केस (Hair)

त्वचेपासून निघणार्‍या लांबट तंतूसारख्या व केराटीन या प्रथिन पदार्थांनी बनलेल्या बाह्य वाढींना केस म्हणतात. स्तनी वर्गाचे हे वैशिष्ट्य आहे. बहुतेक सस्तन प्राण्यांमध्ये तळहात व तळपाय यांखेरीज सर्वत्र केस आढळतात. डोके,…

केशवाहिनी (Capillary)

केशवाहिनी म्हणजे शरीरातील सर्वांत सूक्ष्म रक्तवाहिनी होय. केशवाहिन्यांची लांबी सु. १ मिमी. तर व्यास ८-१० मायक्रॉन (१ मायक्रॉन = ०.०००१ मिमी.) असतो. त्या एकपेशीय स्तराने बनलेल्या असून केवळ सूक्ष्मदर्शकाखालीच पाहता…

कृषी परिसंस्था (Agro-ecosystem)

शेती व्यवसायामुळे शेताभोवतालचे प्रभावित क्षेत्र म्हणजे कृषी परिसंस्था. या परिसंस्थेत त्या प्रदेशातील प्राकृतिक रचना, पीक लागवडीखालील मृदा, बिगर लागवडीखालील क्षेत्र, कुरण, पाळीव प्राणी, त्यासंबंधित क्षेत्राचे वातावरण, मृदा, पृष्ठीय व अध:पृष्ठीय…

कृत्रिम इंद्रिये (Artificial organs)

शरीरातील एखादे इंद्रिय निकामी झाले की, त्या इंद्रियाची सामान्य कार्ये घडून येण्यासाठी ते काढून टाकून त्याऐवजी कायमस्वरूपी साधने किंवा उपकरणे शरीरात बसवितात, अथवा त्या इंद्रियाचे कार्य तात्पुरते चालू राहण्यासाठी शरीराबाहेर…

सम्पनर परीक्षण (Back to back test of transformers)

रोहित्राचे निर्भार परीक्षण व विद्युत मंडल संक्षेप परीक्षण यापेक्षा अधिक चांगले परीक्षण म्हणजे रोहित्राचे बॅक टू बॅक परीक्षण होय. या परीक्षणास सम्पनर-परीक्षण असेही संबोधले जाते. हे परीक्षण अप्रत्यक्ष भार रोहित्र…

कृत्रिम अवयव (Artificial limbs)

शरीराच्या निकामी झालेल्या अवयवांचे कार्य करून घेण्यासाठी ज्या कृत्रिम साधनांचा वापर केला जातो, त्यांना ‘कृत्रिम अवयव’ असे म्हणतात. सर्वसाधारणपणे 'कृत्रिम अवयव' या संज्ञेचा उल्लेख कृत्रिम हात व पाय यांच्या संदर्भात…

कुष्ठरोग (Leprosy)

एक दीर्घकालीन संसर्गजन्य रोग. या रोगामुळे प्रामुख्याने त्वचा, विशेषकरून नाकातील श्लेष्मल पटल तसेच मेरुरज्जू आणि स्नायूंना जोडणार्‍या चेता बाधित होतात. रोगाची तीव्रता वाढल्यास डोळे, यकृत, प्लीहा, स्नायू आणि अस्थिमज्जा यांवरही…

विद्युत सेवा वाहिनी (Electrical energy Distribution system)

विद्युत् जनित्रांमध्ये (Generators) विद्युत् ऊर्जा निर्माण केली जाते व तारांच्या जाळ्यांमार्फत ग्राहकांपर्यंत पुरविली जाते. या तारांच्या जाळ्यांमध्ये १) प्रेषण तारा (Transmission Lines), २) वितरण तारा, ३) उपवितरण तारा (Feeders) आणि…

विद्युत शक्ती प्रणालीचे अर्थशास्त्र (Economies of Electrical Energy Generation, Transmission and Distribution System)

विद्युत् ऊर्जा निर्माण करताना व या ऊर्जेचा ग्राहकांना पुरवठा करताना आवश्यक असलेल्या आर्थिक खर्चाचे योग्य प्रकारे नियोजन करणे नेहमीच गरजेचे असते. असे केल्याने ग्राहकांना अल्प दरात वीज पुरविणे शक्य होते.…

वि‌द्युत शक्ती प्रकल्पाचे विद्युत दाब नियंत्रण (Voltage control of electrical power system)

विद्युत् ऊर्जा ही रोहित्रे व तारांचे जाळे इत्यादी घटकांमार्फत ग्राहकांना पुरविली जाते. सर्वच ग्राहकांची अशी अपेक्षा असते की, त्यांना मिळणाऱ्या ऊर्जेचा विद्युत् दाब (voltage) पूर्णपणे स्थिर (constant) असावा. या विद्युत्…

किरणोत्सर्गी अपशिष्ट (Radioactive Waste)

अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प व तत्संबंधित उद्योगांतून बाहेर पडणार्‍या टाकाऊ पदार्थांना किरणोत्सर्गी अपशिष्टे वा प्रदूषके म्हणतात. ही वायुरूप, द्रवरूप किंवा घनरूप असतात. खनिज मूलद्रव्यांचे उत्खनन व पृथ:करण संयुगांपासून धातू व इंधन…

रेषा मार्गक्रमण करणारा रोबॉट (Line Following Robot)

हा एक स्वयंचलित रोबॉट असून तो  नावाप्रमाणे पांढऱ्या पृष्ठभागावरील काळ्या रेषेच्या अथवा काळ्या पृष्ठभागावरील पांढऱ्या रेषेचा मागोवा घेत मार्गक्रमण करीत असतो. नवशिक्या लोकांसाठी समजण्यासाठी सोपा असा हा पहिलाच रोबॉट असतो.…

कॉड (Cod)

गॅडिफॉर्मिस गणाच्या गॅडिडी कुलातील निरनिराळ्या जातींच्या माशांना एकत्रितपणे कॉड म्हणतात. हे सागरी मासे आहेत. उत्तर अटलांटिक महासागर, उत्तर पॅसिफिक महासागर आणि बाल्टिक समुद्र यात ते आढळतात. अटलांटिक महासागरात आढणार्‍या कॉडचे…

कास्थी (Cartilage)

कास्थी (कूर्चा) ही पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये हाडांप्रमाणे शरीराला आधार देणारी संयोजी ऊती आहे. या ऊतींना अन्य ऊतींच्या मानाने पेशी कमी आणि पेशीबाहेरील आधारद्रव्य जास्त असते. संयोजी ऊतींचे आधारद्रव्य मृदू तरीही घट्ट…

कावीळ (Jaundice)

रक्तातील पित्तारुण (बिलिरूबीन) या पित्तरंजकद्रव्याचे प्रमाण वाढल्यामुळे त्वचा, डोळ्यांच्या बुबुळाचा पांढरा भाग, नखे वगैरे ठिकाणी पिवळेपणा दिसू लागतो; या स्थितीला कावीळ म्हणतात. रक्तातील तांबड्या (लोहित) पेशींचे आयुष्य ( सु. १२०…