थ्रेओज केंद्रकीय अम्ल (Threose Nucleic Acid)

थ्रेओज केंद्रकीय अम्ल (TNA; Threose Nucleic Acid) हा एक कृत्रिमरित्या बनवलेला बहुवारिक रेणू आहे. हे संश्लेषी जीवविज्ञानातील एक महत्त्वाचे उदाहरण आहे. या रेणूची निर्मिती ॲल्बर्ट ॲशेनमोसर (Albert Eschenmoser) या स्वीस…

विधेय तर्कशास्त्र (Predicate Logic)

तर्कशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना. हिला ‘विधेय कलन’ असेही म्हटले जाते. तर्कशास्त्र हे मुख्यत्वेकरून युक्तिवादाशी संबंधित आहे. युक्तिवाद म्हणजे विधानांचा असा समुच्चय ज्यात पुराव्याच्या आधारे निष्कर्ष विधान काढले जाते. तर्कशास्त्राचा संबंध…

जीवनसत्त्व अ  (Vitamin A)

जीवनसत्त्व अ हे एक सेंद्रिय संयुग असून मेद विद्राव्य आहे. त्याची आहारातील आवश्यकता कमी आहे. परंतु, त्याच्या कमतरतेमुळे काही विकार होतात. क्रियाशील अ जीवनसत्त्व केवळ प्राण्यांच्या ऊतींमध्ये असते. वनस्पती ऊतींमध्ये…

निकुंजविहारी बॅनर्जी (Nikunja Vihari Banerjee)

बॅनर्जी, निकुंजविहारी : ( २६ सप्टेंबर १८९७—३१ मार्च १९८२ ). भारतीय तत्त्वचिंतक. पश्चिम बंगालमधील एका खेडेगावी जन्मलेले निकुंजविहारी ह्यांचे शिक्षण कोलकाता विद्यापीठात झाले. ब्रजेंद्रनाथ सील, हिरालाल हल्डर, सुशीलकुमार मैत्र यांसारख्या…

अब्जांश संवेदके (Nanosensors)

मानवी शरीराच्या डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा या पंचेंद्रियांद्वारे विविध प्रकारच्या संवेदना ग्रहण केल्या जातात. ही पंचेंद्रिये म्हणजे मानवी शरीरातील नैसर्गिक संवेदके होत. या पंचेंद्रियांमुळे वातावरणात झालेले कुठलेही अतिसूक्ष्म…

इस्माइली पंथ (Ismaili Sect / Cult)

एक इस्लामी धर्मपंथ. शिया पंथाचाच हा एक उपपंथ असून तो इमाम जाफर अल्-सादिक यांच्या मृत्यूनंतर ७६५ च्या सुमारास उदयास आला. इस्माइली पंथाच्या अनेक शाखोपशाखा झाल्या. इस्माइल हे अल्-सादिक यांचा मुलगा.…

एश्चेरिकिया कोलाय (ई. कोलाय) [Escherichia Coli (E. Coli)]

एश्चेरिकिया कोलाय (Escherichia Coli) या जीवाणूचा समावेश प्रोटीओबॅक्टिरिया (Proteobacteria) संघातील गॅमाप्रोटीओबॅक्टिरिया (Gammaproteobacteria) वर्गाच्या एंटेरोबॅक्टिरियालीस (Enterobacteriales) या गणात  होतो. हा जीवाणूंच्या फीकल कॉलिफॉर्म (feacal coliform) गटात मोडतो. ग्रॅम अभिरंजन (Gram Staining)…

प्रातिनिधिक सजीव : एश्चेरिकिया कोलाय (Model Organism : Escherichia coli)

एश्चेरिकिया कोलाय (ई. कोलाय - Escherichia coli) या जीवाणूचा उपयोग प्रातिनिधिक सजीव म्हणून करण्यात येतो. पृथ्वीवरील प्राचीन परजीवी परपोषी जीवाची (Parasitic - heterotrophic organism) रचना ई. कोलायप्रमाणे असल्याने जीवाणूंची उत्क्रांती…

आगाखान (Aga Khan)

इस्लाम धर्माच्या शिया पंथातील निझारी इस्माइली हा एक उपपंथ असून त्याच्या प्रमुखास ‘आगाखान’ (‘अगा खान’, ‘अधा खान’, ‘आकाखान’ असेही पर्याय आहेत) ही पदवी लावण्यात येते. खोजा नावाने ओळखली जाणारी जातही…

क्वेस्टा (Cuesta)

एका बाजूला तीव्र उतार किंवा तुटलेला कडा आणि दुसऱ्या बाजूला मंद वा सौम्य उतार असलेल्या भूरूपाला क्वेस्टा म्हणतात. याला एकनतीय कटक असेही म्हणतात. हे भूरूप विशेषत: विचलित झालेल्या गाळाच्या खडकांच्या…

ओटावा नदी (Ottawa River)

पूर्व कॅनडातील सेंट लॉरेन्स नदीची प्रमुख उपनदी. ओटावा नदी क्वीबेक प्रांताच्या पश्चिम भागातील लॉरेंचन या पठारी व पर्वतीय प्रदेशात उगम पावते. पश्चिमेकडे तमिस्कमिंग सरोवराकडे वाहत जाऊन ही नदी पुढे आग्नेय…

मिरॅकल पुष्पोद्यान (Miracle Garden)

स्मार्ट सिटीच्या निमित्ताने शहरात अस्तित्वात असणाऱ्या उद्यानांचे नूतनीकरण आणि नवनिर्मिती करण्याची संधी शहर प्रशासनाला आता उपलब्ध झाली आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना आकृष्ट करणारे वेगळे स्वरूप उद्यानांना त्यासाठी  आपणास द्यावे…

चिकणरंग चित्रण (Tempera Painting)

‘चिकणरंग चित्रण तंत्रपद्धती’मध्ये रंगद्रव्य सौम्य होण्यासाठी तसेच चित्र सुकल्यावर ते पक्के व्हावे, म्हणून तेल वा पाण्यासारख्या द्राव्य माध्यमात मिसळून चित्रणासाठी वापरले जाते. या तंत्रपद्धतीचा महत्त्वाचा गुण म्हणजे रंग खलविण्याकरिता वापरण्यात…

मरीना शहर (Marina city)

कमीतकमी जागेत भरभक्कम पायावर काँक्रीटचा उत्तुंग इमारती मनोरा (Tower)  म्हणजे शिकागोतील मरीना शहर होय. पार्श्वभूमी : १९६० च्या दशकात अमेरिकेतील शिकागो उपनगरात एक लघुनगररचना (Mini township)  फक्त ३ एकर जमिनीवर…

इजीअन समुद्र (Aegean Sea)

भूमध्य समुद्राचा एक फाटा. इजीअन समुद्राच्या पश्चिमेस व उत्तरेस ग्रीस आणि पूर्वेस तुर्की हे देश असून समुद्राची दक्षिणेकडील मर्यादा क्रीट या बेटाने सीमित केली आहे. या समुद्राची लांबी ६१२ किमी.,…