मानमोडी टेकडीवरील लेणी-समूह, जुन्नर (Rock-cut Caves on Manmodi Hill, Junnar)
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर परिसरातील ‘मानमोडी’ टेकडीवरील प्रसिद्ध बौद्ध (थेरवाद) लेणी-समूह. जुन्नरच्या आग्नेयेस सु. २ किमी. अंतरावर मानमोडी डोंगराची सु. ३ किमी. लांबीची रांग आहे. त्यात सुरुवातीस भीमाशंकर, मधल्या भागात अंबा-अंबिका…
