सूक्ष्म शरीर / लिंगदेह (लिंगशरीर)
डोळ्यांना दिसणारे शरीर हाच जीवाचा एकमात्र देह आहे अशी सर्वसामान्य समजूत असते. माता आणि पिता या दोघांपासून उत्पन्न झालेला रक्त, मांस, अस्थी, मज्जा इत्यादी असलेला देह म्हणजे स्थूल शरीर होय.…
डोळ्यांना दिसणारे शरीर हाच जीवाचा एकमात्र देह आहे अशी सर्वसामान्य समजूत असते. माता आणि पिता या दोघांपासून उत्पन्न झालेला रक्त, मांस, अस्थी, मज्जा इत्यादी असलेला देह म्हणजे स्थूल शरीर होय.…
मराठीमध्ये ‘समाधि’ हा शब्द स्त्रीलिंगामध्ये प्रचलित असला तरी संस्कृतमध्ये तो पुल्लिंगी आहे. लोकव्यवहारात ‘समाधि’ शब्दाचा अर्थ ‘ज्या ठिकाणी सत्पुरुषांनी देहत्याग केला ते पवित्र ठिकाण’ असा आहे. तर ‘समाधि घेणे’ या…
योगशास्त्रात अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश या पाचांना ‘क्लेश’ अशी संज्ञा आहे (अविद्यास्मितारागद्वेषाभिनिवेशा: क्लेशा:| योगसूत्र २.३). ते नाना प्रकारच्या दु:खांना कारणीभूत होतात, परिणामी जीवाला क्लेश देतात म्हणून ‘क्लेश’ ही…
पुरुष आणि प्रकृति ही सांख्यदर्शनाची दोन पायाभूत तत्त्वे आहेत. भारतीय दर्शनात व्यक्तीच्या आत्म्यास ‘पुरुष’ अशी संज्ञा दिली आहे. सांख्यदर्शनात पुरुषाला ‘ज्ञ’ असेही म्हटले आहे. पुरुषाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सांख्यदर्शन पुढील…
सांख्य-योग दर्शनांमध्ये पुरुष आणि प्रकृती ही दोन सर्वव्यापी आणि नित्य तत्त्वे आहेत. पुरुष म्हणजे चेतनतत्त्व आणि प्रकृति म्हणजे जडतत्त्व असे सामान्यरूपाने म्हणता येऊ शकते. ‘प्रकर्षेण करोति इति प्रकृति:’ अर्थात् जे…
महर्षि पतंजलींनी योगशास्त्रात नियमांचा उल्लेख योगाचे एक अंग म्हणून केला आहे. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान यांचा अंतर्भाव नियमांत होतो (पातंजल योगसूत्र २.३२). त्यातील तप शब्दाचा अर्थ स्पष्ट करीत असताना…
‘ध्यान’ म्हणजे चिंतन. ध्यान शब्द संस्कृत भाषेतील ‘ध्यै’ या धातूपासून (धातु = क्रियापदाचे मूळ रूप) निर्माण झाला आहे. त्याचा अर्थ ‘चिंतन करणे’ असा आहे. ज्या एखाद्या देशावर म्हणजे वस्तूवर अथवा…
नाडी या संकल्पनेला हठयोगात महत्त्वाचे स्थान आहे. नाडी शब्द ‘नद्’ या धातूपासून तयार झाला आहे. ‘स्पंदन पावणे’ असा या धातूचा अर्थ आहे. प्राण शरीरामधील सर्व नाड्यांमध्ये संचार करतो व स्पंद…
पतंजलींनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे सांगितली आहेत (योगसूत्र २.२९). ती योगसाधनेच्या परिपूर्णतेसाठी आवश्यक आहेत. या अष्टांगांतील पहिले अंग म्हणजे यम होय.…
पतंजलींनी अष्टांगयोगात प्रतिपादन केलेल्या पाच यमांपैकी अस्तेय हा तिसरा यम आहे (अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमा । योगसूत्र २.३०). अस्तेय म्हणजे ‘चोरी न करणे’. पातंजल योगसूत्रावरील व्यासभाष्यात आणि व्यासभाष्यावरील तत्त्ववैशारदी या वाचस्पति मिश्रांनी…
पतंजलींनी अष्टांगयोगात प्रतिपादन केलेल्या पाच यमांपैकी सत्य हा दुसरा यम आहे (अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमा:| योगसूत्र २.३०). पतंजलींनी योगसूत्रात सत्याची व्याख्या दिलेली नाही. योगसूत्रावरील भाष्यात व्यासांनी सत्याची व्याख्या ‘जो पदार्थ जसा असेल…
दर्शनाचा उगम दु:खाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी या हेतूने झाला आहे. ज्याप्रमाणे चिकित्साशास्त्रात रोग, रोगाचे कारण, रोगाचा नाश आणि रोग नष्ट करण्याचा उपाय या चतुर्विध आयामांचा रोगमुक्तीसाठी सांगोपांग विचार केला जातो,…
योगाचे अंतिम लक्ष्य संसारचक्रातून मुक्ती हे आहे. त्यासाठी चित्ताच्या वृत्तींचा निरोध करणे आवश्यक आहे. परंतु, चित्तात एकापाठोपाठ एक उद्भवणाऱ्या अनेक वृत्तींचा निरोध करणे सहजासहजी शक्य नसल्यामुळे चित्ताची एक वृत्ती म्हणजेच…
‘प्रसव’ किंवा ‘सर्ग’ याचा अर्थ सृष्टी किंवा निर्मिती असा आहे. ‘प्रतिप्रसव’ म्हणजे त्रिगुणात्मक सृष्टीचा क्रमश: मूळ कारणात लय होणे. प्रकृति म्हणजे सत्त्व, रजस्, तमस् या त्रिगुणांची साम्यावस्था होय. या अवस्थेतील प्रकृतीला…
महर्षि पतंजलींनी ‘चित्ताच्या वृत्तींचा निरोध म्हणजे योग’ अशी योगाची व्याख्या केली आहे. सामान्य भाषेत चित्ताच्या वृत्ती म्हणजे ‘विचार’ असे समजता येईल. चित्ताच्या सर्व वृत्तींचा निरोध करणे म्हणजे चित्त निर्विचार होणे…