Read more about the article भट्टीप्रोलू स्तूप (Bhattiprolu)
महास्तूप, भट्टीप्रोलू, आंध्र प्रदेश.

भट्टीप्रोलू स्तूप (Bhattiprolu)

आंध्र प्रदेशातील एक प्रसिद्ध बौद्ध स्तूप स्थळ. ते कृष्णा नदीच्या तीरापासून जवळपास ६ किमी. अंतरावर गुंटूर जिल्ह्यात आहे. या स्तूपाच्या टेकाडाला स्थानीय भाषेत ‘लांजा डिब्बाʼ असे संबोधले जाते. या स्थळाचा…

समभाग भांडवल (Equity Capital)

भांडवल आणि गुंतवणूक या संदर्भात मालकी हक्क किंवा समानाधिकार देणारा भाग म्हणजे ‘समभाग’ होय. भारतीय कंपनी कायदा १९५६ अनुसार, जो प्राधान्य भाग (प्रेफरन्स शेअर) नाही, तो भाग ‘समभाग’ म्हणून ओळखला…

कर्करोगकारक घटक (Carcinogens)

कर्करोग होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांना कर्करोगकारक घटक असे म्हणतात. तंबाखूचे सेवन, आहाराबाबत वाईट सवयी तसेच काही प्रमाणात आनुवंशिकताही कर्करोगाला कारणीभूत असते. यांत्रिकीकरण, नागरिकीकरण, वाढती लोकसंख्या याद्वारे निसर्गात सातत्याने उत्सर्जित प्रदूषके…

कर्करोग आणि आनुवंशिकता (Cancer and heredity)

आनुवंशिकता आणि कर्करोग यांचा संबंध प्राचीन काळापासून दाखवला गेला आहे. नेपोलियन बोनापार्ट हा पोटाच्या कर्करोगाने मरण पावला, याची इतिहासात नोंद आहे. तसेच त्याचे आजोबा, वडील, भाऊ आणि बहिणी सर्वजण पोटाच्या…

चक्मा जमात (Chakma Tribe)

भारतात प्रामुख्याने त्रिपुरा, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांत वास्तव्यास असणारी एक आदिवासी जमात. ही जमात काही प्रमाणात मेघालय आणि पश्चिम बंगाल तसेच भारताबाहेर बांगला देशातही स्थलांतरित झालेली दिसून…

धारुआ जमात (Dharua Tribe)

ओडिशा राज्यातील सर्वांत जुन्या जमातींपैकी एक आदिवासी जमात. ही जमात गोंड जमातीच्या जवळची मानली जाते. ही जमात ओडिशा राज्यातील कटक, कोरापूट, नोवरंगपूर, मलकांगिरी, बोलनगिरी, सुंदरगढ, मयूरभंज, संबळपूर या जिल्ह्यांत; तसेच…

आलापना (Alapana)

आलापना हा तत्कालीन परिस्थितीमध्ये ऐनवेळी पण काहीसे गुणगुणल्याप्रमाणे सादर केला जाणारा एक गानप्रकार आहे. ज्याद्वारे सादर केल्या जाणाऱ्या रागाचा स्थायीभाव आणि त्या रागाची प्रमुख स्वरलक्षणे व्यक्त केली जातात. एक चांगली…

ज्योत्स्ना भोळे (Jyotsna Bhole)

भोळे, ज्योत्स्ना केशव : (११ मे १९१४ - १ ऑगस्ट २००१). शास्त्रीय व उपशास्त्रीय गीतप्रकार आणि भावगीत गायिका व मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री. ज्योत्स्नाबाईंचा जन्म गोव्यातील बांदिवडे या गावात झाला.…

Read more about the article वायुजैवविविधता नमुने संकलनपद्धती (Bioaerosol sampling methods)
छायाचित्र १: आघात नमुना संकलन यंत्र आणि त्याद्वारे गोळा केलेल्या विविध सूक्ष्मजीवांचे नमुने

वायुजैवविविधता नमुने संकलनपद्धती (Bioaerosol sampling methods)

वायुजैवविविधतेचा अभ्यास अनेक कारणांनी महत्त्वाचा आहे. हवेमधील रोगकारक व अधिहर्षताकारक जिवंत वा मृत - घटक उदा., कवकांचे बीज, परागकण, कीटक, कीटकांच्या शरीराचे सूक्ष्म भाग, मानवाच्या आरोग्याला अपायकारक असू शकतात. हवेमध्ये…

म्यूकरमायकोसीस (Mucormycosis)

मानवाची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे बुरशी माणसाच्या जीवाला धोका निर्माण करते. कर्करोग, पेशी कलम, निकृष्ट आहार, एचआयव्हीसारखे रोग, जैविक संयुगांचा (स्टेरॉइड्स) अति-वापर, मधुमेह ही रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याची प्रमुख कारणे आहेत. जीवाला…

बुरशीजन्य व्याधी (कवकसंसर्ग रोग; Fungal Disease)

मानवी जीवनाला उपकारक आणि अपायकारक अशा दोनही प्रकारच्या बुरशींचे सूक्ष्मजीव आपल्या सभोवताली वावरत असतात. आपल्या शरीराशी असणाऱ्या सततच्या संपर्काद्वारे ते व्याधी निर्माण करतात. बुरशीजन्य व्याधींमध्ये एक संसर्गजन्य (बुरशीबरोबरच्या प्रत्यक्ष संपर्कामुळे…

समुद्री शेवाळ (Sea Weed)

समुद्री शेवाळ हा जैवशास्त्रीय उत्क्रांतीच्या खूप तळच्या पायदानामधला एक वनस्पतीचा प्रकार आहे. असूक्ष्मजीवी शैवाळाला जरी इंग्रजीत 'सी-वीड' (निरुपयोगी रान) असे म्हटले जात असले, तरी त्याचे नानाविध उपयोग आहेत आणि पर्यावरणाच्या…

ड्रॉसेरा मॅग्निफिका : भव्य दवपर्णी (Drosera magnifica : A Giant Insectivorous Plant)

ड्रॉसेरा मॅग्निफिका ही ड्रॉसेरा वंशातील कीटकभक्षी वनस्पती सर्वांत मोठी दवपर्णी (Sundew) असल्याचा शोध २०१५ मध्ये ‘पावलो गोनीला’ या वनस्पती वैज्ञानिकाने लावला. एका हौशी वनस्पती अभ्यासकाने समाजमाध्यमावर टाकलेल्या छायाचित्रामुळे या भव्य…

संत योहान यांचा सण (St. John’s Fest)

नाताळ (ख्रिस्मस) व ईस्टर या सणांप्रमाणेच जगभर कॅथलिक समाजात संत जॉन (योहान) दि बॅप्टिस्ट यांचा सणसोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला ‘सेंट जॉन्स ईव्ह’ असेही म्हटले जाते. रीओ…

खारफुटींच्या जमिनीमधील पोषकद्रव्ये आणि त्यांच्या उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक (Nutrients in Mangrove Soil and Causes Affecting Their Availability)

वनस्पतींच्या स्वत:च्या वाढीसाठी तसेच त्यांची उत्पादनक्षमता वाढण्यासाठी मातीमधील पोषकद्रव्यांची उपलब्धता हा मोठा प्रभावी घटक आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरून राहणार्‍या खारफुटी वनस्पतीदेखील याला अपवाद नाहीत. परंतु सामान्यत: खारफुटी वनस्पतींच्या मातीमध्ये…