दारुहळद (Indian barberry)

दारुहळद हे सदापर्णी झुडूप बर्बेरिडेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव बर्बेरिस अरिस्टॅटा आहे. ही वनस्पती मूळची भारत आणि नेपाळ या देशांमधील हिमालय पर्वतातील आहे. बर्बेरिस प्रजातीत ४००–४५० जातींचा समावेश होतो.…

दालचिनी (Cinnamon tree)

दालचिनी हा सदापर्णी वृक्ष लॉरेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सिनॅमोमम झेलॅनिकम आहे. हा वृक्ष मूळचा श्रीलंका आणि दक्षिण पूर्व आशियातील आहे. भारत, श्रीलंका, म्यानमार, मलेशिया, इंडोनेशिया तसेच उष्ण प्रदेशात…

दूरस्थ संवेदन ( Remote sensing)

कोणत्याही घटकाच्या किंवा वस्तूच्या प्रत्यक्ष संपर्कात न येता त्यासंबंधी माहिती मिळविणे, संकलित करणे व त्याचे वर्णन करणे, या तंत्राला पृथ्वीवरील दूरस्थ संवेदन म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या निरीक्षणासाठी विमाने व कृत्रिम उपग्रह…

देवदार (Deodar)

देवदार हा वृक्ष वनस्पतिसृष्टीच्या पिनोफायटा प्रभागाच्या पायनेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सीड्रस डेओडारा आहे. वनस्पतिसृष्टीचे १३ ते १४ प्रभाग पाडले जातात. यांपैकी ४ प्रभाग अनावृत बीजी (ज्या वनस्पतींच्या बियांवर…

देवराई (Sacred grove)

धार्मिक भावनेतून पवित्र मानलेले उपवन. जगातील निरनिराळ्या संस्कृती असलेल्या समाजाने पवित्र भावनेतून वृक्षांची वाढ करून ते क्षेत्र सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे केला आहे. भारतातील समाजाने धार्मिक महत्त्व देऊन राखीव…

देवी (Smallpox)

पॉक्स कुलातील व्हॅरिओला मेजर आणि व्हॅरिओला मायनर या विषाणूंमुळे होणारा संसर्गजन्य रोग.व्हॅ. मेजर या विषाणूंमुळे झालेला देवीचा आजार तीव्र स्वरूपाचा असतो तर व्हॅ. मायनर या विषाणूंमुळे झालेला आजार सौम्य स्वरूपाचा…

दिवड (Pond snake)

एक बिनविषारी साप. दिवडाचा समावेश सरीसृप वर्गाच्या कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी या उपकुलात केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव झिनोक्रोपीस पिस्केटर आहे. त्याला पाणदिवड किंवा विरोळा असेही म्हणतात. तो पूर्व अफगाणिस्तान, पाकिस्तान,…

दुष्काळ (Famine)

अन्नधान्याच्या प्रदीर्घ, तीव्र तुटवड्यामुळे उद्भभवणारी परिस्थिती म्हणजे दुष्काळ. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उपासमार होऊन बहुसंख्य लोक कृश, क्षीण व कुपोषित होतात आणि मृत्युदरात वाढ होते. जगात आजपर्यंत पडलेल्या दुष्काळाच्या नोंदींवरून असे…

दूध (Milk)

सस्तन प्राण्यांत पिलांच्या जन्मानंतर मातेच्या स्तनातून स्रवणारा द्रव पदार्थ म्हणजे दूध. सस्तन प्राण्यांमध्ये काही घर्मग्रंथींचे रूपांतर दुग्धग्रंथींमध्ये झालेले असते. दूध हे पाणी, मेदाम्ले, प्रथिन (केसीन) आणि शर्करा (लॅक्टोज) यांचे कलिली…

द्राक्ष (Grape)

व्हायटेसी कुलातील व्हायटिस प्रजातीतील वनस्पतीच्या फळांना सामान्यपणे द्राक्ष म्हणतात. जगभर या वनस्पतीच्या सु. ६० जाती आहेत. मोठ्या प्रमाणात लागवडीखाली असलेल्या द्राक्षवेलीचे शास्त्रीय नाव व्हायटिस व्हिनिफेरा आहे. इतर दोन महत्त्वाच्या मानल्या…

धोबी (Wagtail)

पॅसेरीफॉर्मिस गणाच्या मोटॅसिल्लिडी कुलातील मोटॅसिल्ला प्रजातीमधील पक्ष्यांना सामान्यपणे धोबी म्हणतात. भारतात या पक्ष्याच्या ३–४ जाती आढळतात. त्यांपैकी मोटॅसिल्ला मदरासपटेन्सिस असे शास्त्रीय नाव असलेली जाती भारतात कायमची निवासी आहे. याला मराठीत…

ध्वनी प्रदूषण (Noise pollution)

मनुष्य, प्राणी किंवा यांत्रिक पर्यावरणामुळे निर्माण झालेला मर्यादेपलीकडील असह्य ध्वनी म्हणजे ध्वनी प्रदूषण. यामुळे मनुष्य किंवा प्राणी जीवनाच्या कृती विसकळीत होतात किंवा त्यांचा समतोल बिघडतो. जगभरात मानवी परिसरातील बहुतेक ध्वनी…

धामणी (Dhaman tree)

धामणी हा माल्व्हेसी कुलातील एक वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव ग्रेविया टिलीफोलिया आहे. ताग, कापूस व कोको या वनस्पतीदेखील याच कुलातील आहेत. या मोठ्या आकारमानाच्या वृक्षाचा प्रसार भारत, नेपाळ, श्रीलंका…

धामण (Rat snake)

धामण हा भारतात सर्वत्र आढळणारा बिनविषारी साप असून तो कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलात मोडतो. याचे शास्त्रीय नाव टायास म्युकोसस आहे. हा साप दक्षिण व आग्नेय आशियातील अफगाणिस्तान, पाकिस्तानातील सिंध, तिबेट,…

धनेश (Hornbill)

ब्यूसेरॉटिडी कुलातील एक पक्षी. हा पक्षी अफ्रिका आणि आशिया खंडांतील उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशांत आढळतो. याच्या जगभरात सु. ५५ जाती आहेत. या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची मोठी व गायीच्या शिंगाच्या…