आधार स्वर (Adhar Swar)

मध्यसप्तकाचा षड्ज हा भारतीय आणि पाश्चात्त्य संगीतातील अचल आधार स्वर होय. यालाच प्राण स्वर किंवा जीव स्वर अशीही संज्ञा आहे. हा षड्ज साधारणपणे गायकाला सहजतेने लावता येण्यासारखा आणि रागानुरूप इष्ट…

गजानन वाटवे (Gajanan Vatave)

वाटवे, गजानन जीवन : (८ जून १९१७—२ एप्रिल २००९). मराठी भावगीत गायक व संगीतकार. त्यांचा जन्म बेळगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचा भिक्षुकीचा व्यवसाय होता आणि ते मिरज संस्थानामध्ये उपाध्याय होते.…

शंकर दत्तात्रेय जावडेकर (S. D. Javadekar)

जावडेकर, शंकर दत्तात्रेय : (२६ सप्टेंबर १८९४—१० डिसेंबर १९५५). प्रज्ञावंत गांधीवादी भाष्यकार व एक तत्त्वचिंतक. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर येथे झाला. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून ते १९१२ साली मॅट्रिक…

सेंट लॉरेन्स नदी (Saint Lawrence River)

उत्तर अमेरिका खंडातील एक महत्त्वाची तसेच कॅनडातील मॅकेंझीनंतरची दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी. आँटॅरिओ सरोवर ते सेंट लॉरेन्स आखातातील अँटिकॉस्टी बेट यांदरम्यानचा १,२८७ किमी. लांबीचा प्रवाह सेंट लॉरेन्स नदीचा मुख्य प्रवाह…

मॅग्नेशियम : संयुगे (Magnesium compounds)

मॅग्नेशियमाची सर्व संयुगे द्विसंयुजी आहेत आणि ती विपुल प्रमाणात आढळतात. मॅग्नेशियम कार्बोनेट : (MgCO3). निसर्गात मुख्यतः मॅग्नेपसाइटाच्या स्वरूपात तसेच डोलोमाइड व डोलोमाइटी चुनखडकातही सापडते. मॅग्नेशियम सल्फेटाच्या विद्रावात सोडियम बायकार्बोनेटाचा विद्राव…

हिमांशू राय (Himanshu Rai)

राय, हिमांशू : (? १८९२–१६ किंवा १८ मे १९४०). ‘बॉम्बे टॉकीज’ या सुप्रसिद्ध चित्रपटनिर्मितीसंस्थेचे संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने चित्रपटनिर्मिती करणारे आद्य भारतीय चित्रपटनिर्माते. त्यांचा जन्म एका सधन बंगाली कुटुंबात झाला.…

हेरमान गोरिंग (Hermann Goring)

गोरिंग, हेरमान व्हिल्हेल्म : (१२ जानेवारी १८९३—१६ ऑक्टोबर १९४६). जर्मन मुत्सद्दी व वायुसेनाप्रमुख. ह्याचा जन्म बव्हेरियातील रोझेनहाइम ह्या गावी मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. १९१२ मध्ये त्याने कैसरच्या भूसेनादलात प्रवेश मिळविला. १९१४…

विल्यम यूअर्ट ग्लॅडस्टन (William Ewart Gladstone)

ग्लॅडस्टन, विल्यम यूअर्ट : (२९ डिसेंबर १८०९–१९ मे १८९८). प्रसिद्ध ब्रिटिश मुत्सद्दी व इंग्लंडचा इतिहासप्रसिद्ध पंतप्रधान. याचा जन्म लिव्हरपूल (इंग्लंड) येथे एका सधन कुटुंबांत झाला. त्याचे वडील जॉन हे एक…

बटुकेश्वर दत्त (Batukeshwar Dutt)

दत्त, बटुकेश्वर : (जन्म १८ नोव्हेंबर १९१० – २० जुलै १९६५). भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक. त्यांचा जन्म बंगाल प्रांतामधील ओरी या गावात झाला. वडील गोष्ठबिहारी हे नोकरीनिमित्त कानपूरमध्ये राहत. १९२४-२५…

वैद्यक मानवशास्त्र (Medical Anthropology)

मानवी आरोग्य, आजार, आरोग्य व्यवस्था आणि जैविक-सांस्कृतिक घटकांचा आरोग्याबरोबरचा संबंध यांचा अभ्यास म्हणजे वैद्यक मानवशास्त्र होय. यामध्ये स्थानिक समूहाचे आरोग्य आणि त्यांचा संस्कृतीशी प्राचीन काळापासून चालत आलेला संबंध यांचे विश्लेषण…

जस्त (Zinc)

जस्त हे धातुरूप मूलद्रव्य असून याची रासायनिक संज्ञा Zn अशी आहे. याचा अणुक्रमांक ३० असून अणुभार ६५.३७ इतका आहे. इतिहास : इ. स. पू. ४०० वर्षे प्लेटो यांनी आपल्या पूर्वीही…

बुरशी : काल, आज आणि उद्या (Fungi : Yesterday, Today and Tomorrow)

पृथ्वीवर शेती सुरू झाली तेव्हापासून बुरशी वेगवेगळ्या कारणांकरिता वापरली जात आहे. प्रामुख्याने बुरशी शेतात पडलेल्या पालापाचोळ्यावर वाढते आणि कित्येक उपयुक्त पदार्थ झाडांना पुरविते. आजकाल तर जैविक खतांमध्ये मायकोऱ्हायझा, ट्रायकोडर्मा ह्यांचा…

विल्यम अर्नेस्ट जॉन्सन (W. E. Johnson)

जॉन्सन, विल्यम अर्नेस्ट : (२३ जून १८५८—१४ जानेवारी १९३१). प्रसिद्ध ब्रिटिश तर्कवेत्ता. जन्म केंब्रिज येथे. १९०२ पासून तो केंब्रिजमधील किंग्ज महाविद्यालयाचा अधिछात्र आणि नंतर ‘सिज्विक अधिव्याख्याता’ होता. सुरुवातीस तर्कशास्त्राशिवाय अर्थशास्त्रातही…

तांबे : संयुगे (Copper compounds)

तांब्याची ऑक्सिडीकरण अवस्था +१ असल्यास क्युप्रस व +२ असल्यास क्युप्रिक संयुगे मिळतात. +३ अवस्था असणारी तांब्याची अस्थिर संयुगे माहीत आहेत. क्युप्रस आयन जलीय विद्रावात अस्थिर असल्याने त्याचे क्युप्रिक संयुगात व…

जगन्नाथ प्रसाद दास (Jagannath Prasad Das)

दास,जगन्नाथ प्रसाद  : (२६ एप्रिल १९३६). भारतीय साहित्यातील ओडिया भाषेतील कवी.ओडिया भाषेतील काव्याला नाविन्यता, तंत्रशुध्दता आणि काव्याकडे पाहण्याचा नवा आयाम देणारे ज्येष्ठ कवी म्हणून त्यांची ओळख आहे. सौंदर्यभाव आणि आनंदभाव…