शारीरिक ठेवण (Posture)

एखादी व्यक्ती उभी राहिल्यानंतर किंवा बसल्यानंतर त्याच्या किंवा तिच्या शरीराची जी अवस्था धारण करते, त्या शरीराच्या अवस्थेला शारीरिक ठेवण असे संबोधले जाते. प्रकार : शारीरिक ठेवणीचे दोन प्रकार आहेत :…

जागतिक मधुमेह दिवस (World Diabetes Day)

मधुमेह या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय मधुमेह प्राधिकरण (International Diabetes Federation, IOF) या संस्थेद्वारे १९९१ मध्ये ही संकल्पना…

आधुनिकतावाद (Modernism)

ख्रिस्ती धर्मातील एक सुधारणावादी विचारसरणी. एकोणिसाव्या शतकात विज्ञानोदयाच्या व बुद्धिवादाच्या प्रभावाखाली ख्रिस्ती धर्माच्या परंपरागत व तात्त्विक विचारांमध्ये परिवर्तन होऊ लागले. तसेच विज्ञानाशी व बुद्धिवादाशी जुळेल, असा ‘पवित्र-पुस्तकाचा’ (होली बायबलचा) नवा अर्थ…

अंतरंग–बहिरंग योग

महर्षि पतंजलींनी योगसूत्रांमध्ये अष्टांगयोगाचे विवेचन केलेले आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे आहेत. यांपैकी पहिली पाच अंगे योगाचे बहिरंग, तर शेवटची तीन…

Read more about the article दु:ख
Circles Farm Ppt Templates | Art | Pinterest | Ppt Template within Professional Powerpoint Background Green - cortezcolorado.net

दु:ख

जीवाला ज्या भावनेचा अनुभव अप्रिय वाटतो, अशी प्रतिकूल भावना म्हणजे दु:ख होय. दु:खाचा अनुभव सर्वच जीवांना प्रत्यक्ष रूपाने येत असल्यामुळे त्याचे अस्तित्व कोणीच नाकारू शकत नाही. दु:खाचा अनुभव बाह्य इंद्रियाद्वारे…

यम

पतंजलींनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे सांगितली आहेत (योगसूत्र २.२९). ती योगसाधनेच्या परिपूर्णतेसाठी आवश्यक आहेत. या अष्टांगांतील पहिले अंग म्हणजे यम होय.…

दिवाळी (Diwali)

एक प्रसिद्ध भारतीय सण व दीपोत्सव. पावसाळा संपून नवी पिके हाती आल्यानंतर हा सण येत असल्याने हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने कृषिविषयक आंनदोत्सवही आहे; तर सुख-समृद्धीचा उत्सव म्हणून व्यापारी, उद्योगपतींसह सर्व स्तरांतील…

इरेटॉस्थेनिझची चाळणी (Sieve of Eratosthenes)

[latexpage] ग्रीक गणितज्ञ इरेटॉस्थेनिझ (Eratosthenes : इ.स.पू. सुमारे 276 - 194)  यांनी  '$P$'  या दिलेल्या एक पेक्षा मोठ्या नैसर्गिक संख्येपर्यंतच्या सर्व अविभाज्य संख्या शोधण्याची जी पद्धत सांगितली, तिला 'इरेटॉस्थेनिझची चाळणी'…

धातूंचे परीक्षण (Metal Testing & Analysis)

धातूंचे परीक्षण : धातूच्या यंत्रभागांचे, वस्तूंचे वा त्यांच्या धातूंचे परीक्षण. आजच्या यंत्रयुगातील सर्व प्रकारच्या यंत्रसामग्रीला निरनिराळ्या धातूंची व मिश्रधातूंची जरूरी असते. निरनिराळी यंत्रे, सुटे भाग, दाबयंत्रे, बांधकामात वापरण्यात येणारे लोखंड व…

तुकडोजी महाराज (Tukdoji Maharaj)

तुकडोजी महाराज : (३० एप्रिल १९०९—११ ऑक्टोबर १९६८). महाराष्ट्रातील एक आधुनिक संत, कवी, समाजसुधारक व राष्ट्रीय उत्थानाची सतेज भावना असलेले महामानव. मूळ नाव माणिक बंडोजी ठाकूर. त्यांचा जन्म बंडोजी व…

धातूंचे उष्णता संस्करण (Heat Treatment of Metals)

धातूची घन अवस्था कायम ठेवून उष्णतेच्या साह्याने तिच्या संरचनेत हवा तसा बदल घडवून आणण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेत धातूचे तापमान पाहिजे तितके वाढविणे, तिला जरूर तितका वेळ त्या तापमानात राहू देणे…

सागरी परिसंस्था (Marine Ecosystem)

जलपरिसंस्थेच्या विविध प्रकारांपैकी सर्वांत विशाल परिसंस्था. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे ७०.८% क्षेत्र पाण्याखाली असून त्यातील सुमारे २.५% क्षेत्र गोड्या पाण्याखाली आणि उर्वरित ९७.५% क्षेत्र खाऱ्या पाण्याने व्यापलेले आहे. त्यामुळे सागरी…

चारित्र्य (Character)

चारित्र्याचे किंवा शीलाचे स्वरूप दुहेरी आहे. ज्याच्या ठिकाणी चारित्र्य आहे, अशा माणसाच्या मानसिक जीवनात व वर्तनात सुसंगती असते, त्याच्या आचरणात स्थैर्य असते, कित्येक उद्दिष्ट्ये–उदा., आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे कल्याण, व्यावसायिक यश…

सेंदाई शहर (Sendai City)

जपानच्या होन्शू बेटावरील मीयागी प्रांताची राजधानी व एक प्रमुख शहर. यास सेंडाई शहर असेही म्हणतात. लोकसंख्या १०,९१,४०७ (२०२०). होन्शू बेटाच्या ईशान्य भागात हीरोसे या नदीकाठावर हे शहर वसले असून ते…

ह्यू क्लॅपरटन (Hugh Clapperton)

क्लॅपरटन, ह्यू (Clapperton, Hugh) : (१८ मे १७८८ – १३ एप्रिल १८२७). स्कॉटिश समन्वेषक, नौदल अधिकारी आणि पश्चिम आफ्रिकेतील सांप्रत नायजेरियाचा प्रत्यक्षदर्शी वृतांत घेऊन येणारी पहिली यूरोपियन व्यक्ती. त्यांचे पूर्ण…