(प्रस्तावना) पालकसंस्था : मराठी विज्ञान परिषद, मुंबई | समन्वयक : अ. पां. देशपांडे | विद्याव्यासंगी : नितीन भरत वाघ
माणसाच्या उदयापासून तो प्रगती करीत आहे. ही प्रगती म्हणजेच विज्ञान. मग तो अग्नीचा शोध असो, की वल्कलाचा शोध असो, की गुहेत राहण्याचा. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आणि त्याच्या प्राप्तीसाठी व त्यातील सुधारणांसाठी मानवाने अनेक शोध लावले.चाकाचा शोध हा त्यातील एक क्रांतीकारक शोध.चरक आणि सुश्रुताने जगाला आयुर्वेदाची देणगी दिली.तशीच गणितातील शून्याचा शोधही तितकाच क्रांतीकारक मानला जातो. हे शोध भारताच्या नावावर आहेत.ग्रीक लोकांनीसुध्दा पायथागोरस सिद्धांत व गणितात इतर बरेच शोध लावले. मात्र त्यानंतर पाश्चात्य देशांनी विज्ञानात मोठीच आघाडी घेतली.

हे शोध लावणा-या जगातल्या संशोधकांची चरित्रे संक्षेपाने या ज्ञानमंडळाच्या वेबसाइटवर पाहायला मिळणार आहेत.संशोधकांशिवाय हे ज्ञानमंडळ संशोधन करणा-या जगातील विविध संस्थांविषयीही माहिती देणार आहे.हे संशोधक आणि संशोधन करणा-या संस्था या भौतिकी, रसायन, जीवशास्त्र, गणित, भूशास्त्र, मानववंशशास्त्र, अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, अभियांत्रिकी, शेती, पर्यावरण अशा नाना प्रकारच्या विज्ञान विषयातील असणार आहेत.

विज्ञानात रोज नवनवीन विषय निर्माण होत आहेत.मुळात माणसाला नाविन्याची आवड असल्याने कालच्यापेक्षा आज काहीतरी नवीन आणि सुधारीत गोष्ट त्याला हवी असते.हा हव्यासाच त्याला संशोधन करायला भाग पाडतो.अशी संशोधने आता वैयक्तिकस्तरावर लागण्याचा काळ मागे पडला असून संशोधने आता सांघिक स्तरावर होतात अथवा ती संस्थात्मक पातळीवर होतात.

ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला,ज्यांना नोबेल समकक्ष असलेले आबेल, फिल्ड्स, जल अथवा तत्सम पुरस्कार मिळाले,ज्यांना आपापल्या देशातील मानाचे पुरस्कार मिळाले आहेत,ज्यांच्या संशोधनामुळे समाजावर परिणाम घडवून आला आहे, ज्यांना आंतरराष्ट्रीय समित्यांवर अथवा मासिकांवर सभासदत्त्व मिळाले आहे,ज्या संस्था सातत्याने संशोधन करीत आहेत, जी मासिके संशोधनपर लेख आणि निबंध छापत आहेत, टाटां-हेन्री फोर्डसारखे जे महत्त्वाचे उद्योगपती आहेत,भाभा-नारळीकर-अब्दुस सलाम यासारख्या ज्या ज्या वैज्ञानिकांनी विज्ञानसंस्था स्थापन केल्या आहेत आणि जे विज्ञान प्रसारक आहेत अशा व्यक्ती आणि संस्थांवर या कोशात नोंदी लिहिल्या आहेत त्यांपैकी काहींनी एक अथवा एकापेक्षा अधिक गोष्टीतील पात्रता संपादन केली आहे.

ॲडॉल्फ एड्युअर्ड  मेयर (Adolf Eduard Mayer)

ॲडॉल्फ एड्युअर्ड  मेयर (Adolf Eduard Mayer)

मेयर, डॉल्फ एड्युअर्ड( ९ ऑगस्ट, १८४३ ते २५ डिसेंबर, १९४२ )  ॲडॉल्फ एड्युअर्ड मेयर यांचा जन्म जर्मनीतील ओल्डेनबर्ग (Oldenburg) ...
ॲबे, अर्न्स्ट कार्ल (Abbe,  Ernst Karl)

ॲबे, अर्न्स्ट कार्ल (Abbe,  Ernst Karl)

ॲबे, अर्न्स्ट कार्ल : ( २३ जानेवारी, १८४० ते १४ जानेवारी, १९०५ ) अर्न्स्ट कार्ल ॲबे यांचा जन्म ऐसेनाच येथे झाला ...
ॲलन बेकर (Alan Baker)

ॲलन बेकर (Alan Baker)

बेकर, ॲलन : (१९ ऑगस्ट १९३९ — ४ फेब्रुवारी २०१८). ब्रिटीश गणितज्ज्ञ. संख्या सिद्धांताच्या कामाकरिता त्यांना १९७० सालातील फील्डस पदक ...
ॲलिसन, जेम्स पॅट्रिक (Allison, James Patrick)

ॲलिसन, जेम्स पॅट्रिक (Allison, James Patrick)

ॲलिसन,जेम्स पॅट्रिक : ( ७ ऑगस्ट १९४८ ) जेम्स ॲलिसन यांचा जन्म अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील अलिस येथे झाला. जेम्स ॲलिसन ...
ॲलेक आयझॅक (Alick IIsaac)

ॲलेक आयझॅक (Alick IIsaac)

आयझॅक, ॲलेक  (१७ जुलै १९२१ – २६ जानेवारी १९६७). ब्रिटिश (स्कॉटिश) विषाणुशास्त्रज्ञ. आयझॅक यांनी झां लिंडनमन या स्वीस शास्त्रज्ञांसोबत इंटरफेरॉनचा ...
ॲलेक्झांड्रियाचे डायोफँटस  (Diophantus of Alexandria)

ॲलेक्झांड्रियाचे डायोफँटस (Diophantus of Alexandria)

ॲलेक्झांड्रियाचे डायोफँटस  (अंदाजे २१४ – २९८). ग्रीक गणितज्ञ. बीजगणिताचा पाया तिसऱ्या शतकात डायोफँटस यांनी भक्कमप्रकारे घातला म्हणून त्यांना आद्य बीजगणिताचे जनक मानले ...
ॲल्फ्रेड चार्ल्स किन्झी (Alfred Charles Kinsey)

ॲल्फ्रेड चार्ल्स किन्झी (Alfred Charles Kinsey)

किन्झी, ॲल्फ्रेड चार्ल्स (२३ जून १८९४ – २५ ऑगस्ट १९५६). अमेरिकन प्राणीशास्त्रज्ञ आणि मानवी लैंगिक वर्तनाचे अभ्यासक. किन्सी ह्यांचा जन्म ...