डेव्हिड जे. ज्युलियस (David J. Julius)

ज्युलियस, डेव्हिड जे : (४ नोव्हेंबर, १९५५ - ) डेव्हिड जे ज्युलियस यांचा जन्म  न्यूयॉर्क राज्यातील ब्रायटन बीच ब्रुकलिन येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण अब्राहम लिंकन स्कूलमध्ये झाले. मॅसेच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये…

मधुसूदन कानुंगो (Madhusudan Kanungo)

कानुंगो, मधुसूदन : (१ एप्रिल १९२७ - २६ जुलै २०११) मधुसूदन कानुंगो यांचा जन्म ओडिशातील बेहरामपुर येथे झाला. उत्कल विद्यापीठातून त्यांनी विज्ञान शाखेतील पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी लखनौ विद्यापीठातून प्राणिविज्ञानाचे पदव्युत्तर…

जॉर्जिना मेस (Georgina Mace)

मेस, जॉर्जिना : (१२ जुलै १९५३ - १९ सप्टेंबर २०२०) जॉर्जिना मेस यांचा जन्म लंडन येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सिटी ऑफ लंडन स्कूल फॉर गर्ल्समध्ये झाल्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल…

राष्ट्रीय भात संशोधन संस्था, कटक (National Rice research Institute)

राष्ट्रीय भात संशोधन संस्था, कटक (स्थापना : २३ एप्रिल १९४६) १९४२ साली त्यावेळच्या बंगाल प्रांतात भाताच्या पानावर कॉक्लिओबोलस मियाबिनस कवकामुळे  (बुरशी) भातावरील तांबेरा रोगामुळे भाताचे पीक नष्ट झाले. भाताचा राष्ट्रीय…

जीवनसत्त्व क (Vitamin C)

क जीवनसत्त्व पाण्यात विद्राव्य असून काही अन्नपदार्थांत ते नैसर्गिकरित्या सापडते. याचा समावेश ब जीवनसत्त्व समूहात होत नाही. याची रचना एकशर्करा रेणू (Monosaccharide) सारखी आहे. इतिहास : १९३२ मध्ये सी. जी.…

जिनोमिक्स व एकात्मिक जीवविज्ञान संस्था (सीएसआयआर) (Institute of Genomics and Integrative Biology- CSIR-IGIB)

जिनोमिक्स व एकात्मिक जीवविज्ञान संस्था (सीएसआयआर) : ( स्थापना १९७७ ) दिल्ली येथील, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च-सीएसआयआर) संस्था समूहातील जीवविज्ञानात संशोधन करणारी ही एक…

इंडियन कार्डमम रिसर्च इन्स्टिट्यूट  (Indian cardamom research Institute)

इंडियन कार्डमम रिसर्च इन्स्टिट्यूट : ( स्थापना १९७८ ) इंडियन कार्डमम रिसर्च इन्स्टिट्यूट (आयसीआरआय) किंवा भारतीय वेलदोडा संशोधन संस्था ही वेलदोडा किंवा इलायची या मसाल्याच्या पदार्थावर संशोधन करणारी केरळमधील एक…

बालसुब्रमनियन, दोराइराजन (Balasubramanian, Dorairajan)

बालसुब्रमनियन, दोराइराजन : ( २८ ऑगस्ट १९३९ ) प्रा. डी.  बालू म्हणून लोकप्रिय असणारे दोराइराजन बालसुब्रमनियन भारतीय जीवरसायन वैज्ञानिक आणि नेत्र जीवरसायनतज्ञ आहेत. इंडियन अकॅडेमी ऑफ सायन्सेसचे ते माजी अध्यक्ष…

सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायालॉजी (Centre for cellular and Molecular Biology – CCMB)

सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायालॉजी : (स्थापना - १९७७) वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद (सीएसआयआर) या केंद्र सरकारच्या  संस्थेच्या अंतर्गत हैद्राबाद येथे पेशी आणि रेण्वीय जीवविज्ञान केंद्राची (सेंटर फॉर सेल्युलर…

ताडोबा-अंधारी अभयारण्य (Tadoba-Andhari Wildlife Sanctuary)

ताडोबा-अंधारी अभयारण्य हे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि अंधारी अभयारण्य व या दोहोंमधील कोळसा आणि मोहर्ली वन विभाग अशा तीन विभागांचे एकत्र ताडोबा-अंधारी राखीव वन क्षेत्र बनले…

जायकवाडी पक्षी अभयारण्य ( Jayakwadi Bird sanctuary)

जायकवाडी पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात आहे. महाराष्ट्रातील पाणपक्ष्यांचे सर्वांत मोठे पक्षी अभयारण्य म्हणून जायकवाडी अभयारण्य ओळखले जाते. औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर व पैठण तसेच अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव…

फणसाड अभयारण्य (Phanasad Wildlife Sanctuary)

महाराष्ट्रातील फणसाड हे अभयारण्य रायगड जिल्ह्यातील मुरुड व रोहा तालुक्यात येते. महाराष्ट्र शासनाने २५ फेब्रवारी १९८६ रोजी या क्षेत्राला राखीव वनाचा दर्जा देत अभयारण्य म्हणून घोषित केले. या अभयारण्याचे क्षेत्रफळ…

नागझिरा अभयारण्य (Nagzira Wildlife Sanctuary)

नागझिरा अभयारण्य हे भंडारा-गोंदिया जिल्ह्यात असून जैवविविधतेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचे अभयारण्य आहे. १९७० मध्ये घोषित करण्यात आलेल्या या अभयारण्याचे भौगोलिक स्थान २१.१४.३८० उत्तर व ७९.५९.०९० पूर्व असे आहे. नागझिराचे वन…

भीमाशंकर अभयारण्य (Bhimashankar Wildlife Sanctuary)

भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव आणि खेड तालुक्यात असून पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगेत आहे. भौगोलिक स्थान अक्षांश १९.१७३९१३७० उत्तर व रेखांश  ७३.५८२४२१७० पूर्व असून समुद्रसपाटीपासून २,१००—३,८०० फूट उंच आहे.…

आयुःकाल (Life-span)

सजीवाचा जन्म आणि मृत्यू यांदरम्यानचा कालावधी म्हणजे सजीवाचा आयुःकाल. जीवविज्ञानाच्या व्याख्येनुसार सजीवाचा आयुःकाल हा गर्भधारणा ते मृत्यू यांदरम्यानचा कालावधी असे ठरविला जातो. याच कालावधीत सजीवाच्या संरचनेत आणि कार्यात अनेक बदल…