पुष्पसंरचना : पुष्पसूत्र व पुष्पचित्र (Floral Structure : Floral Formula and Floral Diagram)
सपुष्पवनस्पती अतिशय उत्क्रांत वनस्पती असून जगभरात त्यांच्या सुमारे तीन लाखांहून अधिक प्रजाती आहेत. या सपुष्प वनस्पतींच्या वर्गीकरण अभ्यासात पुष्पसंरचनेला फार महत्त्व आहे. वर्गीकरणात केलेले पुष्परचनेचे वर्णन बऱ्याच अंशी क्लिष्ट असते…