केंद्रकाम्ले (Nucleic acids)
सजीव पेशींची बहुतेक सर्व रचना आणि जैविक प्रक्रिया प्रथिनांद्वारे (Proteins) होतात. प्रथिनांचे कार्य त्यांच्या विशिष्ट रचनेवर अवलंबून असते. प्रथिन निर्मितीचा आराखडा सजीवांच्या जनुकांमध्ये सांकेतिक रूपात असतो. जनुकांमधील माहितीचा अर्थ लावणे…