आसावरी थाटातील राग (Asavari Thaat)

भातखंडे वर्गीकरणपद्धतीनुसार आसावरी थाटात गंधार, धैवत, निषाद हे तीन स्वर कोमल व बाकीचे शुद्ध असतात. या थाटात आसावरी, जौनपुरी, गंधारी, देवगांधार, सिंधुभैरवी, देसी, कौशी, दरबारी कानडा, अडाणा, नायकी कानडा या…

बाबूराव पेंटर (Baburao Painter )

बाबूराव पेंटर : (३ जून १८९० – १६ जानेवारी १९५४). प्रसिद्ध महाराष्ट्रीय चित्रकार, शिल्पकार आणि चित्रपट-निर्माते व दिग्दर्शक. पूर्ण नाव बाबूराव कृष्णाजी मेस्त्री (मिस्त्री). जन्म कोल्हापूर येथे. त्यांचे वडील सुतारकाम, लोहारकाम…

शिक्षणातील अर्थशास्त्र (Economics in Education)

शिक्षण प्रक्रियेमध्ये आर्थिक तत्त्वे, संकल्पना, नियम, सिद्धांत, वित्तपुरवठा, विविध शैक्षणिक कार्यक्रम इत्यादी शिक्षणासंबंधी आर्थिक मुद्द्यांचा अभ्यास आणि उपयोजन करणे म्हणजे शिक्षणाचे अर्थशास्त्र होय. यामध्ये दुर्मिळ साधनांचे वाटप विशिष्ट पूर्वनिश्चित उद्दिष्टांच्या…

काकोरी कट (Kakori conspiracy)

ब्रिटिशांच्याविरुद्ध सशस्त्र लढा देण्याच्या हेतूने काकोरी (उत्तर प्रदेश) येथे घडवून आणलेला प्रसिद्ध क्रांतिकारी कट. यामध्ये चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, मन्मथनाथ गुप्ता, अशफाक उल्लाखान, राजेंद्रनाथ लाहिडी, रोशनलाल इत्यादी क्रांतिकारक अग्रणी होते.…

जिबरेलिने (Gibberellin)

जिबरेलिक अम्ल सर्वप्रथम एका  बुरशीमध्ये आढळले. जिबरेल्ला फ्युजिकुरोई (Gibberella fujikuroi) नावाची बुरशी ज्या भाताच्या रोपावर आक्रमण करायची, त्या रोपांची उंची इतर रोपांपेक्षा खूप जास्त वाढायची. त्यावरूनच शास्त्रज्ञांनी  असा अंदाज व्यक्त…

ॲबसिसिक अम्ल (Absissic Acid)

ॲबसिसिक अम्ल या संजीवकामुळे वनस्पतींची वाढ खुंटते. विपरीत वातावरणामध्ये बियांना सुप्तावस्थेत ठेवण्याचे काम हे संजीवक करते. त्याचप्रमाणे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्यास पर्णरंध्रे (stomata) बंद करण्याचे कामही हे संजीवक करते. उत्पादन…

कल्याण थाटातील राग (Kalyan Thaat)

भातखंडे-पद्धतीनुसार रूढ असलेल्या रागवर्गीकरणात कल्याण थाटाचा समावेश होतो. दाक्षिणात्य संगीतपद्धतीवरील ग्रंथांत या थाटाचे नाव कल्याणी असे आहे. मध्यम या स्वराचे शुद्ध व तीव्र असे दोन्हीही किंवा त्यांपैकी एक भेद घेणे…

काफी थाटातील राग (Kafi Thaat)

भातखंडे पद्धतीनुसार रूढ असलेल्या रागवर्गीकरणातील काफी हा थाट, त्यातून निघणार्‍या रागांच्या मोठ्या संख्येमुळे सर्व थाटांत मोठा मानला जातो. दाक्षिणात्य संगीतपद्धतीवरील ग्रंथांत त्याला ‘खरहरप्रिया’ ‘हरप्रिया’ किंवा ‘श्रीराग मेल’ अशी नावे आहेत.…

जोगळटेंभी  नाणेसंचय  (Jogaltembhi Coin Hoard)

जोगळटेंभी  नाणेसंचय :  जोगळटेंभी (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथील प्रसिद्ध नाणी. १९०८ मध्ये पश्चिमी क्षत्रप राजवंशातील क्षहरात घराण्यातील नहपान राजाच्या चांदीच्या नाण्यांचा मोठा संचय येथे सापडला. या संचातील १३,२५० एवढ्या नाण्यांची अधिकृत…

ॲटिला (Attila)

ॲटिला : (४०६?—४५३). प्रसिद्ध हूण राजा. वडिलांचे नाव मुंदझुक व चुलत्याचे नाव रूआ. रूआनंतर ४३४ मध्ये ॲटिला आपला भाऊ ब्‍लीडासह गादीवर आला. त्यांचे साम्राज्य पश्चिमेकडील आल्प्स व बाल्टिक प्रदेश इथपासून…

Read more about the article कन्नौज (Kannauj)
कन्नौज येथील मौखरी घराण्यातील नाणी.

कन्नौज (Kannauj)

भारतातील एक प्रसिद्ध प्राचीन स्थळ. गंगा नदीच्या तीरावर असलेले हे शहर जिल्ह्याचे ठिकाण असून ते कानपूर (उत्तर प्रदेश) शहराच्या वायव्य दिशेला ८० किमी. अंतरावर आहे. याची कुशस्थल, गाधिपुर, कुशिक, कुसुमपूर…

खाजण आणि तिवर वने (Saline lands and Mangroves)

खाडीत व छोट्या आखातांत समुद्राचे खारे पाणी व भूखंडावरून येणारे गोडे पाणी यांची मिसळ होते.  नद्यांनी व समुद्रप्रवाहांनी वाहून आणलेल्या गाळांचे अशा ठिकाणी छोट्या गोट्यांत रूपांतर होऊन त्यांचे निक्षेपण होते. …

राग (Attachment)

राग म्हणजे ‘आसक्ती’ होय. मराठीमध्ये राग या शब्दाचा अर्थ ‘क्रोध’ असा होतो, परंतु संस्कृतमध्ये प्रिय वस्तूंप्रति असणारी आसक्ती म्हणजे राग होय. महर्षी पतंजलींनी राग हा एक क्लेश मानला आहे. रागाचे…

द्वेष (Aversion)

अप्रिय वस्तूंप्रति असणारी क्रोधाची भावना म्हणजे द्वेष होय. महर्षी पतंजलींनी द्वेषाचा समावेश क्लेशांमध्ये केलेला आहे. द्वेषाचे स्वरूप त्यांनी ‘दु:खानुशयी द्वेष:’ (योगसूत्र २.८) या सूत्राद्वारे सांगितले आहे. व्यासभाष्यामध्ये द्वेष या क्लेशाचे…

अमृतबिन्दु उपनिषद् (Amritabindu Upanishad)

अमृतबिन्दु उपनिषद् हे कृष्ण यजुर्वेदाचे उपनिषद् आहे. ह्या उपनिषदामध्ये मन, ब्रह्म, आत्म्याचे एकत्व, शब्दब्रह्म इत्यादी संकल्पनांचा विचार केला आहे. या उपनिषदानुसार मन हेच बंध आणि मोक्षाचे कारण आहे. कामनारहित असलेले…