गोवा, दीव, दमण मुक्ती (Operation Vijay – 1961)

योजना : गोवा काबीज करण्यासाठी एक इन्फन्ट्री डिव्हिजन, चिलखती दलाची एक रेजिमेंट, तोफखाना दलाचे दस्ते आणि भारतीय वायुदलाची लढाऊ विमाने यांचा वापर करण्याचे ठरविण्यात आले. भारतीय नौदलाला गोव्याची नाकेबंदी करून…

Read more about the article मेघालयन काळ (Meghalayan Age)
मेघालय राज्यातील मौमलूह गुहेचे प्रकाशचित्र

मेघालयन काळ (Meghalayan Age)

पृथ्वीवरील सु. ४.६ अब्ज वर्षांच्या भूवैज्ञानिक घडामोडींच्या इतिहासाची विभागणी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी भूवैज्ञानिक कालमापी (Geological Timescale) तयार केली. त्याप्रमाणे  सध्या आपण नवजीव महाकल्पातील (Cenozoic Era) चतुर्थ कल्पामधील (Quaternary Period) आता चालू…

ड्युरँड रेषा (Durand Line)

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमारेषा म्हणजे ड्युरँड रेषा. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार ही आंतरराष्ट्रीय सीमा समजली जाते. पार्श्वभूमी : रशिया १८८० पासून मध्य आशियाच्या बाजूने हिंदुस्थानपर्यंत सत्ताविस्तार करीत आहे, असा संशय त्या…

वृंदावन (Vrindavan)

उत्तर प्रदेश राज्याच्या मथुरा जिल्ह्यातील व तालुक्यातील एक पुण्यक्षेत्र. लोकसंख्या ६३,००५ (२०११). यमुना नदीच्या उजव्या तीरावर, द्वीपकल्पासारख्या भूभागावर वसलेले हे ठिकाण कृष्णाचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मथुरेपासून उत्तरेस १० किमी.वर…

विसोबा खेचर (Visoba Khechara)

खेचर विसोबा : (तेरावे शतक). वारकरी संप्रदायातील आद्यसंत. नामदेवांचे गुरू म्हणून परिचित. मूळचे नाथ संप्रदायातील महान योगी. खेचर हे आडनाव नव्हे. देह आकाशगमन करण्याइतका हलका, तरल करण्याची सिध्दी प्राप्त असलेला…

गोरा कुंभार (Gora Kumbhar)

कुंभार, गोरा  :  (१२६७ - १३१७). वारकरी संप्रदायात वैराग्याचा महामेरू म्हणून ओळखले जाणारे संतकवी. तेर (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथे इ.स.१२६७ साली जन्म. समाधीही तेर येथेच. समाधी इ.स. १३१७ मध्ये…

स्वरजति (Swarjati)

कर्नाटक ( दाक्षिणात्य ) संगीतातील रचनांचा एक प्रकार. या प्रकारातील संगीतरचना सर्वसाधारणपणे भक्ती, प्रेम, शौर्य इ. रसांवर आधारित असतात. विशेषतः हंसध्वनी, कल्याणी, झिंजोटी, बिलहारी आदी रागांचे सादरीकरण स्वरजती रचनांमधून केले…

सानिया (Sania)

सानिया : (१० नोव्हेंबर १९५२). सुनंदा कुळकर्णी-बलरामन. मराठी साहित्यातील आघाडीच्या कथा, कादंबरी लेखिका. त्यांच्या साहित्यात स्वत:प्रती सजग होत जाणार्‍या, विशेषत: उच्चवर्गातील स्त्रीजीवनाचे चित्रण येते. सानिया यांचा जन्म सांगली येथे झाला.…

मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रम (SVEEP-Systematic Voters’ Education and Electoral Participation

स्वीप  : (SVEEP). मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांचा जागरूकपणे सहभाग वाढावा यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने २००९ मध्ये सूरू केलेला कार्यक्रम. मतदान प्रक्रियेविषयी जागरूकता वाढावी, त्या प्रक्रियेचे ज्ञान प्रत्येक मतदारापर्यंत पोहचावे, मतदान प्रक्रियेत…

रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi)

हट्टंगडी, रोहिणी : (११ एप्रिल १९५१). प्रख्यात भारतीय अभिनेत्री. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. रिचर्ड ॲटेनबरो यांनी निर्मिलेल्या गांधी (१९८२) या चित्रपटातील कस्तुरबांच्या भूमिकेमुळे त्यांना चित्रपटजगतात ख्याती मिळाली. त्यांच्या आईचे नाव निर्मला…

स्वाती तिरूनल ( Swathi Tirunal )

स्वाती तिरूनल : (१६ एप्रिल १८१३ — २७ डिसेंबर १८४६). कुलशेखर वंशातील त्रावणकोर संस्थानचा एक कलाभिज्ञ, संगीतप्रेमी कर्तबगार राजा. पूर्ण नाव स्वाती तिरूनल रामवर्मा. त्यांचा जन्म राजा रामवर्मा कोईल थम्पुरण आणि महाराणी…

जलशुद्धीकरण : औद्योगिक वापर

औद्योगिक वापरासाठीचे जलशुद्धीकरण  मालाचे उत्पादन करताना पाण्याचे विविध उपयोग असे : १) कच्चा माल म्हणून, २) विद्रावक म्हणून, ३) वाफ उत्पन्न करण्यासाठी, ४) यंत्रणा थंड ठेवण्यासाठी, ५) कच्चा माल वाहून…

अब्जांश तंत्रज्ञान : समुद्रातील तेलगळती समस्येवरील उपाययोजना (Nanotechnology-Based Solutions for Oil Spills)

समुद्रामध्ये तेलवाहू जहाजांचे अपघात अधून मधून होत असतात. अपघाताचे वेळी तसेच टँकरमध्ये तेल भरताना किंवा काढून घेत असताना समुद्रातील पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तेल सांडले जाते. तेलातील हायड्रोकार्बनयुक्त पदार्थ पाण्यामध्ये मिसळल्याने…

सातारा शहर (Satara City)

महाराष्ट्र राज्यातील एक इतिहास प्रसिद्घ शहर आणि याच नावाच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे मुख्यालय. ते अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी, किल्ल्याच्या उत्तर उतारावर वसले आहे. सातारा शहर पुण्याच्या दक्षिणेस सुमारे १२० व कोल्हापूरच्या…

गोविंदराव टेंबे (Govindrao Tembe)

टेंबे, गोविंदराव सदाशिव : (५ जून १८८१–९ ऑक्टोबर १९५५). प्रख्यात महाराष्ट्रीय हार्मोनियमवादक, संगीतरचनाकार, गायकनट व साहित्यिक. त्यांचा जन्म सांगवडे, जि. कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव अंबा. गोविंदरावांनी कोल्हापूर येथेच…