परिसंस्थीय मानवशास्त्र (Ecological Anthropology)

मानव आणि परिसंस्था (पर्यावरण) यांमधील जटिल संबंधांचा अभ्यास करणारे शास्त्र. भूमी, हवामान, वनस्पती आणि सभोवतालच्या इतर सजीव-निर्जीव घटकांबरोबर मानवाचा सतत संपर्क असतो. याचा परस्पर परिणाम पर्यावरणाच्या विविध घटकांवर आणि त्याबरोबरच…

मूलपरिवेश (Rhizosphere)

झाडांच्या मुळांशेजारील असलेल्या मातीच्या भागाला मूलपरिवेश म्हणतात. या भागातील मातीच्या जैव व रासायनिक घटकांवर मुळांचा प्रभाव असतो. बीज अंकुरून जेव्हा रोपटे वाढू लागते, तेव्हा मूलपरिवेशातील सूक्ष्मजीव आणि वाढणारे रोपटे यांच्यात…

नेपोलियन, तिसरा (Napoleon III)

नेपोलियन, तिसरा : (२० एप्रिल १८०८ – ९ जानेवारी १८७३). फ्रान्सचा १८५२–७० च्या दरम्यानचा बादशाह व पहिल्या नेपोलियनचा पुतण्या. त्याचे पूर्ण नाव शार्ल ल्वी नपॉलेआँ बॉनपार्त; पण तो लुई नेपोलियन…

प्राणी पेशी (Animal cell)

पंचसृष्टी सजीवातील (Five kingdom classification) दृश्य केंद्रकी पेशी. तिचा आकार गोलाकार किंवा अनियमित असून लांबी १०—३० मायक्रोमीटर असते. प्राणी पेशीचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यामध्ये पेशीभित्तिकेऐवजी पेशीआवरण असते. प्राणी पेशीत मुख्यत: पेशी…

दासरथी रंगाचार्य (Dasarathi Rangacharya)

दासरथी रंगाचार्य  :  (२४ ऑगस्ट १९२८ - ८ जून २०१५ ).भारतीय साहित्यातील विख्यात तेलुगू साहित्यिक आणि नेते. तेलंगना चळवळीचे अग्रणी, हैद्राबादच्या निझामाच्या हुकूमशाही, दडपशाही विरूद्ध बंड करणारे, सशस्त्र सेनेत हैद्राबाद…

भू-पर्यटन (Geo-tourism)

भू-पर्यटन हा अलीकडील काळात जगभर दृढ झालेला शब्द आहे. शाश्वत पर्यावरणाच्या प्रक्रियेला जोडण्यासाठी तसेच निसर्ग आणि भूवैज्ञानिकीय घडामोडींचे आंतरसंबंध समजून घेण्यासाठी भूविज्ञान सहल व भूवैज्ञानिकीय स्थळांना भेटी देणे असे याचे…

शिकागो संप्रदाय (Chicago School)

अर्थशास्त्रातील नव-अभिजातवादी विचारवंताचा एक समूह. अमेरिकेतील शिकागो विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील अभ्यासकांच्या विचारप्रवाहातून हा संप्रदाय निर्माण झाला. हा केन्सविरोधी आर्थिक विचारवादी अर्थतज्ज्ञांचा संप्रदाय असल्याचे दिसून येते. सन १९३० च्या दशकात अर्थतज्ज्ञ…

चार्ल्स सँडर्स पर्स (Charles Sanders Peirce)

पर्स, चार्ल्स सँडर्स : (१० सप्टेंबर १८३९—१९ एप्रिल १९१४). प्रसिद्ध अमेरिकन तत्त्वज्ञ आणि फलप्रामाण्यवाद ह्या तत्त्वज्ञानातील विचारपंथाचा एक संस्थापक. जन्म केंब्रिज (मॅसॅचूसेट्स) येथे. वडील बेंजामिन पर्स हे हार्व्हर्ड विद्यापीठात गणित…

पाण्याखालील मुळांचे श्वसन (Root Respiration Underwater)

शेतजमिनी पाण्याखाली गेल्या म्हणजे बहुतेक सर्व पिकांच्या उत्पादनक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो. ‘लेग्युमिनोजी’ (शिंबावंत) कुलातील विशेषत: हरभरा, वाटाणा, सोयाबीन,  भुईमूग, तूर, उडीद इ. पिके पुरामध्ये टिकाव धरू शकत नाहीत, कारण ‘ऱ्हायझोबियम’…

विष्णुबुवा ब्रह्मचारी (Vishnubuva Brahmachari)

विष्णुबुवा ब्रह्मचारी : ( ? १८२५ – १८ फेब्रुवारी १८७१). स्वतंत्र विचारसरणीचे धर्मसुधारक व एक विचारवंत. त्यांचे मूळ नाव विष्णू भिकाजी गोखले. विष्णुबोवा (विष्णुबावा) ब्रह्मचारी म्हणूनही परिचित. रायगड जिल्ह्यातील शिरवली…

रामकृष्णन, वेंकटरमण (Ramakrishnan, Venkatraman)

रामकृष्णन, वेंकटरमण  (५ एप्रिल १९५२ - ) वेंकटरमण रामकृष्णन् यांचा जन्म भारतातील तामिळनाडू राज्यातील चिदम्बरम् या गावी झाला. त्यांचे आई वडील दोघेही संशोधक होते. वडील महाराजा सयाजीराव बडोदा विद्यापीठाच्या जैवरासायनिक…

एश्चेरीश, थिओडोर (Escherich, Theodor )

एश्चेरीश, थिओडोर  (२९ नोव्हेंबर, १८५७ - १५ फेब्रुवारी,  १९११) थिओडोर एश्चेरीश यांचा जन्म जर्मनीतल्या आंसबाख येथे झाला. त्यांचे वडील फर्डिनांड एश्चेरीश हे आरोग्य विभागात जिल्हा वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.…

ब्राऊन, हर्बर्ट चार्ल्स (Brown, Herbert Charles)

ब्राऊन,  हर्बर्ट चार्ल्स  (२२ मे, १९१२ – १९ डिसेंबर, २००४) हर्बर्ट चार्ल्स ब्राऊन यांनी बी.एस. आणि पीएच.डी आणि पोस्ट डॉक्टरेट या पदव्या प्राप्त केल्या. शिकागो विद्यापीठात त्यांनी प्रशिक्षक म्हणून कामाला…

चंद्रनाथ मिश्रा ‘अमर (Chandranath Mishra Amar)

चंद्रनाथ मिश्रा ‘अमर’ : (२ मार्च १९२५). भारतीय साहित्यातील सुप्रसिद्ध मैथिली साहित्यिक. कवी म्हणून त्यांची प्रमुख ओळख आहे. कादंबरी, एकांकिका, समीक्षा आणि वृत्तपत्रीय लेखन इत्यादी साहित्य प्रकारातही त्यांनी लेखन केले…

चंद्रप्रकाश देवल (Chandraprakash Deval)

देवल, चंद्रप्रकाश : (१४ ऑगस्ट १९४९). सुप्रसिद्ध हिंदी आणि राजस्थानी साहित्यिक. कविता, अनुवाद अशा विभिन्न पातळीवर लिहिताना त्याचवेळी इंग्रजी, हिंदी आणि राजस्थानी अशा विविधांगी भाषेत लेखन करणे हे त्यांचे वैशिष्ट…