स्नायू आणि कंडरा (Muscle and Tendon)
(मसल अँड टेंडन). स्नायू ही प्राण्यांमध्ये आढळणारी आकुंचनक्षम (आकुंचन पावू शकणारी) ऊती आहे. प्राण्यांमध्ये स्नायू ऊती, चेता ऊती, अभिस्तर ऊती (जसे, इंद्रियांच्या किंवा वाहिन्यांच्या बाह्यस्तरातील ऊती) आणि संयोजी ऊती (अन्य…
