ढगफुटी (Cloudburst)
लहानशा क्षेत्रावर अल्पकाळात अचानकपणे खूप मोठ्या प्रमाणात कोसळणार्या स्थानिक स्वरूपाच्या पावसासाठी ढगफुटी हा लोकप्रिय किंवा सर्वसाधारण पारिभाषिक शब्द वापरतात. ढग हे घनरूप पाण्याचा पुंज असून तो त्या क्षेत्रावर फुटतो, असा…
लहानशा क्षेत्रावर अल्पकाळात अचानकपणे खूप मोठ्या प्रमाणात कोसळणार्या स्थानिक स्वरूपाच्या पावसासाठी ढगफुटी हा लोकप्रिय किंवा सर्वसाधारण पारिभाषिक शब्द वापरतात. ढग हे घनरूप पाण्याचा पुंज असून तो त्या क्षेत्रावर फुटतो, असा…
पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एखाद्या स्थळाचे जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) स्थूलमानाने त्याच्या अक्षवृत्तानुसार ठरविता येते. यावरून एकूण भूपृष्ठाच्या अक्षवृत्तांनुसार कल्पिलेल्या अशा पट्ट्यांना कटिबंध म्हणतात. म्हणजे व्यवच्छेदक (विभिन्न) वैशिष्ट्यपूर्ण जलवायुमान आणि अक्षवृत्तांच्या समांतर…
तीव्र उताराच्या किंवा जवळजवळ उभ्या बाजू असणाऱ्या व सपाट माथ्याच्या लहान मैदानाला टेबललँड म्हणतात. टेबलासारखा दिसणारा हा उंचवटा सुटा वा एकाकी असल्याने तो सभोवतालच्या भूप्रदेशात ठसठशीतपणे उठून दिसतो. कधीकधी याला…
पूर्वी अस्तित्वात असलेला विषुववृत्तीय महासागर (किंवा भूमध्य समुद्र). लॉरेशिया हा उत्तरेकडील महाखंड व गोंडवनभूमी हा दक्षिणेकडील महाखंड मध्यजीव महाकल्पात (सुमारे २४.५ ते ६.६४ कोटी वर्षांपूर्वीच्या मोठ्या कालखंडात) टेथिसमुळे अलग झालेले…
स्पष्ट वा वेगळे शिखर असलेल्या जमिनीच्या कमी उंची असलेल्या उंचवट्याला टेकडी म्हणतात. डोंगर टेकडीपेक्षा आणि पर्वत डोंगरापेक्षा उंच असतो. टेकडीच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व उंची पर्वतापेक्षा खूपच कमी असते. टेकडीच्या उंचीबाबत…
समुद्रकिनारी वाहणारे हे स्थानिक वारे असून समुद्राकडून जमिनीकडे वाहणार्या अशा वार्यांना खारे वा सागरी वारे, तर जमिनीकडून समुद्राकडे वाहणार्या वार्यांना मतलई वारे म्हणतात. सर्वसाधारणपणे हे वारे एकानंतर दुसरा म्हणजे आळीपाळीने…
उत्तर आफ्रिकेत व अरेबियन द्वीपकल्पात आढळणारा गरम, शुष्क व धुळीचा वाळवंटी वारा. तो ईजिप्तमध्ये व तांबड्या समुद्रावर वाहताना आढळतो. प्रामुख्याने ईजिप्तमध्ये या वाऱ्याला खामसीन या नावाने ओळखले जात असून भूमध्य…
सागरकिनाऱ्याला लागून असणारा उथळ सागरतळ म्हणजे सागरमग्न खंडभूमी होय. खंड-फळी व भूखंड मंच या पर्यायी संज्ञाही सदर भूविशेषासाठी वापरल्या जातात. बहुतेक खंडांच्या किनाऱ्याशी सागरमग्न खंडभूमी आढळतात. जगातील महासागरांनी व्यापलेल्या एकूण…
मऊ किंवा ओबडधोबड (खडबडीत), लांबट वा गोलाकार संग्रंथनी (Concretionary), नलिका व ग्रंथिल-गुठळ्या (Nodular) सारख्या आकाराचे आणि अनियमित पातळ पापुद्रे ते जाड थरांच्या चुनखडीच्या राशीस कंकर म्हणतात. अवसादशास्त्रातील हिंदी भाषेमधून कंकर…
अग्निज कुळ वर्गीकरणाच्या तालिकेतील पातालिक (Plutonic), अल्पसिलिक (Basic), भरडकणी (Coarse grained) या गट प्रकारातील गॅब्रो हा महत्त्वाचा प्रातिनिधिक अग्निज खडक. हा खडक ग्रॅनाइटइतका विपुल नाही, परंतु मध्य महासागर कटकांच्या परिसरात…
हिमनदीने किंवा हिमानी क्रियेने साचलेल्या डबरीद्वारे निर्माण झालेल्या टेकडीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण भूरूपाला ड्रमलीन म्हणतात. याचा आकार चहाच्या उपड्या चमचासारखा म्हणजे लंबगोलाकार व एक बाजूला निमुळता झालेला असा असतो. हिमनदीने वाहून आणलेल्या…
अँफिबोल या प्रमुख खनिज गटातील हॉर्नब्लेंड ही अनेक साधर्मी असलेल्या खनिज घटकांची माला (Hornblende series) असून हे अँफिबोलाइट या खडकामध्ये मुख्य घटक असतात. आब्राहाम गॉटलोप व्हेर्नर यांनी १७८९ मध्ये एका…
हेमिमॉर्फाइट हे जस्ताचे पांढरे, रंगहीन, फिकट हिरवे, निळे वा पिवळे खनिज असून जस्ताचे धातुक (कच्च्या रूपातील धातू) आहे. याची स्फटिक संरचना कॅलॅमाइन प्रमाणे असून यांना विद्युत् कॅलॅमाइन वा गॅल्मेई असेही म्हणतात. स्फटिक…
आर्सेनिक या मूलद्रव्याचे खनिज. हरताळच्या वैशिष्ट्यपूर्ण पिवळ्या रंगामुळे व त्यात सोने असते या समजामुळे ऑरिपिग्मेंटम (सोनेरी रंग लेप) या लॅटिन शब्दावरून त्याचे ऑर्पिमेंट हे इंग्रजी नाव आले आहे. याला 'यलो…
आइन्स्टाइनियम हे आवर्त सारणीच्या गट ३ मधील ॲक्टिनाइड श्रेणीतील मानवनिर्मित/संश्लेषित धातुरूप मूलद्रव्य आहे. याची रासायनिक संज्ञा Es अशी असून अणुक्रमांक ९९ आणि अणुभार २५२ इतका आहे. आइन्स्टाइनियमच्या सर्वांत स्थिर असणाऱ्या…