चतुरंग (Chaturanga)
उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतातील एक जुना गायनप्रकार. बाराव्या शतकापासून तो रूढ असल्याचे दिसते. ‘चतुर्मुख’ या नावाने त्याचा निर्देश सोमेश्वरलिखित मानसोल्लास वा अभिलषितार्थचिंतामणि (११२७) या ग्रंथात आढळतो. हा प्रकार जरी ख्याल, ठुमरी इ.…