्तूत असतात. घरात स्वयंपाकासाठी पारंपारिक…

कोंडा (Dandruff)

कोंडा हा डोक्याच्या त्वचेचा एक विकार आहे. कोंडा पिवळा किंवा पांढरा आणि तेलकट असतो. सामान्यपणे डोक्यावरील त्वचेच्या मृत पेशी गळून पडत असतात. काही वेळा या मृत पेशींचा जाड थर तयार…

केसतूड (Boil)

त्वचेवरील केसांच्या मुळापाशी होणार्‍या वेदनाकारी गळूला केसतूड अथवा केसतूट म्हणतात. स्टॅफिलोकॉकस ऑरियस या जीवाणूंच्या संसर्गामुळे केसतूड होते. यात त्वचेतील केशपुटकाला म्हणजेच केसाचे मूळ, मुळाशी संबंधित ग्रंथी आणि इतर ऊती यांचा स्थानिक क्षोभ…

थेवेनिनचा सिद्धांत, नॉर्टनचा सिद्धांत आणि सर्वोच्च शक्तिहस्तांतर सिद्धांत (Thevenin theorem, Norton theorem and Maximum Power Transfer Theorem)

विद्युत जालक सिध्दांत : विद्युत रोधक, धारित्रे, वेटोळे (कुंडल) व ऊर्जा उद्गम यांसारख्या घटकांची जोडणी करून बनविलेल्या परस्परांशी निगडित अशा अनेक विद्युत मंडलांना मिळून विद्युत जालक म्हणतात. विद्युत जालकाच्या सिध्दांतातील…