ग्रीक मृत्पात्रावरील चित्रकला (Greek Pottery Painting)
प्राचीन ग्रीक चित्रकलेतील अजूनही अस्तित्वात असलेल्या आणि विपुल प्रमाणात उपलब्ध झालेल्या पुराव्यांमध्ये मृत्पात्रांवरील चित्रणाचा समावेश होतो. ग्रीक मृत्पात्र चित्रकला ही इतर चित्रणपद्धतीपेक्षा तंत्र, प्रमाण आणि उद्दिष्ट यामध्ये वेगळी असल्याचे आढळते.…
