(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : वर्षा देवरुखकर
चित्रपट हे सर्वांच्या परिचयाचे आणि तरीही नवे माध्यम आहे. एकूण कलांचा इतिहास पाहिला, तर तुलनेने खूपच मर्यादित कालावधीत हे माध्यम विकसित झाले आहे. चित्रकला, शिल्पकला यांसारख्या कला शेकडो वर्षांच्या कालावधीत घडत, बदलत गेलेल्या आहेत. त्या तुलनेने चित्रपट या कलामाध्यमाला नुकतीच शंभर वर्षे पुरी झाली. त्यामुळे एका परीने आपण चित्रपटमाध्यमाच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्येच आहोत. तरीही आज चित्रपटाने एक कलाप्रकार म्हणून आणि तंत्रज्ञानातही मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली आहे.

चित्रपट हे कला आणि विज्ञान यांचे एकसंध मिश्रण आहे, आणि त्याचा विकास हा शंभर वर्षांत झालेला असला, तरी वेगवेगळ्या कालावधींत वेगवेगळ्या प्रांतांमधून त्यात प्रगती होत गेलेली आहे. ल्युमिएरबंधूंनी जेव्हा १८९५ मध्ये हे माध्यम प्रथम लोकांपर्यंत आणले, तेव्हा ते कृष्णधवल स्वरूपात होते, ध्वनी नव्हता, त्याचा वापर कसा केला जाईल, हेदेखील पूर्णत: अनिश्चित होते. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत त्याचा तांत्रिक विकास होत त्याला एक पूर्ण स्वरूप आले, त्याचबरोबर त्याचा एक कथामाध्यम म्हणून विविध मार्गांनी कसा वापर केला जाईल, या संबंधातही विचार झाला. या काळात जसे प्रतिभावान दिग्दर्शक या माध्यमात उतरले, तसेच अनेक विचारवंतही. त्यांच्या कामामधून चित्रपटाने समाजाला सर्वांत जवळचे कलामाध्यम म्हणून नाव मिळवले. दुसऱ्या महायुद्धानंतर चित्रपटनिर्मितीचा व्याप खूपच वाढला आणि मोठ्या चित्रपट उद्योगांबरोबरच लहानलहान देशही त्यात सामील झाले. आज आपण चित्रपट ज्यावर मुद्रित होतो, त्या फिल्मलाच रजा देऊन डिजिटल युगात पोचलो आहोत. हा सारा इतिहास, त्याबरोबरच संबंधित व्यक्ती आणि विचारांचा आढावा, हा या विषयाचा महत्त्वाचा भाग आहे.

जागतिक चित्रपटाकडे पाहताना भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास कसा झाला, हेदेखील पाहणे आवश्यक ठरते. त्याबरोबरच चित्रपटाचे तंत्र आणि तंत्रज्ञान, महत्त्वाच्या संकल्पना, परिभाषा आणि चित्रपटाबरोबरचे समाजाचे नाते या सगळ्यांचा विचार येथे केला जाईल.

शाहरुख खान (Shahrukh Khan)

शाहरुख खान

शाहरुख खान : (२ नोव्हेंबर १९६५). हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते. त्यांचा जन्म दिल्ली येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मीर ताज ...
शिंडलर्स लिस्ट (Schindler's List)

शिंडलर्स लिस्ट

हा ऐतिहासिक शैलीचा एक अमेरिकन चित्रपट आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या धुमश्चक्रीत एका जर्मन व्यक्तीने हजारो ज्यू धर्मियांचे प्राण वाचविले होते. या ...
शिवाजी गणेशन् (Sivaji Ganesan)

शिवाजी गणेशन्

शिवाजी गणेशन् : (१ ऑक्टोबर १९२८–२१ जुलै २००१). तमिळ रंगभूमीवरील व चित्रपटसृष्टीतील एक श्रेष्ठ अभिनेते. मूळचे पूर्ण नाव विलुपुरम चिनय्या ...
शोले (Sholey)

शोले

भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध हिंदी चित्रपट. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केले. तर निर्मिती जी. पी. सिप्पी यांची होती ...
श्याम बेनेगल (Shyam Benegal)

श्याम बेनेगल

बेनेगल, श्याम : (१४ डिसेंबर १९३४). एक ख्यातकीर्त भारतीय दिग्दर्शक आणि पटकथाकार. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन न मानता त्यातून ...
श्यामची आई (Shyamchi Aai)

श्यामची आई

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विजेता प्रसिद्ध मराठी चित्रपट. या चित्रपटाची कथा प्रसिद्ध साहित्यिक व स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने) यांनी लिहिलेल्या ...
श्रीदेवी (Sridevi)

श्रीदेवी

श्रीदेवी : (१३ ऑगस्ट १९६३ २४ फेब्रुवारी २०१८). भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री. दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटातून अनेक कलाकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीत ...
सत्यजित राय (Satyajit Ray)

सत्यजित राय

राय, सत्यजित : ( २ मे १९२१ – २३ एप्रिल १९९२ ). आंतरराष्ट्रीय ख्यातीचे श्रेष्ठ भारतीय चित्रपट-दिग्दर्शक आणि ‘भारतरत्न’ या ...
सलीम खान (Salim Khan)

सलीम खान

खान, सलीम अब्दुल राशिद : (२४ नोव्हेंबर १९३५). भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील सुप्रसिद्ध कथा-पटकथाकार म्हणून गाजलेल्या सलीम-जावेद ...
सिटीझन केन (Citizen Kane)

सिटीझन केन

प्रसिद्ध अमेरिकन चित्रपट. १९४१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ऑर्सन वेल्स यांनी केले आहे. तर प्रकाशचित्रण ग्रेग टोलंड यांचे ...
सिनेमापूर्व कालखंड

पॅरिस येथील ग्रॅंड कॅफेमध्ये २८ डिसेंबर १८९५ रोजी चार्ज ऑफ द ड्रॅगन्स या चित्रपटाचा पहिला खेळ ल्यूम्येअर बंधूंनी सिनेमॅटोग्राफ (सिनेमतोग्राफ) ...
सी. रामचंद्र (C. Ramachandra)

सी. रामचंद्र

सी. रामचंद्र : (१२ जानेवारी १९१८— ५ जानेवारी १९८२). हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक व पार्श्वगायक. मूळ नाव रामचंद्र नरहर चितळकर. ‘सी ...
सुब्रता मित्रा (Subrata Mitra)

सुब्रता मित्रा

मित्रा, सुब्रता : ( १२ ऑक्टोबर १९३० – ७ डिसेंबर २००१). प्रसिद्ध भारतीय चलचित्रणकार / प्रकाशचित्रणकार (Cinematographer). भारतीय सिनेसृष्टीतील महत्त्वाच्या ...
सुमित्रा भावे (Sumitra Bhave)

सुमित्रा भावे

भावे, सुमित्रा : (१२ जानेवारी १९४३–१९ एप्रिल २०२१). मराठी चित्रपटसृष्टीतील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रपट निर्मात्या, लेखिका आणि प्रतिभावान दिग्दर्शिका. सुमित्रा भावे यांचा ...
सुलोचना (Sulochana)

सुलोचना

सुलोचना : (३० जुलै १९२८ — ४ जून २०२३). मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री. त्यांचा जन्म खडकलाट (कोल्हापूर जिल्हा) येथे ...
सोहराब मोदी (Sohrab Modi)

सोहराब मोदी

मोदी, सोहराब मेरवानजी : (२ नोव्हेंबर १८९७ – २८ जानेवारी १९८४). हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते, अभिनेते व दिग्दर्शक. त्यांचा जन्म ...
स्मिता पाटील (Smita Patil)

स्मिता पाटील

पाटील, स्मिता : (१७ ऑक्टोबर १९५५­−१३ डिसेंबर १९८६). मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील संवेदनशील श्रेष्ठ अभिनेत्री. स्मिता पाटील यांचा जन्म पुणे ...
हिमांशू राय (Himanshu Rai)

हिमांशू राय

राय, हिमांशू : (? १८९२–१६ किंवा १८ मे १९४०). ‘बॉम्बे टॉकीज’ या सुप्रसिद्ध चित्रपटनिर्मितीसंस्थेचे संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने चित्रपटनिर्मिती करणारे ...
हृषिकेश/ऋषिकेश मुखर्जी (Hrishikesh Mukherjee)

हृषिकेश/ऋषिकेश मुखर्जी

मुखर्जी, हृषिकेश (ऋषीदा) : (३० सप्टेंबर १९२२ – २७ ऑगस्ट २००६). भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान दिग्दर्शक आणि सिनेसंकलक. त्यांनी कलात्मकता ...