यादवकालीन नाणी (Yadava Coins)
महाराष्ट्रातील मध्ययुगातील एक इतिहासप्रसिद्ध राजघराणे म्हणजे यादव घराणे. हे (बारावे-तेरावे शतक) देवगिरी (सध्याचे दौलताबाद, जि. औरंगाबाद) येथून राज्य करत होते. वेंगींच्या चालुक्य घराण्याने पूर्व मध्ययुगीन काळात (१०-११वे शतक) अतिप्राचीन काळी रूढ असलेल्या आहत पद्धतीने…
