न्यूक्लीय विखंडन (Nuclear fission)

[latexpage] अणुकेंद्रकाचे जवळजवळ समान वस्तुमान असलेल्य़ा दोन भागांमध्ये होणाऱ्या विभाजनाच्या प्रक्रियेला न्यूक्लीय विखंडन म्हणतात. साधारणपणे युरेनियम (uranium) अथवा त्याहून अधिक वस्तुमान असलेल्या अणुकेंद्रकांचे उत्स्फूर्तपणे विखंडन होते. अशा विखंडनांला उत्स्फूर्त (spontaneous)…

निर्वनीकरण (Deforestation)

मानवी क्रियांसाठी वनांचे सफाईकरण व विरलीकरण म्हणजे निर्वनीकरण होय. काही वेळा पूर, वादळ, वणवा इत्यादी नैसर्गिक कारणांमुळे देखील निर्वनीकरण घडून येते. परंतु याच्या तुलनेत मानवाकडून होणाऱ्या निर्वनीकरणाचे प्रमाण प्रचंड आहे.…

नीलगाय (Nilgai)

नीलगाय गोकुलातील प्राणी असून त्याचे शास्त्रीय नाव बॅसिलॅफस ट्रेगोकॅमेलस आहे. प्रौढ नराचा रंग निळसर राखाडी (निळसर करडा) असल्यामुळे त्याला ‘नीलगाय’ नाव पडले आहे. त्याच्या नावात जरी ‘गाय’ असले, तरी हा…

नैसर्गिक संसाधने (Natural resources)

मानवाला निसर्गातील उपयुक्त असलेल्या घटकांना किंवा पदार्थांना नैसर्गिक संसाधने म्हणतात. नैसर्गिक संसाधनांमध्ये जमीन, पाणी, हवा, सूर्यप्रकाश इत्यादींचा समावेश होतो. तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेली खनिजे, खनिज तेल, वनस्पती यांचाही समावेश…

उत्सर्जन (Excretion)

शरीरातील अतिरिक्त पाणी, नको असलेले पदार्थ, तसेच घातक पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया. सर्व सजीवांमध्ये उत्सर्जन घडून येत असते. एकपेशीय सजीवांमध्ये टाकाऊ पदार्थ पेशीच्या पृष्ठभागापासून थेट विसर्जित होतात, तर बहुपेशीय सजीवांमध्ये…

कोकिळ (Cuckoo)

पक्षी वर्गातील क्युक्युलिफॉर्मिस गणाच्या क्युक्युलिडी कुलामधील पक्षी. या कुलात १२५ हून अधिक जाती आहेत. हे पक्षी जगात सर्वत्र आढळतात. भारतात कोकिळ सर्वत्र आढळतो. हिमालयात तो आढळत नाही, परंतु त्याच्या पायथ्याच्या…

अन्नपरिरक्षण (Food preservation)

अन्नपरिरक्षण म्हणजे अन्न खराब होऊ न देता, दीर्घकाळ खाण्यायोग्य स्थितीत टिकविणे. अन्नपरिरक्षणाच्या पद्धतींमुळे अन्नपदार्थांचे पोषणमूल्य, बाह्य स्वरूप, पोत, स्वाद व गुणवत्ता यांवर दुष्परिणाम घडवून आणण्यार्‍या घटकांवर नियंत्रण राखणे शक्य होते.…

अनुकूलन (Adaptation)

वनस्पती वा प्राणी यांच्यामध्ये पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी होणार्‍या बदलाच्या प्रक्रियेला अनुकूलन म्हणतात. अनुकूलन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे सजीव त्यांच्या नैसर्गिक परिस्थितीत यशस्वी रीत्या जगण्यासाठी सक्षम होत असतात.…

धामण (Rat snake)

धामण हा भारतात सर्वत्र आढळणारा बिनविषारी साप असून तो कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलात मोडतो. याचे शास्त्रीय नाव टायास म्युकोसस आहे. हा साप दक्षिण व आग्नेय आशियातील अफगाणिस्तान, पाकिस्तानातील सिंध, तिबेट,…

कंटकचर्मी (Echinodermata)

फक्त समुद्रात राहणार्‍या आणि बहुतांश कठिण व काटेरी (कंटक) त्वचा असणार्‍या अपृष्ठवंशी प्राण्यांचा संघ. या संघाला एकायनोडर्माटा असे नाव आहे. या संघात तारामीन, समुद्रनलिनी, सागरी काकडी, समुद्री अर्चिन इ. प्राणी येतात. कँब्रियन…

ग्लायकोजेन (Glycogen)

ग्लायकोजेन हे एक कर्बोदक आहे. मानव तसेच उच्चस्तरीय प्राण्यांच्या शरीरात ग्लुकोजचा संचय ग्लायकोजेनच्या रूपात केला जातो. ग्लायकोजेन ही ग्लुकोजपासून तयार होणारी बहुशर्करा असून तिचे रेणुसूत्र (C6H10O5)n असे आहे. ग्लायकोजेनच्या एका रेणूत…

चुंबकीय अनुस्पंद प्रतिमाकरण (Magnetic resonance imaging)

वैदयकीय क्षेत्रात शरीराच्या आतील अवयवांच्या प्रतिमा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणारे एक तंत्रज्ञान. रोगनिदान, उपचार आणि उपचारानंतर पाठपुरावा करण्यासाठी शरीरातील अवयवांचे नेमके प्रतिमाकरण करणे आवश्यक असते.चुंबकीय अनुस्पंद  प्रतिमा (एम्. आर्. आय्.)…

Read more about the article अंकुरण (Germination)
अधिभूमिक अंकुरण

अंकुरण (Germination)

अंकुरण म्हणजे बीज (बी) रुजून त्यातून अंकुर बाहेर येण्याची प्रक्रिया होय. अंकुरण हा वनस्पतींच्या वाढीतील ए क महत्त्वाचा टप्पा आहे. वनस्पतींचे सपुष्प (फुले येणार्‍या) वनस्पती व अपुष्प (फुले न येणार्‍या)…

रेनडियर (Reindeer)

स्तनी वर्गातील समखुरी गणाच्या मृग कुलातील (सर्व्हिडी कुलातील) एक प्राणी. त्याचे शास्त्रीय नाव रँगिफर टॅरँडस आहे. ते आर्क्टिक व उपआर्क्टिक शीत प्रदेशांत आढळतात. उत्तर ध्रुवाकडील प्रदेश, टुंड्रा व तैगा येथे…

मण्यार (Common krait)

जमिनीवर आढळणारा एक विषारी साप. मण्याराचा समावेश सरीसृप वर्गाच्या इलॅपिडी कुलातील बंगारस प्रजातीत करतात. भारतीय उपखंडात साधा मण्यार (बंगारस सीरुलियस), पट्टेरी मण्यार (बंगारस फॅसिएटस) आणि काळा मण्यार (बंगारस नायगर) अशा…