शिला स्मारके : संधित टफ (Rock Monuments : Welded Tuff)

विविध स्फोटशकली पदार्थांना एकत्रित आणण्याचे काम जेव्हा त्यांच्यातील उष्णतेमुळे वितळलेले कण, ज्वालामुखीय काच पदार्थ तसेच लाव्हारसाचे अंश करतात तेव्हा त्याला संधित खडक (Welded rock) म्हणतात. जोधपूर (राजस्थान) जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा…

स्वेच्छाधिकार (Voluntary rights)

स्वेच्छाधिकार : भारतीय संविधानात राज्यपालाच्या अधिकारासंबंधी स्वेछाधीकाराबद्दलचा संदर्भ आलेला आहे. ‘स्वेच्छाधिकार’ म्हणजे आपल्या विवेकबुद्धीच्या आधाराने स्वतःच्या अखत्यारीत निर्णय घेणे. संसदीय पद्धतीत राष्ट्रप्रमुख असणाऱ्या राष्ट्रपतीस आणि राज्य पातळीवर राज्यापालास सर्वसाधारण मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार…

गट ग्रामपंचायत (Group Gram Panchayat)

गट ग्रामपंचायत :  मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील कलम, ५ प्रमाणे, प्रत्येक गावात एक पंचायत असेल. ग्रामपंचायतीची स्थापना करण्यासाठी गावाची लोकसंख्या किमान ६०० इतकी असावी लागते. ज्या गावांची लोकसंख्या सहाशे…

गट विकास अधिकारी (Block Development Officer)

गट विकास अधिकारी : पंचायत समितीच्या प्रशासकीय कार्यकारी प्रमुखास गट विकास अधिकारी असे म्हणतात. समुदाय विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी १९५२ मध्ये गट विकास अधिकारी हे पद निर्माण करण्यात आले. महाराष्ट्र जिल्हा…

सुलह कूल (sulah e kul)

सुलह कूल : सुलह कूल ही मध्ययुगीन राजकीय विचारातील संकल्पना आहे. सुलह कूल  (Sulhikul) हा एक अरबी शब्द असून, ज्याचा शाब्दिक अर्थ सूफी रहस्यवादी तत्त्वानुसार वैश्विक शांती किंवा संपूर्ण शांती असा आहे.…

भिमा शिवय्या स्वामी (Bhima Shivayya Swami)

भिमा शिवय्या स्वामी : (१५ ऑक्टोंबर १९४३). मराठी कादंबरीकार. जन्म सोनसांगवी ता. केज, जि. बीड येथे झाला. प्राथमिक शिक्षण जन्मगावी तर हायस्कुलचे शिक्षण बार्शी येथे सिल्व्हर ज्युबिली हायस्कुल मध्ये झाले. पी.…

अंकुर (Ankur)

भारतीय चित्रपटसृष्टीतील समांतर चित्रपटशैलीच्या प्रारंभीच्या काळातील महत्त्वाचा चित्रपट. सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १९७४ मध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाची पटकथा श्याम बेनेगल यांनी, तर संवाद सत्यदेव दुबे…

देवीसिंग व्यंकटसिंग चौहान (Devising Vyankatsing Chouhan)

चौहान, देवीसिंग व्यंकटसिंग :  (२ मार्च १९११ - १० डिसेंबर २००४). ऋग्वेदाचे भाष्यकार, भाषाशास्त्राचे जाणकार, मराठी व दक्खिनी हिंदीचे भाषिक अभ्यासक आणि इराणी सांस्कृतिक संबंधाचे संशोधक, स्वातंत्र्यसेनानी. देवीसिंग चौहान यांचा…

बियाणे : सामान्य आणि उद्दाम (Seeds  : Orthodox and Recalcitrant)

सामान्य बियाणे कोरडी झाल्यास किंवा थंडीने गोठविल्यास त्यांच्यावर दुष्परिणाम होत नाही; ती जिवंत राहतात, रुजून त्यांच्यापासून नवीन रोपटे तयार होऊ शकते. अशी बियाणे पेढ्यांमध्ये साठविता येतात. सुमारे ७५ ते ८०…

चंद्रकांत दत्तोपंत देऊळगावकर (Chandrakant Dattopant Deulgaonkar)

देऊळगावकर, चंद्रकांत दत्तोपंत : (१७ मे १९३२- २ जानेवारी २०१६). संत साहित्याचे अभ्यासक . यू. म. पठाण यांच्या मार्गदर्शनाने मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे मन्मथ स्वामी : व्यक्ती आणि वाङ्मय या…

शेषराव माधवराव मोहिते (Shesharao Madhavrao Mohite)

मोहिते, शेषराव माधवराव : ग्रामीण कादंबरीकार आणि शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते. १९८० नंतरच्या पिढीतील महत्त्वाचे ग्रामीण कादंबरीकार म्हणून त्यांची ओळख आहे. व्हंताळ (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) येथे एका शेतकरी कुटुंबात त्यांचा…

बाळूभाई रूकडीकर (Balubhai Rukadikar)

बाळूभाई रूकडीकर : (२८ डिसेंबर १८८८ – २२ ऑक्टोबर १९६२). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तबलावादक. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे खरे नाव उस्ताद गुलाम हुसेन. लहानपणी वडिलांबरोबर ते पंतअमात्य बावडेकर यांच्याकडे…

यूरोटनेल (Eurotunnel)

यूरोटनेल हा जगप्रसिद्ध प्रकल्प चॅनेल टनेल या नावाने ‍देखील ओळखला जातो. यामुळे इंग्लंड आणि फ्रान्स हे देश रेल्वेमार्गाने जोडले गेले आहेत. हा मार्ग इंग्लिश चॅनेलखालून जातो. फोल्कस्टोन (Folkestone), इंग्लंड आणि…

घरबांधणी आणि वास्तुरचना (House construction and Architecture)

घरे बांधताना खोल्यांची मांडणी, पाण्याची सोय, सूर्यप्रकाशाचे नियोजन, सांडपाण्याचे व्यवस्थापन अशा अनेक महत्त्वाच्या बाबींचा विचार करावा लागतो. यामध्ये वास्तुरचनाकार आणि अंतर्गत सज्जा विशेषज्ञ (Interior designer) यांची भूमिका महत्त्वाची असते. पारंपरिक…

भावातिरेकी सक्तियुक्त विकृतीचे प्रकार (Types of Obsessive-Compulsive Disorder)

मनोविकृतीच्या या मानसिक आजारास कल्पना क्रिया अनिवार्यता / विचार कृती अनिवार्यता / कल्पना कृती अनिवार्यता असेही म्हटले जाते. या नोंदीत सुलभतेकरिता कल्पना कृती अनिवार्यता या परिभाषेचा वापर केलेला आहे. या…